मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना : Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024 : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजना महाराष्ट्र राज्यामधील व देशातील आपत्तीग्रस्त व्यक्तींना लगेच मदत व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण या पोस्टमार्फत जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना नक्की काय आहे, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, या योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आणि या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो. ही सर्व माहिती आपण या पोस्टद्वारे पाहणार आहोत, तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Information in Marathi :

योजनेचे नावमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा मुख्य उद्देश हा मोफत वैद्यकीय उपचार पुरवून देणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टीने गरीब असणारे कुटुंब
लाभऔषधोपचारासाठी २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन/ ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा किंवा येथे क्लिक करा

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana काय आहे?

  • देशातीमध्ये नैसर्गिक आपत्ती पूर, दुष्काळ, आग अशा बऱ्याच कारणांमुळे नागरिकांना शारीरिक इजा होते. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना वैद्यकीय उचरसाठी येणारा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • तसेच आजारपणामध्ये वैद्यकीय खर्च परवडत नसलेल्या म्हणजेच आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता योजनेमार्फत मदत केली जाणार आहे.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेची प्रक्रिया ही किचकट व खूप वेळ खाणारी आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना वेळेवर आर्थिक मदत मिळत न्हवती आणि त्यामुळे अनेक गरजू व्यक्तींना हा निधी मिळत नव्हता.
  • रुग्णांना या सर्व समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी यावर उपाय म्हणून सरकारद्वारे ८६५०५६७५६७ हा नंबर सुरु करण्यात आला आहे. या नंबर वरती फक्त एक मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळणार आहे.
  • त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यामधील तसेच देशातील नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय मदत करणे हा आहे.
  • तसेच जाती मुळे होणाऱ्या दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना आणि ज्या व्यक्तींना दुखापत झाली आहे किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्यांना आर्थिक मदत करणे.
  • दहशदवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा इतर स्वरूपामध्ये त्यांना मदत पुरवणे.
  • तसेच अपघातामध्ये (मोटार/ विमान/जहाज/ रेल्वे हे सोडून) मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक मदत करणे.

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana पात्रता (Eligibility) :

  • या योनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना अटी व शर्ती :

  • या योजेनचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्याबाहेरच्या रुग्णालयांवर महाराष्ट्र सरकारचे नियंत्रण नसते व त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्या कारणामुळे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील रुग्णालयांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • समजा रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय बालक स्वास्थ्यकार्यक्रम किंवा आयुष्मान भारत यापैकी कोणत्याही एका योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज भरतेवेळी खोटी माहिती भरल्यास किंवा अर्जामध्ये बनावट माहिती आढळ्यास अर्ज रद्द केला जाईल, तसेच कायदेशीर रित्या पोलीस कारवाई करण्यात येईल.
  • तसेच अर्ज भरतेवेळी रुग्णांनी त्यांना झालेल्या आजाराची संपूर्ण माहिती भरणे गरजेचे आहे.

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana फायदे काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आजाराच्या उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • राज्यातील नागरिकांना त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. किंवा कोणाकडून पैसे उधार किंवा कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
  • वेगवेगळे आजार व शस्त्रक्रियांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायक निधी योजनेद्वारे निधी देण्यात येतो.

सरकारच्या इतर योजना :

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • नमुना अर्ज
  • रुग्णाचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रुग्णाचे रेशन कार्ड
  • बाल रुग्णांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक आहे
  • संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे गरजेचे आहे.
  • अपघात झाल्यास, फार किंवा MLC आवश्यक
  • निदान आणि उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक
  • खाजगी रुग्णालय असेल तर सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक
  • उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.६० लाख पेक्षा कमी असल्याबाबत)
  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र मूळप्रत त्यासोबत डॉक्टरांची सही व शिक्यासह खाजगी

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईवर जायचे आहे.
  • त्यानंतर वेबसाईटच्या होम पेज वर फॉर्म मिळवण्यासाठी इथे क्लिक करावे यावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे.

किंवा

  • अर्जदाराला अर्थसहाय्याची मागणी ई-मेल मार्फत सुद्धा करता येणार आहे. त्यासाठी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपामध्ये ई-मेल द्वारे पाठवायची आहेत व त्याच्या मूळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पोस्टाद्वारे/ तापलामार्फत तात्काळ पाठवायची आहेत.
CMRF Maharashtra Application Status Check :
  • या योजने अंतर्गत अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईट्वर जावे लागेल.
  • त्यानतंर होम पेजवर खाली अर्जाची सद्यस्थिती बाबत विचारणा यावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक, भ्रमणध्वनी व कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि दाखल करा या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर आता तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) दिसेल.
योजनेची इतर माहिती :
मुख्यमंत्री सहाय्यता निधी हेल्पलाईन क्रमांक०२२-२२०२६९४८
मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्रमांक८६५०५६७५६
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना अर्ज नमुनायेथे क्लिक करा
Mukhyamantri Sahayata Nidhi Email IDaao.cmrf-mh@gov.in
Mukhyamantri Sahayata Nidhi Hospitals Listयेथे क्लिक करा
संपर्कासाठी पत्तामुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, ७ वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई पिन कोड – ४०० ०३२

1 thought on “मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना : Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2024”

Leave a comment