महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या नोंदणीची माहिती म्हणजेच सातबारा उतारा किंवा 8 अ उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख (Mahabhulekh) या नावाचे पोर्टल राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारने नागपूर, नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभाग अंतर्गत सर्व जिल्ह्यांमधील आणि गावांमधील सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे.
राज्य सरकारच्या द्वारे सुरू करण्यात आलेल्या Mahabhulekh पोर्टल द्वारे आपण या मुख्य ठिकाणांचा भू नकाशा (MahaBhu Naksha) ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहे. त्याचबरोबर खासरा क्रमांक, खेवात क्रमांक, खतौनी क्रमांक इ. या सर्वांची माहिती आपल्याला मिळू शकेल. या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला Mahabhulekh विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या पोर्टल संबंधित कोणतीही शंका येणार नाही.
Digital Signature 7/12 Online Information in Marathi :
योजनेचे नाव | महाभूलेख |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे |
योजनेचा उद्देश काय आहे? | राज्यातील नागरिकांना ऑनलाईन ७/१२, ८ अ आणि जमिनीचा नकाशाची माहिती उपलब्ध करून देणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
विभाग | महाराष्ट्र कृषी विभाग |
अधिकृत वेबसाईट | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr |
Mahabhulekh Online Satbara Maharashtra 2024 :
- महाराष्ट्र राज्यातील नाशिक, कोकण, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागामध्ये राहणाऱ्या लोकांना जमिनी संबंधित सर्व माहिती आणि भूमी अभिलेख हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे महाभुलेख पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र मधील नागरिकांना जमिनी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी सरकारी कार्यालयामध्ये जावे लागायचे. पण आता महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून सर्व जमिनी संबंधित माहिती ऑनलाईन मिळणार आहे.
- जसे की, डिजिटल सातबारा, ८ अ उतारा, ऑनलाईन सातबारा आणि सातबारा उतारा. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मधील शेतकऱ्यांना तसेच सर्व सामान्य नागरिकांना दरवेळी शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना कोठेही न जाता घरी बसूनच आपल्या शेती संबंधित सर्व माहिती ऑनलाईन रित्या मिळणार आहे.
Maharashtra Satbara Utara Online :
- राज्य सरकारने सुरू केलेल्या महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना शेती संबंधीत आणि जमिनी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तुम्ही या ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सातबारा आणि ८ अ उतारा बघू शकता. तुम्हाला हा सातबारा उतारा आणि ८ अ उताराची PDF सुद्धा डाउनलोड सुद्धा करता येते तसेच त्याची प्रिंट देखील काढू शकता.
- परंतु हा ऑनलाईन सातबारा उतारा, ८ अ उतारा आणि डिजिटल सातबारा कोणत्याही सरकारी कामासाठी वापरता येणार नाही. फक्त वैयक्तिक कामासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
महाभुलेख महाराष्ट्र ऑनलाईन पोर्टलचा उद्देश :
- महा भूमी अभिलेख हे पोर्टल महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची माहिती व शेत जमिनीची माहिती पुरवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
- Mahabhulekh Portal सुरू करण्या अगोदर, राज्यातील लोकांना जमिनी संबंधित कागदपत्रे उदा. ऑनलाईन सातबारा, ८ अ उतारा आणि जमिनीचा नकाशा काढण्यासाठी शेतकऱ्यांना सतत सरकारी कार्यालयामध्ये जावे लागायचे. तरीसुद्धा वेळेवर काम होत नव्हते आणि शेतकऱ्यांचा वेळ सुद्धा वाया जायचा.
- त्यामुळे राज्य सरकारने या अडचणींचा आढावा घेऊन तसेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाभुलेख हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. त्यामुळे या महाभुलेख पोर्टलच्या मदतीने जमिनीशी संबंधित सर्वच माहिती राज्यातील शेतकरी व इतर नागरिक पाहू शकतात.
महाभुलेख पोर्टलचे फायदे :
- सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या Mahabhulekh पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा, ८ अ उतारा आणि जमिनीच्या नोंदी इ. माहिती उपलब्ध करून दिली जाते.
- शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी आता सारखे सरकारी कार्यालय मध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही Online Satbara काढून तो डाउनलोड सुद्धा करता येतो. तसेच त्याची प्रिंट काढून तुम्ही इतर कामांसाठी त्याचा वापर करू शकता.
सरकारच्या इतर योजना :
- खरीप पीक विमा योजना : Kharip Pik Vima Yojana 2024
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना : Rashtriya Kutumb Labh Yojana 2024
महाभुलेख पोर्टलवर सातबारा उतारा कसा पाहायचा :
तुम्हाला जर ऑनलाईन सातबारा किंवा शेतीचा नकाशा पाहिजे असल्यास खाली काही स्टेप्स दिल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही ऑनलाईन सातबारा पाहू शकता किंवा डाऊनलोड देखील करू शकता.
- ऑनलाईन सातबारा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सातबाराचे ऑनलाइन पोर्टल Mahabhulekh वरती जायचे आहे.
- महाभुलेख पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला याचे होम पेज दिसेल.
- होम पेज वरती तुम्हाला विभाग निवडा हा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमचा प्रशासकीय विभाग निवडायचा आहे.
- तुम्ही प्रशासकीय विभागाची निवड केल्यानंतर आता तुम्हाला जिल्हा निवडा हा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- जिल्ह्याची निवड केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा तालुका निवडायचा आहे नंतर तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, किंवा नाव यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे.
- समजा तुम्ही सर्वे नंबर हा पर्याय निवडला तर, तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
- नेक्स्ट पेज वरती तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Captcha Code टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमच्या शेती संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
Digital Satbara कसा डाऊनलोड करायचा?
तुमचा सातबारा जर डिजिटल व्हेरिफाय असेल तर तुम्ही तो सातबारा सरकारी कामासाठी वापरू शकता. राज्य शासनाच्या नवीन GR नुसार Digitally Verified म्हणजे, सरकारी कागदपत्रांवर डिजिटल सिग्नेचर आहे ती सर्व कागदपत्रे आपण शासकीय कामासाठी वापरू शकतो. त्यासाठी राज्य सरकारने Digital Singed Satbara Portal सुरू केले आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला Digital Singed सातबारा किंवा 8 अ उतारा काढता येतो. यासाठी तुम्हाला 20 रुपये ऑनलाइन शुल्क आकारला जातो. डिजिटल सातबारा काढण्याची प्रक्रिया आम्ही खाली दिलेली आहे.
- डिजिटल सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Digital Satbara Portal वर जायचे आहे.
- या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला New Registration यावर क्लिक करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला या पोर्टलवर सातबारा काढण्यासाठी नवीन खाते तयार करायचे आहे. हे तुम्हाला एकदाच करायचे आहे नंतर तुम्ही इतर कोणाचाही डिजिटल सातबारा काढू शकता.
- आता तुम्ही New Registration वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.
- ही सर्व माहिती आल्यानंतर तुम्हाला आता Register यावर क्लिक करायचे आहे.
- रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल वरती किंवा ईमेल वरती एसएमएस येईल, त्यामध्ये तुमचे लॉगिन डिटेल्स (Login ID आणि पासवर्ड असेल).
- त्यानंतर तुम्हाला महाभूमी डिजिटल सातबारा पोर्टल वरती जाऊन तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर इथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील Digital 7/12, Digital 8 A आणि Property Card. या तिन्ही पैकी तुम्हाला जे कागदपत्र हवं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
2 thoughts on “Mahabhulekh Online Satbara Maharashtra : भूमी अभिलेख ऑनलाईन 7/12”