गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना : Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024

Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 : मित्रांनो आज आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना नक्की काय आहे. ही योजना कोणाद्वारे सुरु करण्यात आली, या योजनेचा उद्देश नक्की काय आहे, योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योनेचा लाभ कसा घ्यायचा या विषयी आपण सविस्तर माहिती या पोस्टद्वारे पाहणार आहोत. तरी ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी काही शंका राहणार नाही.

Gopinath Munde Apghat Vima Yojana

Gopinath Munde Apghat Vima Yojana Information in Marathi :

योजनेचे नावगोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा उद्देश अपघातग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे.
विभागकृषी विभाग
लाभार्थीराज्यामधील सर्व शेतकरी
लाभ२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
PDF Notificationयेथे क्लिक करा

Gopinath Munde Apghat Vima Yojana काय आहे?

  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही योजना समजा एखाद्या शेतकऱ्याचा शेतामध्ये काम करतेवेळी किंवा शेतीविषयी इतर कामे करतेवेळी अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये एवढी रक्कम दिली जाईल. आणि जर अपघातामध्ये कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला या योजने अंतर्गत १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
  • तसेच ही योजना शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि शेतकऱ्याला विमा सुरक्षा देण्याच्या देण्याच्या हेतूने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे.

Gopinath Munde Apghat Vima Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचा शेतामध्ये काम करतेवेळी किंवा शेती या क्षेत्राशी संबंधित काम करतेवेळी मृत्यू झाल्यास किंवा शेतकऱ्याला कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे.
  • शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबाला अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.

Gopinath Munde Apghat Vima Yojana पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे म्हणजेच तो व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • समजा ज्या एखाद्या व्यक्तीचे ७/१२ उताऱ्यावर नाव नाही परंतु ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, अशा कुटुंबामधील कोणताही १ सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या काही अटी व शर्ती :

  • फक्त महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • तसेच महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातमधील मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणारा व्यक्ती हा शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबामधील असला पाहिजे.
  • अर्जदार व्यक्तीचे वय हे १० वर्षे ते ७५ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.
  • विम्याचा कालावधी संपल्यानंतर ३० दिवसांच्या अगोदर दावा अर्ज जमा करणे बंधनकारक राहील, असे न केल्यास त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजने अंतर्गत पुढील अपघाताची कारणे गृहीत धरली जातील :

  • नैसर्गिक आपत्ती
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • सर्पदंश
  • विंचू दंश
  • विजेचा शॉक लागून मृत्यू
  • अंगावर वीज पडून मृत्यू होणे
  • वाहन अपघात
  • रेल्वे अपघात
  • रस्त्यावरील अपघात
  • वन्य प्राणी हल्ला झाल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे
  • खून
  • दंगल
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • नक्षलवाद्यांकडून हत्या

पुढील कारणांमुळे शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही :

  • आत्महत्या
  • नैसर्गिक मृत्यू
  • विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
  • आत्महत्येचा प्रयत्न केल्यास
  • स्वतःला जाणीवपूर्वक जखमी केल्यास
  • अमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला अपघात
  • मोटर शर्यती दरम्यान झालेला अपघात
  • सैन्यामधील नोकरी
  • जवळच्या लाभार्थ्यांकडून किंवा वारासदाराकडून खून
  • युद्ध

Gopinath Munde Apghat Vima Yojana फायदे काय आहेत?

  • शेतामध्ये काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सरकारकडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर आर्थिक अडचण येणार नाही व त्यांची उपासमार होणार नाही.
  • अपघातामध्ये मृत्यू : शेतकऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • पूर्ण अपंगत्व आल्यास : अपघातादरम्यान शेतकऱ्याला पूर्णपणे अपंगत्व आल्यास त्याला २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • अंशतः अपंगत्व आल्यास : अपघातादरम्यान शेतकऱ्याला अंशतः अपंगत्व आल्यास त्याला १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
  • या योजने अंतर्गत इतर लाभ : या योजनेच्या माध्यमातून आणखी काही लाभ मिळणार आहेत उदा, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च इ.

सरकारच्या इतर योजना :

Gopinath Munde Apghat Vima Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • ओळखीचा पुरावा : आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • फोटो : पासपोर्ट साईझ फोटो
  • बँक खात्याची माहिती : बँक खाते पासबुक झेरॉक्स, कॅन्सल चेक
  • जमिनीचा उतारा : ७/१२ उतारा
  • दावा अर्ज
  • अपंगत्वाचा दाखला
  • शेतकरी प्रमाणपत्र : शेतकरी दाखल किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून घेतलेला शेतकरी असल्याचा दाखला
  • FIR कॉपी : पोलिसांनी दिलेली
  • अपघात ग्रस्तांचा वयाचा दाखला : जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला
  • मृत्यूचा दाखला
  • पंचनामा
  • अपघात घटनास्तळ पंचनामा : पोलिसांनी दिलेला
  • पोस्ट मार्टेम रिपोर्ट : डॉक्टरांनी दिलेला
  • औषधोपचाराचे कागदपत्र
  • डिस्चार्ज कार्ड : डॉक्टरांनी दिलेले
  • कृषी अधिकारी पत्र

Gopinath Munde Apghat Vima Yojana साठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील बाबी लक्षात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण समोर येईल त्यावेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी दावा अर्ज करून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज हा संबंधित तालुक्यामध्ये कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
  • या प्रकारे तुम्ही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
महत्वाची माहिती :
  • या योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे, या योजनेचे नाव आता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” असे करण्यात आले आहे.
  • आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर जमीन असणे गरजेचे नाही.
  • नवीन बदलानुसार विमा रक्कम व इतर लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
  • या योजने अंतर्गत आता शेजाऱ्याच्या कुटुंबातील २ सदस्यांना (आई-वडील, मुलगा व अविवाहित मुलगी, पती/ पत्नी या पैकी एकाला) अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.
  • आता सरकार स्वतः विमा लाभ वितरित करणार आहे.
सारांश :

तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने संबंधित सर्व माहिती जाणून घेतली आहे. या योजनेविषयी तुमच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही इथे कंमेंट मध्ये विचारू शकता किंवा आम्हाला ई-मेल द्वारे कळवू शकता. आम्ही तुमच्या ज्या काही शंका किंवा प्रश्न असतील त्याचे लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा आणि ही सोशियल मीडियावर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा लाभ घेता येईल.

1 thought on “गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना : Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024”

Leave a comment