Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 : मित्रांनो आज आपण सामूहिक विवाह योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, सामूहिक विवाह योजना नक्की काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे, या योजनेचा उद्देश काय आहे, योजनेचे फायदे काय आहेत आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. याची सर्व माहिती आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.
Samuhik Vivah Yojana Maharashtra Information in Marathi :
योजनेचे नाव | सामूहिक विवाह योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना राज्य सरकार तर्फे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. |
लाभार्थी | शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मुली |
लाभ | १० हजार रुपयांची आर्थिक मदत |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Samuhik Vivah Yojana Maharashtra काय आहे?
या योजनेतर्फे शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलींच्यात लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी १० हजार रुपये एवढी अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला प्रति जोडप्यामागे २,०००/- रु. इतकी रक्कम विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च आणि विवाह नोंदणी शुल्क साठी लागणारा खर्च भागवण्यासाठी दिला जाणार आहे.
Samuhik Vivah Yojana Maharashtra पात्रता (Eligibility) :
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यामधील मूळचा रहिवाशी असला पाहिजे.
सामूहिक विवाह योजनेच्या काही अटी व शर्ती :
- फक्त महाराष्ट्र राज्यातमधील मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार मुलगी शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबामधील असली तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
- फक्त पहिला विवाह असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- या योजनेच्या मार्फत सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणे अवश्यक आहे.
- मुलगी महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असल्याचा ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
- विवाह सोहळ्याच्या दिवशी वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- वधू -वर जर पुनर्विवाह करत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण वधू घटस्फोटित किंवा विधवा असेल तर तिच्या पुनर्विवाहासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाईल.
- या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुली या अपात्र ठरतील. कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध स्वतंत्र योजना राबवल्या आहेत.
- स्वयंसेवी संस्थेला लग्न समारंभाच्या १ महिना अगोदरच महिला व बाल विकास विभागामधील अधिकाऱ्यांकडे अर्ज आणि कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. अर्ज व कागदपत्रे जमा न केल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेल्या जोडप्यांचे लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
Samuhik Vivah Yojana Maharashtra या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांवर पडू नये या हेतूने सामूहिक विवाह योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये हा या योजनेमागील हेतू आहे.
Samuhik Vivah Yojana Maharashtra फायदे काय आहेत?
- या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदीसाठी १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. आणि सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला समारंभाचा खर्च भागवण्यासाठी २ हजार रुपये अनुदान दिले जाईल.
- मंगलसूत्र तसेच लग्नासाठीच्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मदत होईल.
- लग्न समारंभ आणि लग्नाची नोंदणी करण्यासाठी मदत केली जाणार.
- विवाह साहित्याचा पुरवठा.
- लग्नपत्रिका छपाईसाठी मदत केली जाईल.
- सामाजिक कार्यक्रमासाठी मदत केली जाईल.
सरकारच्या इतर योजना :
- मासेमार संकट निवारण निधी योजना : Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana 2024
- मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024
- ‘लाडली बहना’ योजना, महिलांना मिळणार १२०००/- रुपये वर्षाला: Ladli Behna Yojana in Maharashtra 2024
Samuhik Vivah Yojana Maharashtra योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- वधू आणि वराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखल (तलाठी/ ग्रामसेवक)
- पालकांच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईझ फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचा ७/१२ उतारा
- जन्माचा पुराव्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखलाची झेरॉक्स
- लग्नाचा दाखला
- बाल विवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्या संबंधीचा वर आणि वधू यांनी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे आहे.
Samuhik Vivah Yojana Maharashtra साठी अर्ज कसा करायचा?
- या योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी सर्व प्रथम अर्जदार व्यक्तीला आपल्या जवळच्या क्षेत्रामधील महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती भरून त्यासोबत लागणारी कागदपत्रे जोडायची आहेत आणि तो अर्ज संबंधित विभागामध्ये जमा करायचा आहे.
- त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या कमीत कमी १ महिना अगोदर जिल्हा महिला बाळ विकास अधिकारी कार्यालयामध्ये अर्जासोबत सर्व दाखले सादर करणे आवश्यक आहेत. तसेच विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थेने सादर करणे अपेक्षित आहे.
1 thought on “सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र : Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024”