NABARD Yojana Maharashtra 2024 : दुग्धव्यवसाय योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

NABARD Yojana Maharashtra 2024 : आपल्या देशात लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या हेतूने केंद्र सरकारद्वारे नाबार्ड योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी व्याज दरामध्ये सरकार तर्फे कर्ज दिले जाणार आहे. तर नाबार्ड योजने संबंधित सर्व माहिती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, तरी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या योजनेविषयी कोणतीच शंका येणार नाही.

NABARD Yojana Maharashtra

NABARD Yojana Maharashtra Information in Marathi :

योजनेचे नावनाबार्ड योजना 2024
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
लाभार्थीशेतकरी, उद्योजक, कंपन्या, बिगर सरकारी संस्था
लाभकमी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन/ ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

NABARD Yojana Maharashtra काय आहे?

देशामध्ये कोरोनाच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून नाबार्ड योजने विषयी नवीन घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, नाबार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३०,००० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

जे की नाबार्ड योजनेच्या ९०,००० कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून हे पैसे सहकारी बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांना दिले जातील तसेच, जवळपास ३ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दुग्ध व्यवसाय योजने अंतर्गत ग्रामीण भागामधील बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून केला जात आहे. या योजनेच्या मार्फत दुग्ध उत्पादन करण्यासाठी डेअरी फार्म सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या योजने अंतर्गत दुधाचे उत्पादन करणे, तसेच गायी किंवा म्हशींची काळजी घेणे, तुपाची निर्मिती करणे या सर्व गोष्टी मशीनवर आधारित असणार आहेत. जर तुम्हाला या योजेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रियेची सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

NABARD Yojana Maharashtra या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश जे लोक दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांना व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.
  • तसेच दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
  • ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.

NABARD Yojana Maharashtra पात्रता (Eligibility) :

  • या योजनेसाठी एका व्यक्तीला फक्त एकदाच लाभ दिला जाईल.
  • या योजनेसाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था, वैयक्तिक उद्योजक, कंपन्या इ. पात्र आहेत.
  • या योजने अंतर्गत एका कुटुंबामधील एक पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळू शकतो, त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र युनिट उभा करण्यासाठी मदत केली जाते. या २ प्रकल्पांमधले अंतर जवळपास ५०० मीटर इतके असणे आवश्यक आहे.

NABARD Yojana Maharashtra फायदे काय आहेत?

  • नाबार्ड योजना 2024 या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे अनुदान देण्यात येते.
  • या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी शेतकरी दुधाच्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणे खरेदी करू शकणार आहेत.
  • जर तुम्ही दुधावर प्रक्रिया करण्यासाठी एखादी मशीन खरेदी केली आणि त्या मशीनची किंमत १३ लाख रुपये झाली, तर तुम्हाला त्यावरती २५ टक्के (३.२५ लाख रुपये) भांडवलीसाठी सुबसिडी मिळते.
  • जर तुम्ही ५ पेक्षा कमी गायीची डेअरी सूर करणार असाल तर, तुम्हाला त्यांच्या खर्चाचा हिशोब/ पुरावा द्यायला लागेल. त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे ५० टक्के अनुदान मिळणार आहे.

सरकारच्या इतर योजना :

NABARD Yojana Maharashtra 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :

  • नाबार्ड योजना २०२४ साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिला नाबार्डच्या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे.
  • नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
  • त्यानतंर तुम्हाला Information Centre या नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला या योजने अंतर्गत PDF डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे.

NABARD Yojana Maharashtra 2024 ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :

  • या योजने अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात पहिला, तुम्हाला कोणत्या प्रकारचे डेअरी फार्म ओपन करायचे आहे ते ठरवायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला नाबार्डयोजनेच्या माध्यमातून डेअरी फार्म सुरु करायचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालयास भेट द्यायची आहे.
  • समजा तुम्हाला लहान डेअरी फार्म उघडायचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन त्या संबंधित माहिती घेऊ शकता.
  • संबंधित बँकेमध्ये गेल्यानतंर तुम्हाला तिथून अर्ज घ्यायचा आहे, तो अर्ज काळजीपूर्वक भरून अर्ज बँकेत जमा करायचा आहे.
  • समजा तुमच्या कराची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तुमचा प्रकल्पाचा अहवाल नाबार्ड कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
सारांश :

तर मित्रांनो आम्ही या पोस्ट मध्ये नाबार्ड योजने विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट सोशल मीडिया जसे की, व्हाट्स अँप, फेसबुकवर शेअर करा. जेणेकरून इतर लोकांनाही या योजने विषयी अचूक माहिती मिळेल आणि तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तुम्हाला या योजने संबंधित काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही इथे कंमेंट करून विचारू शकता किंवा आम्हाला ई-मेल द्वारे कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करू.

3 thoughts on “NABARD Yojana Maharashtra 2024 : दुग्धव्यवसाय योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु”

    • या योजने अंतर्गत तुम्हाला किती कर्ज मिळेल याबद्दल माहितीसाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन त्या संबंधित माहिती घ्यावी लागेल.

      Reply

Leave a comment