Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 : मित्रांनो आज आपण वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश नागरिक ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्या जवळपासच्या भागात वन्य प्राण्यांचा वावर असतो. जसे की वाघ, बिबट्या, लांडगा, तरस, कोल्हा, अस्वल, मगर, हत्ती, माकड किंवा वानर, रान कुत्रे या प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, अपंगत्व किंवा गंभीर जखमी होतात.
काही वेळेस वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मनुष्य मृत्यू होत नाही, पण गंभीर किंवा किरकोळ जखमी होण्याची शक्यता असते. जखमी व्यक्तीला योग्य ते व लवकरात लवकर उपचार मिळावेत आणि ते स्कीय रुग्णालयामध्ये मिळावेत यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न करण्यात येतात व त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात येतो. काही वेळेस शासकीय रुग्णालयामध्ये उपयुक्त असणारे संसाधन उपलब्ध नसते, अशावेळी जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयामध्ये घेऊन तातडीचा उपचार करावा लागतो.
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे |
योजनेचा उद्देश काय आहे? | औषध उपचारासाठी आर्थिक मदत पुरवणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | २५ लाखांचे आर्थिक साहाय्य |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
शासनाचा निर्णय (GR) | GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 काय आहे?
- ग्रामीण भागामध्ये काही वेळेस शेतामध्ये काम करत असणारे नागरिक किंवा कामानिमित्त बाहेर जाताना त्यांच्यावर वन्य प्राण्यांचा हल्ला होतो व ते जखमी होतात. ग्रामीण भागामध्ये बरेच नागरिक दारिद्र रेषेखालील जीवन जगत असतात, त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाल्यानंतर औषध उपचारा साठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. त्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्य सरकारने या सर्व समस्यांचा विचार करून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी किंवा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी आवश्यक आहे.
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील एखाद्या व्यक्ती जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये नागरिकांना उपचार करायला लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एखादा व्यक्ती जखमी झाला असल्यास त्याच्या औषधोपचारासाठी किंवा त्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे.
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 फायदे काय आहेत?
- पीक नुकसान : नुकसान झालेल्या पिकाच्या बाजारभावाच्या ७५% पर्यंत मदत केली जाईल.
- मच्छिमारी साहित्य नुकसान : नुकसान झालेल्या मच्छिमारी साहित्याची संपूर्ण नुकसान भरपाई.
- पशुधन जखमी : जखमी पशुधनासाठी उपचार खर्च मिळेल व तसेच पशुधन अपंग झाल्यानंतर १५,०००/- रु. पर्यंत मदत केली जाईल.
- पशुधन मृत्यू ; मृत पशुधनासाठी बाजारमूल्य किंवा १५,०००/- रु. पर्यंत मदत केली जाईल.
- मानवी जीवितहानी : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना २५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
वन्य प्राणी हल्ला झाल्यास नुकसान भरपाई योजना अंतर्गत सहाय्य रक्कम पुढीलप्रमाणे आहे :
तपशील | अर्थसहाय्य रक्कम |
व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्यास | औषध उपचारासाठी येणार खर्च देण्यात येईल. मात्र खाजगी रुग्णालयामध्ये औषध उपचार करणे अनिवार्य असल्यास त्याची मर्यादा ५०,०००/- रु. प्रति व्यक्ती इतकी असेल. |
व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास | ५ लाख रुपये |
व्यक्ती कायम स्वरूपी अपंग झाल्यास | ७.५० लाख रुपये |
व्यक्तीचा मृत्यू झाल्यास | २५ लाख रुपये |
वन्य प्राणी हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य रकमेपैकी 10,00,000/- लाख रुपये इथे असलेल्या व्यक्तीला तात्काळ दिले जातील. आणि उर्वरित रक्कम 10,00,000/- रुपये 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्यात येतील व उर्वरित 5,00,000/- रू. 10 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्यात येतील. आणि दहा वर्षानंतर वारसदारांना पूर्ण काढता येईल.
सरकारच्या इतर योजना :
- राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीमध्ये असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यासाठी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana 2024
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना खूप कमी खर्चामध्ये प्रवासाचा लाभ घेता यावा यासाठी : आवडेल तेथे प्रवास योजना 2024 : Aavdel tithe kothehi pravas Yojana
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
- वन अधिकारण्यांचा दाखला
- मृत्यू दाखला
- FIR
- शव विच्छेदन अहवाल
Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024 साठी अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम अर्जदारला वनविभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर ‘वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ति जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजूर करणे’ यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर आता एक नवीन अर्ज उघडेल, चार जणांमध्ये विचारलेले सर्व माहिती काळजीपूर्वक भरून त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुमच्या अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
- वन अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या अर्जाची व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला लाभाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल.
2 thoughts on “वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना : Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024”