PM Surya Ghar Muft Bijli Yojana in Marathi : नमस्कार मित्रांनो, PM सूर्य घर मोफत बिजली योजना सुरू झालेली आहे. या योजने अंतर्गत घरावरती सोलर पॅनल तुम्ही बसवू शकता आणि या योजने अंतर्गत तुम्हाला भरपूर असं अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत. आज या पोस्ट मध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे? योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेचा उद्देश काय आहे? आणि या योजनेचा लाभ कसा घेता येईल याबाबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टद्वारे तुम्हाला देणार आहोत. तरी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2024 माहिती :
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली | ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश | मोफत वीज पुरवठा करून देणे. |
लाभार्थी | देशातील नागरिक |
योजनेचा फायदा काय आहे | या योजने अंतर्गत 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. |
बजेटची रक्कम किती | ७५,००० कोटी रुपये |
अर्जाची प्रक्रिया | या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
अधिकृत वेबसाईट | https://pmsuryaghar.gov.in/ |
PM Surya Ghar Muft Bijli Yojana in Marathi योजनेची वैशिट्ये काय आहेत?
- या योजनेमुळे घरगुती बिलामध्ये मोठी बचत होणार आहे.
- या योजने अंतर्गत १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४०% अनुदान मिळणार आहे.
- ३ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंत २०% अनुदान मिळणार आहे.
- तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट पर्यंत मर्यादा आहे.
- तसेच जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra 2024 पात्रता :
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी सर्व प्रथम अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसला पाहिजे.
- अर्जदाराचे बँकेचे खाते त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
- सर्व जातीमधील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराकडे त्याच्या नावाचे वीज बिल असणे आवश्यक आहे.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- वीज बिल
- रेशनकार्ड
- आय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक (बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावे)
PM Surya Ghar Muft Bijli Yojana in Marathi सुबसिडी स्ट्रक्चर :
- इथं आल्यानंतर लेफ्ट साईडला ऑप्शन आहे सबसिडी स्ट्रक्चर त्यावरती क्लिक करायच आहे. इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल pm सूर्यग्रह मुक्त बिजली योजना आपल्याला कशी किती सबसिडी मिळणार त्या संदर्भात माहिती दिली आहे. सबसिडी फॉर रेसिडेन्शियल हाऊसहोल्ड ज्यामध्ये रु. 30,000 किलोवॅट रु. १८,००० पर किलो वॅट. एकूण सबसिडी ३ किलोवॅट पेक्षा जास्त पाहिजे असल्यास रु. ७८,०००.
- तर हा टेबल बघा त्याच्या मधून तुम्हाला समजेल तर तुम्हाला झिरोपासून दीडशे पर्यंत जर तुमच्या बिलामध्ये युनिट पडत असतील तर तुम्ही १ ते २ किलो वॅट साठी अप्लाय करू शकता.
- आणि तुम्हाला सबसिडी मिळेल 30,000/- ते 60,000/- रु. पर्यंत सबसिडी भेटेल जर तुमचे बिलांचे युनिट 150 ते 300 पडत असेल तर दोन ते तीन KW पर्यंतचा तुम्ही सोलर बसू शकता.
- आणि 300 पेक्षा जास्त युनिट जर तुमचे बिलाचे युनिट असेल तर 3 KW चा सोलर प्लांट तुम्ही बसवू शकता. ज्यामध्ये 78000 सबसिडी तुम्हाला भेटू शकते.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Apply Online :
या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
- या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाईट वरती यायचं आहे.
- आता अप्लाय करण्यासाठी इथे पहिला ऑप्शन आहे अप्लाय फॉर रूट ऑफ सोलर या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- तुमच्याकडे इथे Register Here आणि Login Here असे दोन ऑप्शन दिसतील, तर यावरती आपण अगोदर रजिस्टर करायचा आहे.
- तुम्हाला इथे अकाउंट उघडायच आहे तर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. इथे तुम्ही राइट साईडला येऊन पाहू शकता इथे Registration चा ऑप्शन आहे इथे सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता.
- रजिस्टर बटणावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म दिसेल ज्यामध्ये आपलं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तर तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन कंपनी सिलेक्ट करायची आहे म्हणजे, तुमचं जे काही लाईट बिल आहे त्याची कंपनी कुठली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी आहे का सब सप्लाय ट्रान्सफर बी इ एस टी आहे का आपले महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन आहे का टाटा पॉवर आहे. तर तुमच्याकडे जे काही असेल त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता.
- त्यानंतर Consumer Account Number विचारेल म्हणजेच तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे आपण लाईट बिल भरताना वापरतो ग्राहक क्रमांक तो इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय.
- जसं आपण नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करणार तर इथे आपल्याला आपलं जे काही नाव आहे ते शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवलं जाईल व मध्येच स्टार दाखवलं जाईल. तर ते बरोबर आहे का नाव एकदा चेक करा त्यानंतर प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करा. PM Surya Ghar Muft Bijli Yojana
- जसं तुम्ही प्रोसेस बटनावरती क्लिक कराल तर तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर आपला इथे मोबाईल नंबर टाकून क्लिक टू सेंड मोबाईल वरती क्लिक करा तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे. आणि इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो टाका आणि सबमिट करा.
- जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर तिथे Are you sure असं विचारलं जाईल तर येस करायचंय. या पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल सक्सेसफुली सबमिटेड रजिस्ट्रेशन डिटेल्स एक तुम्हाला मेसेज आला असेल तो मेसेज व्यवस्थित सेव करून ठेवा तो नंतर तुम्हाला मेसेज लागू शकतो त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
- आता आपल्याला लॉगिन करायचा आहे लॉगिन करण्यासाठी इथे ऑप्शन आहे लेफ्ट साईडला लॉगिन बटनावरती क्लिक करा लॉगिन बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता आपला आपण आत्ता जे काही अकाउंट उघडलं त्या अकाउंट उघडलं तर मोबाईल नंबर आपण जो टाकला होता तो मोबाईल नंबर टाका कॅप्चा आहे तो टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल Apply for Rooftop Solar तर इथे तुम्ही प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे.
- आता फॉर्म ओपन होईल आणि तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे एकदम सोपा फॉर्म आहे आणि एवढे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत नाही फक्त इलेक्ट्रिसिटी बिल लागतं. PM Surya Ghar Muft Bijli Yojana
- आपल्याला पहिल्यांदा एप्लीकेशन सबमिट करायचे आणि सेकंड स्टेप मध्ये बँकेचे डिटेल सबमिट करायचे आहेत आपल्याला दोन स्टेप कंप्लिट करायच्यात ज्यामध्ये पहिली स्टेप आहे एप्लीकेशन सबमिट करायच.
- आता एप्लीकेशन सबमिट करण्यासाठी तुमचे नाव इथे दाखवेल इथे आपल्याला तीन स्टेप पूर्ण करायच्या आहेत.
- आपल्याला राइट साईडला खाली कॅटेगिरी विचारेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात एससी, एसटी, ओबीसी, जनरल किंवा इतर जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्ही एनटी कॅटेगरीमध्ये असाल तर ओबीसी सिलेक्ट करा.
- त्यानंतर व्हिलेज म्हणजे तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सिटी टाकायची तुम्ही कोणत्या सिटी मधून येता. आणि त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे पिनकोड चेक करून घ्यायचा जिल्हा चेक करून घ्यायचा आहे.
- त्यानंतर खाली यायचंय खाली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या डिटेल्स दाखवले जातील आता इथे जी काही कंपनी आहे तुमची त्या संदर्भात डिव्हिजन आणि सब डिव्हिजन आहे ते निवडायच आहे.
- तुमचं जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल जिथे महावितरण असेल तर त्याची जी काही डिव्हिजन आहे ते डिव्हिजन यामध्ये शोधा किंवा जो ह्या फिल्डमध्ये असेल त्यांना विचारा की तुमचं डिव्हिजन काय आहे आणि ते डिव्हिजन सिलेक्ट करा.
- डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर सब डिव्हिजन तुम्हाला कुठून लाईट पुरवली जाते ते सब डिव्हिजन असतं तर ते सब डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करा.
- त्यानंतर Consumer Account Number इथे ऑटोमॅटिकली आपला आलेला आहे जो ग्राहक क्रमांक आहे.
- त्यानंतर Sanctioned Load (in KW) जो काही तुमचा करंट आत्ता लोड आहे तो दाखवला जाईल.
- आता खाली या खाली आल्यानंतर सोलर रूट टाइप डिटेल्स इथं कॅटेगिरी विचारले जाईल तुमची रेसिडेन्शिअल आहे का रेसिडेन्शियल वेल्फेअर अससोसिएशन आहे तर ते सिलेक्ट करा.
- त्यानंतर खाली Click for Solar Rooftop Calculator हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा इथे तुम्ही सोलर रूफटॉपचे कॅल्क्युलेटर पाहू शकता. तुम्हाला कशा पद्धतीने सबसिडी आहे किंवा तुम्हाला किती KW सोलर लागू शकतो सबसिडी किती भेटू शकते ते तुम्ही पाहू शकता.
- त्यानंतर मंथली किती बिल येतं तुम्हाला ते इथे टाका आणि कॅल्कुलेट वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्हाला किती KW सोलर लागू शकतो हे तुम्ही इथे कॅल्कुलेट करू शकता.
- त्यानंतर आता इथे तुमचे जे काही लोकेशन असेल ते सेट करायचे आहे आणि सेव आणि नेक्स्ट बटण वर क्लिक करायचे आहे.
- सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे आलेलो आहोत ज्यामध्ये आपली आता शेवटची स्टेप आहे.
- Step-3 आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. तुम्हाला फक्त मागील सहा महिन्याचं कोणतंही एक इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही अपलोड करू शकता ज्यामध्ये JPG, JPEG किंवा PDF मॅक्झिमम जी काही साइज आहे ती 500 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता.
- आता महावितरणचे तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन सुद्धा डाऊनलोड करू शकता.
- पीडीएफ अपलोड केल्यानंतर फायनल सबमिशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सगळं बरोबर भरलय का तरच सबमिट करा ओके करा आपला एप्लीकेशन फॉर्म सबमिट झालेले तुम्हाला दिसेल.
- तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही PM Surya Ghar Muft Bijli Yojana या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता.
2 thoughts on “PM सूर्य घर मोफत वीज योजना : pm surya ghar muft bijli yojana in marathi”