Sukanya Samriddhi Yojana Marathi : सरकार दरवर्षी नवनवीन योजना घेऊन येत आहे. त्याचप्रमाणे यावेळी ही केंद्र सरकार द्वारे नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजने संबंधित संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच ही योजना काय आहे? या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहेत? या योजनेसाठी पात्रता काय आहे? आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टी पण या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.
आपल्या देशातील मुलींसाठी खास ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचे भविष्य सुरक्षित व उज्वल बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये मुलीच्या नावाने खाते उघडण्यात येते. आणि मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होण्याअगोदर हे खाते उघडण्यात येते.
Sukanya Samriddhi Yojana Marathi :
भारतातील कोणत्याही व्यक्तीच्या मुलीचे वय हे १० वर्षांपेक्षा कमी असल्यास तो व्यक्ती सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करू शकतो. सध्या या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेमध्ये कमीत कमी 250 रू. आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रु. गुंतवणूक करता येते. तसेच 15 वर्षांसाठी आपण या योजनेत योगदान देऊ शकतो.
या योजनेमध्ये साधारणता मुलगी जन्माला आल्यानंतर ते 10 वर्षांची होईपर्यंत आपण कधीही खाते उघडू शकतो. तसेच मुलीचे वय 18 वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या पालकांद्वारे गुंतवणुकीची रक्कम जमा करू शकतात. एकदा मुलगी 18 वर्षांची झाली की ती स्वतः तिचे खाते चालवू शकते.
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली | ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश | या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे भविष्य आर्थिक दृष्टीने सुरक्षित करणे हा आहे. |
लाभार्थी | ० ते १० वर्षे या दरम्यान असणारा मुली |
वर्ष | २०२४ |
गुंतवणुकीची रक्कम | कमीत कमी २५०, जास्तीत जास्त १.५० लाख |
गुंतवणुकीचा कालावधी | १५ वर्षांपर्यंत |
व्याज दर | ८% प्रतिवर्ष |
Sukanya Samriddhi Yojana Details :
या योजनेसाठी खाते कोण उघडू शकतो :
- जर मुलगी 10 वर्षांच्या आत असेल तर मुलीच्या नावाने पालकांद्वारे खाते उघडता येते.
- पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेमध्ये मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू शकतो.
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते. जुळ्या मुली असतील तर त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त खाते उघडता येतात.
ठेवी रक्कम :
- आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी ठेव 250 रू. आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रु. पर्यंत करता येते.
- सुरू झालेल्या तारखेपासून ते जास्तीत जास्त 15 वर्षांपर्यंत ठेवता येऊ शकते.
- एका वर्षात कमीत कमी 250 रू. खात्यामध्ये जमा केले नसतील, तर ते खाते डिफॉल्ट खाते मानले जाते.
- खाते उघडल्यापासून ते पंधरा वर्षे पूर्ण होण्याअगोदर कमीत कमी रुपये भरून खाते पुन्हा चालू करता येते.
- आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार ठेवी मध्ये वजावट सुद्धा केली जाऊ शकते.
Documents Required for Sukanya Samriddhi Yojana Marathi
- पालकांचे पॅन कार्ड व आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र
सुकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर हा 8.2 टक्के झाला आहे
- केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांना या वर्षी व्याजदरात वाढ करून मिळणार आहे.
- या योजनेसाठी याअगोदर गुंतवणूकदारांना ८ टक्के व्याज दिले जात होते, पण जानेवारी महिन्यापासून सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के केला आहे.
- सरकारने इतर योजनांच्या व्याज दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. सुकन्या समृद्धी योजना सोडून बाकीच्या कोणत्याही योजनेसाठी व्याजदरांमध्ये वाढ केलेली नाही.
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेमध्ये व्याजदरांमध्ये या वर्षी ०.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Sukanya Samriddhi Yojana Marathi Information :
- समजा मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी पास झाल्यानंतर तिच्या खात्यातील पैसे काढता येतात.
- मागील वर्षाच्या शेवटी जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्या रकमेच्या 50% पर्यंत पैसे काढता येतात.
- एक रकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात, प्रत्येक वर्षात एक पेक्षा जास्त काढता येत नाहीत.
Sukanya Samriddhi Yojana Marathi अचानक बंद होणे :
- या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी खाली दिलेल्या अटीनुसार खाते बंद केले जाऊ शकते :
–> खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर किंवा अत्यंत दयाळू कारणामुळे - खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू
- संपूर्ण कागदपत्रे व खाते बंद करण्यासाठी आवश्यक असलेला अर्ज.
- खाते बंद करण्या अगोदर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते पासबुकसह अर्ज सबमिट करावे लागेल.
सरकारच्या इतर योजना :
- आंतरजातीय विवाह केल्यास २.५० लाख रु. मिळणार : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra
- Bal Sangopan Yojana Maharashtra । मुलांना मिळणार २५५०/- रु. प्रति महिना
- लखपती दीदी योजना, महिला लखपती होणार : Lakhpati Didi Yojana Maharashtra in Marathi 2024
Sukanya Samriddhi Yojana Marathi कालावधी किती आहे :
सुकन्या समृद्धी योजनेसाठी, मॅच्युरिटीचा कालावधी हा २१ वर्षांचा आहे, पण या योजनेसाठी तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही गुंतवणूक बंद केली तर ६ वर्षानंतर खाते मॅच्युअर होते, आणि योजनेनुसार दिलेले व्याज हे तुमच्या ठेवलेल्या रकमेवर ६ वर्षे मिळते. यामध्ये तुम्हाला चक्रवाढीचा लाभ सुद्धा घेता येतो.
तुम्ही जर नवीन जन्माला आलेल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाद्य उघडले तर मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल. तसेच तुम्ही जर तुमच्या ४ वर्षांच्या मुलीसाठी या योजनेअंतर्गत खाते उघडले असल्यास, मुलगी २५ वर्षांची झाल्यानंतरच तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम मिळेल. आणि मुलगी जर १८ वर्षांची झाली.
सुकन्या समृद्धी योजना देणाऱ्या बँक खालील प्रमाणे आहेत :
सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन खाते उघडायचे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिस मधून त्यासाठी अर्ज मिळवू शकता किंवा खाजगी बँके मधून सुद्धा घेऊ शकता. किंवा या योजनेसाठी नवीन खाते उघडण्याचा फॉर्म तुम्ही RBI च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- इंडियन ओव्हरसीज बँक
- पंजाब आणि सिंध बँक
- युको बँक
- बँक ऑफ बडोदा
- IDBI बँक
- HDFC बँक
- कॅनरा बँक
- ॲक्सिस बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
- ICICI बँक
- पंजाब नॅशनल बँक
सुकन्या समृद्धी योजना 2024 महाराष्ट्र अर्ज :
- सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडायचे असल्यास, सगळ्यात पहिला तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा वर दिलेल्या कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर, तुम्हाला या अर्जामध्ये पालकांची माहिती भरायची आहे जे पालक खाते उघडणार आहेत आणि मुलीच्या वतीने गुंतवणूक करणार आहेत.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसोबत आणि प्रीमियमच्या रकमेसोबत अर्ज पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये सबमिट करायचा आहे.
- या पद्धतीने तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकता.
- तसेच खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
2 thoughts on “Sukanya Samriddhi Yojana Marathi : सुकन्या समृद्धी योजना २७ लाख मिळणार”