विलासराव देशमुख अभय योजना : Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 : विलासराव देशमुख अभय योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत वीज बिलाची वसुली केली जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कृषी ग्राहक सोडून इतर सर्व ग्राहकांना लाभ देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी थकबाकी भरलेली नाही, अशा ग्राहकांना 31 डिसेंबर 2021 च्या अगोदर वीज जोडणी ही खंडित करण्यात आलेली आहे.

या ग्राहकांकडून थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विलासराव देशमुख अभय योजना नक्की काय आहे, योजनेचे फायदे काय आहेत, योजनेसाठी पात्रता, योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी कोणतीच शंका येणार नाही.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024

Vilasrao Deshmukh Abhay Yojana Information in Marathi :

योजनेचे नावविलासराव देशमुख अभय योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा मुख्य सवलत देऊन उद्देश थकीत वीज बिलाची वसुली करणे
लाभार्थी३१ डिसेंबर २०२१ अगोदर ज्यांची वीज जोडणी कायमची खंडित करण्यात आलेली आहे असे वीज ग्राहक
लाभ१०० टक्के सवलत दिली जाईल
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Vilasrao Deshmukh Abhay Yojana काय आहे?

  • विलासराव देशमुख अभय योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारचा सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत थकबाकी असलेल्या वीज बिलाचे वसुली केली जाईल. या योजनेची मुदत ही 01 मार्च ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. रेडमी च्या माध्यमातून कृषी ग्राहक सोडून इतर सर्व ग्राहकांना त्यांच्या थकबाकी असलेल्या वीज बिलावर व्याज व जो विलंब शुल्क आहे तो माफ केला जाईल. जे ग्राहक एकाच वेळी संपूर्ण थकबाकी रक्कम जमा करतील, अशा सर्व ग्राहकांना व्याज व विलंब शुल्कामध्ये 100 टक्के सवलत दिली जाईल.
  • तसेच, हाय टेन्शन विज कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना एक्स्ट्रा 5% आणि कमी टेन्शन असणाऱ्या ग्राहकांना जी मूळ रक्कम आहे त्याच्या 10% सूट देण्यात येईल.
  • राज्य सरकारने मूळ शिल्लक रकमेच्या 30% एकाच वेळी व राहिलेली रक्कम ही 6 हप्त्यात जमा करण्याचा पर्याय वीज ग्राहकांसाठी दिला आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana पात्रता :

विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदार व्यक्तींना पात्रतेसाठी पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • तसेच, फक्त त्याच ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल, ज्यांचे वीज कनेक्शन ३१ डिसेंबर २०२१ अगोदर त्यांनी वीज बिल न भरल्यामुळे कायमचे बंद केले आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा मुख्य उद्देश वीज बिलावरचा एक्सट्रा शुल्क व व्याज माफ करणे आणि थकीत असलेल्या वीज बिलाची वसुली करणे हा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांचे थकीत असणारे वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहान दिले जाते.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana फायदे :

  • विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील ग्राहकांना त्यांचे थकीत असणारे वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • तसेच थकीत असणारे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क देखील माफ केला जाणार आहे.
  • त्याचप्रमाणे, जे ग्राहक एकाच वेळी वीज बिलाची रक्कम भरतील त्यांना सरकारकडून १०० टक्के व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे.
  • तसेच या योजने मार्फत ग्राहकांना वीज बिलाच्या ३० टक्के रक्कम ही एक रकमी आणि राहिलेली रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय दिला जातो.

सरकारच्या इतर योजना :

  • कुक्कुट आणि शेळी पालन करण्यासाठी शेड बांधणे, गाई व म्हशींसाठी गोठा बांधणे यासाठी – शरद पवार ग्राम समृद्धी योजना
  • ऑनलाईन ७/१२ व ८ अ उतारा काढण्यासाठी संपूर्ण माहिती – Online Satbara
  • ११ ते १८ वयोगटातील मुलींना शारीरिक व मानसिक विकासासाठी मोफत प्रशिक्षण त्यासाठी – किशोरी शक्ती योजना

Vilasrao Deshmukh Abhay Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • वीज बिल
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • रेशन कार्ड

Vilasrao Deshmukh Abhay Yojana साठी अर्ज ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :

  • विलासराव देशमुख अभय योजेनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला सरकारच्या महावितरणच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यायची आहे.
  • वेबसाईटच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला होमपेजवरती, डाव्या बाजूस असणाऱ्या नवीन वापरकर्ता नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला नोंदणीसाठीचा फॉर्म दिसेल.
  • आता तुम्हाला नोंदणीच्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. उदा. तुमचा वीज बिलावरील ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, लॉगिन साठी युजरनेम आणि पासवर्ड इ.
  • नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिनचे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अकॉउंटस हे पेज दिसेल, इथे तुम्हाला सब्स्क्रायबर नंबर निवडायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला “विलासराव देशमुख अभय योजना” या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्या समोर एक अर्ज दिसेल, या अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • आणि नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत व अर्ज सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही विलासराव देशमुख अभय योजनेसाठी अर्ज शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला जर Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2024 योजने संबंधित माहिती आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच या योजने विषयी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता.

Leave a comment