Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 : तर नमस्कार मित्रांनो आज आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व निवास भत्ता देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात असे काही विद्यार्थी आहेत की, त्यांच्या राहत असलेल्या ठिकाणी शिक्षणाच्या योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःचे गाव किंवा शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जावे लागते.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी |
लाभ | ६०,०००/- रु. पर्यंत आर्थिक मदत |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://swayam.mahaonline.gov.in/ |
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शिकत असलेले विद्यार्थी हे दारिद्र्य रेषेखाली त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. आर्थिक रित्या मजबूत नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. जसे की, त्यांना दुसऱ्या शहरामध्ये राहण्याचा व जेवणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शिक्षणासाठी इच्छुक असणारे बरेच विद्यार्थी हे आर्थिक अडचणींमुळे त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत.
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सर्व शिक्षणाच्या आड येणाऱ्या अडचणींचा विचार करून राज्य सरकारद्वारे Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- तसेच अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती किंवा OBC जमाती किंवा आदिवासी जमाती यापैकी असणे आवश्यक आहे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील असे विद्यार्थी जे १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जसे की, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी त्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश भेटला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी व भोजनासाठी भत्ता देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024
- तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे.
- विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यास आर्थिक मदत करणे व त्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 फायदे काय आहेत?
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी निवास भत्ता व भोजन भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारद्वारे ६०,०००/- रु. पर्यंत आर्थिक मदत देण्यात येते.
- या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील मागास वर्गीय विद्यार्थी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वंचित राहणार नाहीत.
- विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही व ते आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
सरकारच्या इतर योजना :
- रमाई घरकुल योजना 2024 अर्ज सुरु । Ramai Awas Yojana 2024 Online Registration
- कलाकार मानधन योजना 2024, असा करा अर्ज । Kalakar Mandhan Yojana Maharashtra
- मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३,०००/- रु. | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याची माहिती
- जातीचा दाखला
- जन्माचा दाखला
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- विद्यार्थी जर आपण असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र
- डोमासाईल सर्टिफिकेट
- बोनाफाईड
- इयत्ता 10 वी आणि 12 पास मार्कशीट
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 साठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी सर्वात पहिला Online Registration करायचे आहे त्यानतंर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबद्दल सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया :
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सगळ्यात पहिला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर होम पेजवर Registration वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक Registration पेज ओपन होईल.
- त्यानंतर आता इथे विचारलेली सर्व माहिती जसे की, आधार कार्ड नंबर, नाव, जन्मतारीख व मोबाईल नंबर ही सर्व माहिती भरून Save या बटनावर क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुमची Online Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
Pandit Dindayal Upadhyay Yojana Apply Online:
- या अगोदरच्या स्टेपमध्ये आपण Registration प्रोसेस बघितली आहे आता आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.
- या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला Login ID आणि Password टाकून लॉगिन या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल, या अर्जामध्ये विचारली जाणारी सर्व माहिती भरायची आहे.
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही पंडित दीनदयाळ योजना या योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
सारांश :
तर मित्रांनो Pandit Dindayal Upadhyay Yojana या योजनेविषयी संपूर्ण माहिती आम्ही या पोस्टमार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही इथे कमेंट करू शकता. किंवा ई-मेल मार्फत सुद्धा आम्हाला प्रश्न विचारू शकता आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तसेच जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या योजनेची अचूक माहिती मिळेल आणि या योजनेचा लाभ घेता येईल.
1 thought on “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 2024 : Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024”