खरीप पीक विमा योजना : Kharip Pik Vima Yojana 2024

Kharip Pik Vima Yojana 2024 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना घेऊन येत असते. आम्ही या पोस्टद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे हे सांगणार आहोत. तसेच या योजनेसाठी पात्रता, उद्देश, फायदे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये सांगितली आहे. तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजने संबंधित कोणतीही शंका येणार नाही.

Kharip Pik Vima Yojana

Kharip Pik Vima Yojana Information in Marathi :

योजनेचे नावपंतप्रधान पीक विमा योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली आहे
योजनेचा उद्देश काय आहे?शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान भरपाई देणे हा या योजेचा मुख्य उद्देश आहे.
लाभार्थीदेशामधील सर्व शेतकरी
लाभ२ लाख रुपयांपर्यंत पीक विमा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Kharip Pik Vima Yojana काय आहे?

  • प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे (दुष्काळ, गारपीट यामुळे) शेतामधील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते. कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या २ टक्के व रब्बी पिकांच्या १.५ टक्के रक्कम विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Kharip Pik Vima Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • पंत प्रधान खरीप पीक विमा योजना ही देशातील दुष्काळ किंवा गारपीट यामुळे होणारे शेतपिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • तसेच शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणे.
  • शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागू नये.

Kharip Pik Vima Yojana पात्रता (Eligibility) :

  • देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

योजने अंतर्गत २३ जुलै २०२४ पूर्वी रजिस्ट्रेशन करा :

  • या योजने अंतर्गत नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाच्या नुकसानाची भरपाई संरक्षण विमाच्या स्वरूपात मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारद्वारे जिल्हा स्तरांवर प्रकल्प अधिकारी आणि सर्व्हेवेक्षकांची निवड केलेली आहे.
  • तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विमा कंपनीने जिल्हा स्तरावर आपल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींचे निरसन करण्यासाठी सरकारद्वारे तक्रार निवारण समिती सुद्धा सुरु केली आहे.
  • या योजने संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी कल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. टोल फ्री क्रमांक : १८०० १८० २११७
  • किंवा या योजने विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही बँक शाखेत किंवा विमा कंपनी यांच्याशी संपर्क करून मिळवू शकता.

खरीप पीक विमा योजना २०२४ विषयी महत्वाची माहिती :

  • खरीप पीक विमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे.
  • पहिल्या ३ वर्षांमध्ये जवळपास १३,००० कोटी रुपयांचे प्रीमियम शेतकऱ्यांनी जमा केलेले होते.
  • आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना ६०,००० कोटी रुपये पर्यंतचा पीक विमा मिळालेला होता.
  • ही योजना सध्या २७ राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरु आहे.
  • विमा कंपन्यांकडून मिळालेली प्रीमियमची रक्कम ही शिक्षण, माहिती व दळणवळण या कामांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी खर्च केली जाते.
  • या योजने अंतर्गत सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे आणि सर्व लाभार्थ्यांना संपर्क साधला जात आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याजवळ आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.

पीकपेरा स्वघोषणापत्र PDF डाउनलोड :

खरीप पीक योजनेच्या अर्जासोबत पीकपेरा स्वघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. या स्वघोषणापत्रावर आवश्यक माहिती भरून ते पीक विमा पोर्टलवर अपलोड करायचे आहे. पीकपेरा स्वघोषणापत्र डाउनलोड करण्याची लिंक इथे दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता. पीक पेरा स्वघोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारच्या इतर योजना :

Kharip Pik Vima Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स
  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • पीक विमा माहिती अर्ज
  • पीकपेरा घोषणापत्र
  • पीक विमा प्रीमियम शुल्क

Kharip Pik Vima Yojana साठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्ही खाली दिलेल्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता.

  • तुमच्या विभागातील कृषी सह संचालक
  • नजीकच्या बँका
  • CSC सेंटर
  • तालुका कृषी अधिकारी

किंवा

  • प्रधान मंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सर्व प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्हाला नवीन अकॉउंट उघडायचे आहे, त्यासाठी तुम्हाला Registration हे प्रक्रिया करावी लागेल.
  • नवीन खाते बनवण्यासाठी Registration या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानतंर तिथे विचारलेली माहिती भरून रेजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर वेबसाईट वर लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म दिसेल, तो फॉर्म काळजीपूर्वक वाचून भरायचा आहे व आवश्यक कागदपत्र अपलोड करून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे
  • अशा प्रकारे तुम्ही Pradhan Mantri Fasal Bima Yojana/ Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

2 thoughts on “खरीप पीक विमा योजना : Kharip Pik Vima Yojana 2024”

Leave a comment