पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांची संपूर्ण माहिती : Post Office Saving Scheme 2024

Post Office Saving Scheme 2024 : मित्रांनो, पोस्ट ऑफिसद्वारे बँके प्रमाणेच विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येईल. आज आपण पोस्ट ऑफिसच्या ज्या काही बचत योजना आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना नक्की काय आहे, या योजनेचे फायदे काय आहेत, उद्दिष्ट, पात्रता, योजनेचे प्रकार कोणते आहेत इत्यादी.

Post Office Saving Scheme 2024

Post Office Saving Scheme 2024 काय आहे?

  • भारतीय डाक विभागाचे नाव तुम्हाला माहित असेलच. इंडिया पोस्ट बँक ही गुंतवणूकदार नागरिक आहेत त्यांच्यासाठी विविध Savings Scheme सुद्धा चालवते. या सेविंग स्कीम्सना आपण Post Office Bachat Yojana किंवा Post Office Saving Scheme असे ओळखतो.
  • पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यासाठी जास्त व्याजदर मिळतो. तसेच आयकर कायद्याच्या 80C या कलमानुसार पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरती कर सूट दिली जाते.

पोस्ट ऑफिस बचत योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार :

  • सामान्य खात्यांप्रमाणेच, सुकन्या समृद्धी व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसारख्या शासनाच्या बचत योजने अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये पैसे ऑनलाईन पदतीने जमा केले जाऊ शकतात. Post Office Saving Scheme 2024
  • हे पैसे Mobile App द्वारे जमा करता येतात. हे पैसे भारतीय पोस्ट पेमेंट बँक, सुकन्या समृद्धी योजना किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते इ. सारख्या कोणत्याही पोस्ट ऑफिस योजनेमध्ये जमा करता येतात.
  • पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये IPPB नावाचे मोबाइल App डाउनलोड करायचे आहे.
  • या App च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही खात्यामध्ये पैसे पाठवू शकता, खात्यामधील शिल्लक तपासू शकता, तसेच व्यवहार करू शकता आणि पाहू शकता. या सर्व गोष्टी करण्यासाठी या अगोदर पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागत होते. परंतु मोबाईल अँपच्या माध्यमातून हे सर्व आपण ऑनलाईन करू शकतो.

Post Office Saving Scheme 2024 उद्देश :

  • ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गुंतवणूक करणारे नागरिक आर्थिक दृष्टीने मजबूत होतील.
  • Post Office Saving Scheme अंतर्गत अनेक योजनांचा समावेश आहे, या योजना सर्व वर्गातील लोकांना लक्षात घेऊन सुरु कण्र्यात आल्या आहेत.
  • या योजने अंतर्गत इतर अनेक योजना असल्यामुले जास्तीत जास्त लोक पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत.

पोस्ट ऑफिस बचत योजनांचे प्रकार :

पोस्ट ऑफिस बचत योजने अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे प्रकार खाली दिलेले आहेत :

Post Office Saving Account (SA) :

  • पोस्ट ऑफिस सेविंग अकाऊंट हे बँक खात्या सारखेच असते. पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजदर हे ४% ठेवण्यात आलेले आहे. या खात्यामध्ये कमीत कमी ५० रु. ठेवणे बंधनकारक आहे.

Post Office Time Deposit Scheme (TD) :

  • तुम्हाला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. या योजनेमध्ये कमीत कमी २०० रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
  • या योजने अंतर्गत उघडलेले खाते इतर कोणत्याही खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात. तुम्हाला १, २ व ३ वर्षाच्या ठेवींवरती ५.५% व्याज दर ठेवला आहे. आणि ५ वर्षांसाठी ठेवींवरती ६.७% व्याजदर ठेवलेला आहे.

Public Provident Fund :

  • सार्वजनिक भविष्य निधी ही एक लॉन्ग टर्म/ दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेसाठीचा कालावधी हा १५ वर्षे आहे. तसेच या योजनेसाठी ७.१% व्याजदर मिळणार आहे. या योजने अंतर्गत तुम्ही कमीत कमी ५०० रु. आणि जास्तीत जास्त १,५०,०००/- रु. गुंतवणूक करू शकता.

Kisan Vikas Patra :

  • किसान विकास पत्र योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजने मार्फत ६.९ टक्के इतका व्याजदर ठेवण्यात आलेला आहे. या योजने अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी ९ वर्षे ४ महिने एवढा कालावधी असून कमीत कमी १००० रु. एवढी रक्कम गुंतवणुकीसाठी आवश्यक आहे.

Senior Citizen Saving Scheme :

  • सिनियर सिटीझन सेविंग योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. Post Office Saving Scheme 2024 तसेच या योजनेसाठी ७.४ टक्के व्याजदर मिळणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणुकीची रक्कम ही १५,००,००० रुपये एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय ६० वर्षे पूर्ण असले पाहिजे.

सरकारच्या इतर योजना :

1 thought on “पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांची संपूर्ण माहिती : Post Office Saving Scheme 2024”

Leave a comment