राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना : Rashtriya Kutumb Labh Yojana 2024

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 : तर मित्रांनो आज आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. ही योजना नक्की काय आहे, या योजनेचा उद्देश काय आहे, योजनेचे फायदे काय आहेत, योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळवायचा याविषयी सर्व माहिती पण पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.

Rashtriya Kutumb Labh Yojana

Rashtriya Kutumb Labh Yojana Information in Marathi :

योजनेचे नावराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा उद्देश गरीब घरातील कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा आहे.
विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
लाभार्थीदारिद्र्य रेषेखालील कुटुंब
लाभ२०,०००/- रुपयांची आर्थिक मदत
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
शासनाचा निर्णय (GR)येथे क्लिक करा
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Rashtriya Kutumb Labh Yojana काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबामधील 18 ते 59 वयाच्या दरम्यान असलेल्या स्त्री किंवा पुरुष यांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्यांच्या कुटुंबांना एक रकमी 20,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • महाराष्ट्र राज्यामध्ये गरीब घरातील कुटुंबामध्ये कमवणाऱ्या व्यक्तीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. आणि त्यामुळे कमवत्या व्यक्तीचा अचानकपणे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य :

  • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामधील एखाद्या कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 20,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक अनुदान
  • दर महिना 600/- रुपयांची पेन्शन (75 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी)

Rashtriya Kutumb Labh Yojana पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामधील 18 ते 59 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • तसेच विधवा किंवा घटस्फोटीत महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत काही अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • तसेच कुटुंबामधील कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीचे नाव दारिद्र रेषेखालील यादीमध्ये असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
  • ज्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघातामध्ये झाला आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • तसेच ज्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती राज्य किंवा केंद्र शासनाचा कर्मचारी असल्यास त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींनाच घेता येईल, व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबांमधील कमवता व्यक्तीचा (स्त्री/पुरुष) मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मृत्यूच्या दिनांक पासून तीन वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील. आणि त्यानंतर केलेला अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

Rashtriya Kutumb Labh Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबातील कर्तव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होऊ नये, या हेतूने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू करण्यात आली आहे.

Rashtriya Kutumb Labh Yojana फायदा :

  • समजा कुटुंबातील एखाद्या कमावती व्यक्तीचा अचानक किंवा एकाएकी मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 20 हजार रुपयांची हार्दिक मदत करण्यात येते.
  • तसेच अनाथ किंवा अपंग असलेले कुटुंबे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सरकारच्या इतर योजना :

Rashtriya Kutumb Labh Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • प्रतिज्ञा पत्र
  • मृत्यूचा दाखला

Rashtriya Kutumb Labh Yojana साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय/ तलाठी कार्यालयामध्ये जायचे आहे. तिथून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
  • त्यानंतर अधिकारी यांच्याद्वारे अर्जाची व कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर वितरित केली जाईल.
इतर महत्वाची माहिती :
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये बदल होण्याची शक्यता असते, त्यामुळे योजनेची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा विशेष सहाय्य विभाग कार्यालयामध्ये संपर्क साधा.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली नाही.
  • राज्य सरकार द्वारे या योजनेअंतर्गत 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा केले जाईल.

1 thought on “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना : Rashtriya Kutumb Labh Yojana 2024”

Leave a comment