Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 : मित्रानों आज आपण संजय गांधी पेन्शन योजने संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, ही योजना नक्की काय आहे, ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश काय आहे, या योजनेचे फायदे काय आहेत आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा. या बद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
Sanjay Gandhi Niradhar Yojana Information in Marathi :
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार पेन्शन योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश हा निराधार व्यक्तींना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत पुरवणे हा आहे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यामधील निराधार (ज्यांना कोणाचाही आधार नाही) व्यक्ती |
लाभ | १,५००/- रु. प्रति महिना आर्थिक साहाय्य |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन/ ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Sanjay Gandhi Niradhar Yojana काय आहे?
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तीला प्रत्येक महिन्याला १,५००/- रु. आणि एक पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबासाठी प्रत्येक महिन्याला १,५००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला व्यक्ती ६५ वर्षांचे झाल्यानंतर त्या व्यक्तीला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना यामध्ये समाविष्ट केले जाईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
- संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यामधील निराधार व्यक्तींना म्हणजेच ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा व्यक्तींना आर्थिक मदत पुरवणे.
- तसेच राज्यामधील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी कोणाकडून पैसे मागण्याची गरज भासू नये आणि इतर कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासू नये या हेतून ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana पात्रता व अटी :
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- अर्जदार व्यक्तीचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये असले पाहिजे.
- तसेच अर्जदार व्यक्तीच्या नावाने कोणत्याही ठिकाणी जमीन नसली पाहिजे.
- जर लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या तारखेपर्यंतची थकबाकी रक्कम असेल तर, मृत्यूच्या तारखेपर्यंत त्याचा हिशोब करून ती लाभार्थ्यांच्या पती/ पत्नी किंवा कायदेशीर वारसदाराला मिळेल.
- मुलींच्यासाठी तिचे लग्न होईपर्यंत किंवा मुलीला नोकरी मिळेपर्यंतच लाभ मिळेल. यानुसार नोकरी करणाऱ्या अविवाहित मुलीचे वार्षिक उत्पन्न आणि कुटुंबाचे उत्पन्न या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन लाभार्थ्यांची पात्रता ठरवली जाईल.
- एखाद्या व्यक्तीला अंध, कर्णबधिर, मूकबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रकारचे अपंगत्व असल्यास त्यास अधिनियम १९९५ च्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाईल. कमीत कमी ४०% अपंगत्व असल्यास त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- तसेच एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला असल्यास पण पोटगी मिळाली नसेल किंवा या योजनेमध्ये नमूद केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळाल्यास त्या महिला या योजनेसाठी पात्र राहतील.
- मुलीचा विवाह झाल्यास त्यानंतर मुलीच्या पालकांना पुढील अनुदान चालू ठेवले जाईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana फायदे काय आहेत?
- ज्या व्यक्तींना कोणताही आधार नाही त्यांना दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
सरकारच्या इतर योजना :
- सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र : Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024
- मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024
- मासेमार संकट निवारण निधी योजना : Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana 2024
Sanjay Gandhi Niradhar Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचा फोटो
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- इतर दस्तऐवज (किमान १) :
- महिला विधवा असेल तर, मोठ्या मुलाचा जन्माचा दाखला.
- पतीचे निधन झाले असल्यास त्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीमधील उतारा सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत नमूद केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला : घटस्फोटासाठी न्यायालयाकडून मिळालेला आदेश आणि पतीने द्यायच्या देखभाल रकमेचा पुरावा.
- आई व वडिलांचा मृत्यू झाला असल्यास अनाथ असल्याबाबतचे तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यातर्फे संबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana साठी अर्ज कसा करायचा?
- पहिला टप्पा :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात पहिला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर नवीन युजर नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमच्यासमोर एक नवीन अर्जाचे पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व माहिती अर्जामध्ये भरून झाल्यानतंर नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- इथे तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते.
- दुसरा टप्पा :
- त्यानतंर आता तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर आता तुमच्या समोर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज ओपन होईल.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती भरायची आहे आणि त्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुमची संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते.
1 thought on “संजय गांधी निराधार पेन्शन योजना : Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024”