उज्वला गॅस योजना (गॅस फ्री मिळणार) : Ujjwala Gas Yojana Marathi 2024

Ujjwala Gas Yojana Marathi : तर मित्रांनो, या पोस्ट मध्ये आज आपण उज्वला गॅस योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना नक्की आहे तरी काय? कोण या योजनेसाठी पात्र ठरू शकतील? आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये दिलेली आहे. तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय अंतर्गत ग्रामीण व वंचित कुटुंबांना LPG सारखे स्वयंपाकासाठी इंधन मिळावे यासाठी मे 2016 मध्ये “प्रधानमंत्री उज्ज्वला योजना” (Ujjwala Gas Yojana Marathi) ही योजना सुरु करण्यात आली. केंद्र सरकार प्रत्येक वेळी नवीन योजना घेऊन येत असतं त्यापैकी ही एक योजना आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून ग्रामीण भागातील गोर-गरीब कुटुंबातील लोकांना तसेच बीपीएल कार्ड असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे.

Ujjwala Gas Yojana Marathi

Ujjwala Gas Yojana 2024 :

त्याचप्रमाणे सरकारने LPG गॅस च्या किमतीमध्ये २०० रुपयांची सूट दिलेली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या तर्फे घोषणा करण्यात आली होती की, केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मध्ये महिलांना ७५ लाख इतके फ्री मध्ये LPG कनेक्शन देण्यांत येणार आहे. हे कनेक्शन २०२६ पर्यंत असणार आहे. केंद्र सरकारने यासाठी तेलाच्या कंपन्यांना १६५० कोटी रु. देण्याची मान्यता दिलेली आहे.

आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या द्वारे बलिया, उत्तर प्रदेश याठिकाणी ०१ मे २०१६ रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजने मार्फत मार्च २०२० रोजी पर्यंत गरीब कुटुंबांना ०८ कोटी LPG कनेक्शन देण्याचे योजले होते. केंद्र सरकार मार्फत ७ सप्टेंबर २०१९ रोजी, महाराष्ट्रामधील औरंगाबाद मध्ये ८ कोटी एवढे LPG कनेक्शन देण्यात आले.

Pradhan Mantri Ujjwala Yojana In Marathi :

योजनेचे नावपीएम उज्ज्वला योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सुरु करण्यात आली
कधी सुरु करण्यात आली०१ मे २०१६
योजनेचा उद्देशदेशातील गरीब नागरिकांना मोफत गॅस कनेक्शन देणे
लाभार्थींदेशातील महिला
श्रेणीकेंद्र सरकार योजना
संबंधित मंत्रालयपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
अर्ज करण्याची प्रक्रियाया योजनेसाठी Online पद्धतीने अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmuy.gov.in

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

Ujjwala Gas Yojana Marathi ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की स्वयंपाकघर हे धूरमुक्त करणे. तसेच स्वयंपाक बनवण्यासाठी एक स्वच्छ इंधन पुरवणे जेणेकरून महिलांच्या सक्षमीकरणालाही चालना देता येईल. तसेच या योजनेमुळे गरीब व छोट्या कुटुंबातील महिलांना LPG सिलिंडर मिळेल. आत्तापर्यंतच्या योजनांपैकी ही केंद्र सरकारची सगळ्यात जास्त यशस्वी झालेली योजना आहे.

Ujjwala Gas Yojana Marathi योजनेसाठी पात्रता :

  • अनुसूचित जातीमधील कुटुंब
  • अनुसूचित जनजातीमधील कुटुंब
  • सर्वाधिक मागासवर्गीय
  • चहा आणि माजी चहा मळा जमाती
  • वनवासी
  • प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
  • बेटांवरील व नदी बेटांवरील रहिवासी
  • १४ कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंबे
  • अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • एकाच घरात इतर कोणतेही LPG कनेक्शन असू नये.
  • त्याच घरामध्ये कोणालाही OMC तर्फे कोणतेही LPG कनेक्शन मिळालेले नसावे.

वरीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला Ujjwala Gas Yojana Marathi या योजनेसाठी पात्र असेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे फायदे :

या योजने अंतर्गत गॅस कनेक्शन साठी केंद्र सरकार तर्फे रोख मदत करण्यात येणार आहे. (5 किलो सिलेंडर साठी 1150/- रु. आणि 14.2 किलो सिलेंडर साठी 1600/- रु.)

  • सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव म्हणून – 5 किलो सिलेंडरसाठी 800/- रु. आणि 14.2 किलो सिलेंडरसाठी 1250/- रु.
  • LPG नळी : 100 रु.
  • प्रेशर रेग्युलेटर : 150 रु.
  • घरगुती गॅस ग्राहक कार्ड : 25 रु.
  • गॅस कनेक्शनची तपासणी / मांडणी/ प्रात्यक्षिक शुल्क : 75 रु.
  • त्याचबरोबर, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ओएमसी तर्फे पहिले LPG रिफील आणि स्टोव्ह हे दोन्ही मोफत देण्यात येणार आहे.

सरकारच्या इतर योजना :

उज्ज्वला गॅस योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदाराचे आधारकार्ड (आसाम व मेघालय या राज्यांमध्ये आधार कार्ड सक्तीचे नाही, त्याऐवजी रेशन कार्ड असेल तरी चालेल)
  • ओळखपत्राचा दाखला
  • पत्त्याचा दाखला
  • रेशन कार्ड किंवा स्थलांतरित कुटुंबासाठी स्वघोषणापत्र आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या स्वाक्षरीसोबत १४ मुद्द्यांचे विहित नमुन्यामधील स्व-घोषणापत्र
  • अर्जदाराकडून ओएमसी पोर्टलवर सादर करण्यात येणारे दस्तऐवज.
  • ग्राहकाच्या गॅस वापरण्याच्या ठिकाणी जोडणी-पूर्व अहवाल म्हणजेच फ्री इन्स्टॉलेशन चेक रिपोर्ट.

Ujjwala Gas Yojana Marathi या योजनेसाठी अर्जदार ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास थेट वितरकाकडे जाऊन ऑफलाईन अर्जाद्वारे नोंदणी करू शकतात.

How to Apply Ujjwala Gas Yojana Marathi 2024 Online?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही. पण तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि लाभ घेऊ शकता. ऑफलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

  • या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्राप्त करण्यासाठी तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्यावी लागेल किंवा Ujjwala Gas Yojana Marathi च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज डाउनलोड करू शकता.
  • अर्ज डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिला तुम्हाला www.pmuy.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल.
  • ही वेबसाईट ओपन केल्यानंतर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  • त्यानंतर तुम्हाला या पेज वर डाउनलोड फॉर्म हा पर्याय दिसेल, तुम्हाला यावर क्लिक कार्याचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
  • त्यानंतर आता डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे.
  • प्रिंट काढल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचून आवश्यक ती माहिती नीट भरून घ्यायची आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी जोडायची आहेत.
  • त्यानंतर तुमच्या जवळील गॅस एजन्सीमध्ये जाऊन सर्व कागदपत्र सबमिट करायची आहे.
  • अशा प्रकारे उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला मोफत LPG गॅस कनेक्शन मिळेल.

1 thought on “उज्वला गॅस योजना (गॅस फ्री मिळणार) : Ujjwala Gas Yojana Marathi 2024”

Leave a comment