Ramai Awas Yojana 2024 : तर मित्रांनो आज आपण रमाई घरकुल योजना काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय आहे? योजनेचे फायदे काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टद्वारे पाहणार आहोत. अचूक माहितीसाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची अचूक माहिती मिळेल आणि लाभ घेता येईल.
ही योजना राज्य सरकार द्वारे महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब कुटुंबातील लोकांना ज्यांना राहायला स्वतःचे घर नाही आणि जे स्वतःचे घर बांधू शकत नाहीत अशा गरीब नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Ramai Awas Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | रमाई आवास योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | महाराष्ट्र सरकारद्वारे |
योजनेचा उद्देश काय आहे? | आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबांना पक्के घर बांधून देणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील अशी कुटुंबे ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही. |
लाभ | मोफत घर बांधून दिले जाणार आहे. |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाईन |
रमाई आवास योजना अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Ramai Awas Yojana 2024 काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकातील लोकांचे राहणीमान सुधारावे आणि त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न या दृष्टिकोनातून ग्रामीण व शहरी भागामध्ये अशा नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर किंवा जिथे त्यांचे कच्चे घर आहे त्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 51 गरीब घरातील कुटुंबांना त्यांचे स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या योजनेमार्फत गरीब घरातील कुटुंबांना 1.5 लाखांपेक्षा जास्त घरे बांधून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील जास्त करून गरीब घरातील कुटुंब जे की दारिद्र्य रेषेखाली त्यांचे जीवन जगत आहेत. अशा लोकांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्याचबरोबर त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर सुद्धा नसते. बरीच कुटुंबे वर्षानुवर्षे कच्च्या किंवा पडक्या घरात राहत आलेले आहेत, यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा नैसर्गिक आपत्यांचा सामना करावा लागतो. काही वेळेस काय होते की वादळामध्ये अशा कच्च्या किंवा पडक्या घरांचे नुकसान होते आणि त्यामुळे कुटुंबातील लोकांची जीवित हानी होण्याची शक्यता असते. आर्थिक दृष्टीने कमजोर असल्यामुळे गरीब लोकांना बँकेकडून कर्ज मिळणे सुद्धा शक्य होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्यातील सरकारने गोरगरीब लोकांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून Ramai Awas Yojana 2024 सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Ramai Awas Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्ज कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- रमाई आवास योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना लाभ घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार कुटुंबाने या अगोदर केंद्र सरकारद्वारे किंवा राज्य सरकार द्वारे असलेल्या एखाद्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबाकडे स्वतःची पक्के घर नसले पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या कुटुंबातील नवरा व बायको अशा दोघांचे राष्ट्रीय बँकेमध्ये Joint Account असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली असणे आवश्यक आहे व तसेच कुटुंबातील आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
- तसेच अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसावा.
- अर्ज करणारे कुटुंब हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्याचप्रमाणे नऊ बौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे कुटुंब हे ग्रामीण भागात राहत असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- अर्ज करणारे कुटुंब जर नगरपरिषद असलेल्या क्षेत्रात राहत असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 50 रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- आणि अर्जदार कुटुंब महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
Ramai Awas Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील गरीब घरातील कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसेल आणि या प्रवर्गातील जे लोक स्वतःचे घर बांधू शकत नाहीत, अशा कुटुंबातील लोकांना राहण्यासाठी घर बांधून देणे हा रमाई घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे असे म्हणता येईल.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लोकांचे स्वतःचे घर नाही अशा कुटुंबातील लोकांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील अशा गरीब कुटुंबांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
- गरीब घरातील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि महाराष्ट्र राज्याची प्रगती करणे.
Ramai Awas Yojana 2024 या योजनेचे फायदे काय आहेत?
- नैसर्गिक आपत्ती पासून जसे की, वादळ, वारा, पाऊस यापासून होणाऱ्या कच्च्या व पडक्या घरांचे नुकसान आणि कुटुंबातील सदस्यांना होणारी हानी टाळण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अशा कुटुंबांचे रक्षण होईल.
- तसेच या योजनेमुळे गरीब घरातील कुटुंबांचे जीवनमान सुधारेल.
- दारिद्र रेषेखालील कुटुंबांची प्रगती होईल तू अशा कुटुंबांना स्वतःची घर बांधण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना कर्ज घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही.
सरकारच्या इतर योजना :
- कलाकार मानधन योजना 2024, असा करा अर्ज । Kalakar Mandhan Yojana Maharashtra
- मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३,०००/- रु. | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
- लखपती दीदी योजना, महिला लखपती होणार : Lakhpati Didi Yojana Maharashtra in Marathi 2024
Ramai Awas Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल ID
- बँक खात्याचा तपशील
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मतदान कार्ड
- अर्जदार विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- घर बांधण्याच्या जागेत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे हमीपत्र
- या अगोदर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही याचे हमीपत्र
- अर्जदार पूरग्रस्त असेल तर त्याचा दाखला
- १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर टाईप केलेलं प्रतिज्ञापत्र
- वीज बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टी यापैकी एक कागदपत्र
- महानगरपालिका किंवा नगरपालिकेत मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत
Ramai Awas Yojana 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम जवळच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जावे लागेल.
- ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गेल्यानंतर तिथून रमाई घरकुल योजनेसाठीचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जमा करायचा आहे.
- या प्रकारे तुम्ही रमाई घरकुल योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Ramai Awas Yojana 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- रमाई आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला रमाई घरकुल योजना यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर आता एक अर्ज दिसेल, त्या अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुम्ही रमाई आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
1 thought on “रमाई घरकुल योजना 2024 अर्ज सुरु । Ramai Awas Yojana 2024 Online Registration”