PM Svanidhi Yojana in Marathi : तर आता व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत व्यवसायासाठी मिळणार ५०,०००/- रु. कर्ज. ही योजना सामान्यतः व्यापारी तसेच फेरीवाले लोकांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मदत होईल. देशातील लहान व्यापारी तसेच यांचे उत्पन्न कमी आहे असे व्यापारी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजने अंतर्गत व्यवसाय वाढवण्यासाठी छोट्या प्रमाणात कर्ज मिळते त्यामुळे फक्त छोटे आणि मध्यम वर्गीय व्यापाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना २०२४ बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. जसे की या योजनेचा लाभ कसा घेता येईल, योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो हे सर्व सांगितले आहे.
PM Svanidhi Yojana in Marathi
ही योजना सुरु करण्याचा निर्णय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ०१ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. स्वनिधी योजनेतर्फे, केंद्र सरकारकडून आपल्या देशातील लहान रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरु करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी ५०,०००/- रु. पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रीलेंट फंड या नावाने सुद्धा ओळखली जाते. तर मित्रांनो, या पोस्टच्या माध्यमातून आम्ही PM Svanidhi Yojana in Marathi या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
PM Svanidhi Yojana Information in Marathi
योजनेचे नाव | PM Svanidhi Yojana |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली | ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
फायदा | या योजनेतून ५०,०००/- रु. पर्यंत कर्ज मिळणार आहे. |
कोणत्या साली सुरु झाली | ०१ जून २०२० |
लाभार्थी | देशातील लहान आणि माध्यम वर्गीय व्यापारी |
अर्जाची प्रक्रिया | या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
अधिकृत वेबसाईट | https://pmsvanidhi.mohua.gov.in/ |
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
PM Svanidhi Yojana in Marathi ही योजना आपल्या देशातील लहान विक्रेत्यांना तसेच फेरीवाल्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे ०१ जून २०२० रोजी सुरु करण्यात आली आहे. तसेच ही योजना सुरु करण्यामागे आणखी काही कारणे आहेत ती खाली दिलेली आहेत. PM Svanidhi Yojana in Marathi
- या योजनेतून लहान व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायासाठी नवीन साहित्य खरेदीसाठी सुद्धा आर्थिक मदत होईल.
- या योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचे व्याज दर हे ७% प्रति वर्ष या प्रमाणे आहे. जे की बाजारातील इतर ठिकाणी मिळणाऱ्या कर्जाच्या तुलनेत कमीच आहे.
- या योजनेद्वारे लहान व्यापाऱ्यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- तसेच डिजिटल व्यवहार करत असलेल्या व्यापाऱ्यांना अर्जाच्या व्याज दरामध्ये सवलत देण्यात येते.
- त्याचप्रमाणे या योजनेचा उद्देश हा देशातील उद्योजकतेला चालना देणे आणि नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण?
- भाजी विक्रेते
- फळ विक्रेते
- चहा विक्रेते
- सुपारीची दुकाने (पानवडी)
- लॉन्ड्री दुकाने (धोबी)
- नाईचे दुकान
- मोची
- स्ट्रीट फूड
- ब्रेड, पकोडे व अंडी विकणारे
- कपडे विकणारे फेरीवाले
- कारागीर उत्पादने
- पुस्तक विक्रेते (स्टेशनरी)
PM Svanidhi Yojana 2024 लाभ
- या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना १०,०००/- रु. ते ५०,०००/- रु. पर्यंत कर्ज मिळू शकते.
- समजा जर कर्जदार वेळेवर कर्ज फेडत असल्यास त्यांना व्याजावर सवलत मिळू शकते.
- तसेच जर कर्ज वेळेवर भरल्यास कोणत्याही प्रकारचा दंडात्मक भरणा आकारला जात नाही.
- ह्या योजने अंतर्गत मिळणारे कर्ज हे स्ट्रीट वेंडर्सना त्यांचा व्यवसायमध्ये वाढ करण्यासाठी तसेच नवीन साहित्य खरेदीसाठी उपयोगी ठरेल.
- या योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट वेंडर्सची (लहान व्यापारी) जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारे केला जात आहे.
PM Svanidhi Yojana 2024 Eligibility (पात्रता)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
- तसेच लहान व्यापारी किंवा फेरीवाला असणे अनिवार्य आहे.
- व्यवसाय सुरु करून ६ महिने झाले असणे गरजेचे आहे.
- व्यापाराचे वार्षिक उत्पन्न हे रु. १.५ लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- कोणत्याही बँकेचे चालू (Current Account) असणे आवश्यक आहे.
- व्यवसायासाठी आधार कार्ड पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना २०२४ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँकेचे खाते
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा पुरावा
PM Svanidhi Yojana आकडेवारी
योजनेसाठी एकूण अर्ज | ३१,४४,९७० |
मंजूर झालेल्या अर्जाची संख्या | १६,२५,५२५ |
आत्तापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला | १०,०७,६३३ |
ऑनबोर्ड केलेल्या शाखांची संख्या | १,४६,९६६ |
योजनेसाठी मंजूर झालेली रक्कम | १,५२१.५६ कोटी रु. |
वितरित केलेली रक्कम | ९८९.३७ कोटी रु. |
प्राप्त झालेल्या LoR अर्जाची संख्या | १२,४५,५ |
How to Apply for PM Svanidhi Yojana 2024
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली स्टेप्स दिल्या आहेत त्या प्रमाणे अर्ज करायचा आहे :
- तुमच्या गावातील जवळच्या बँकमध्ये जा.
- बँकेमध्ये गेल्यानंतर तिथून प्रधानमंत्री योजनेचा अर्जाचा फॉर्म घ्या.
- आता फॉर्म नीट वाचा आणि त्यामध्ये मागितलेली सगळी माहिती काळजीपूर्वक व योग्य ती भरा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रांचा झेरॉक्स कॉपी जोडा.
- नंतर सर्व कागदपत्रे बँकमध्ये जमा करा.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी या बँक कर्ज देऊ शकतात :
- प्रादेशिक ग्रामीण बँक
- सहकारी बँक
- अनुसूचित व्यावसायिक बँक
- स्मॉल फायनान्स बँक
- नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या
- बचत गट बँक
- महिला निधी
- मायक्रोफायनान्स संस्था इ.
सरकारच्या इतर योजना
- महाराष्ट्र बांधकाम कामगार ५,०००/- रु. योजना । Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024
- “आनंदाचा शिधा” रेशन कार्ड धारकांना मिळणार या ४ वस्तू : Anandacha Shida Gudi Padwa 2024
पीएम स्वानिधी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
पीएम स्वानिधी योजनेसाठी फेरीवाले, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, चहा विक्रेते तसेच इतर लहान विक्रेते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
50,000 साठी स्वनिधी योजना काय आहे?
या योजनेमध्ये ५०,०००/- रु. पर्यंत कर्ज मिळू शकते. जसे पहिल्या टप्प्यात १०,०००/- रु. मिळू शकतात हे कर्ज फेडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात २०,०००/- रु. कर्ज पर्यंत कर्ज मिळू शकते आणि या दुसऱ्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५०,०००/- रु. पर्यंतचे कर्ज मिळू शकते.
1 thought on “व्यवसायासाठी मिळणार ५०,०००/- रु. कर्ज । PM Svanidhi Yojana in Marathi”