मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३,०००/- रु. | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि त्या संदर्भात जो GR आहे तो आलेला आहे त्या GR मध्ये तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते सर्व सांगितलेले आहेत जीआर मध्ये अर्ज कधी सुरू होणार आहेत, पात्रता नक्की काय आहे, कागदपत्रे काय आहेत, सर्व माहिती आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

तुम्ही हा जीआर पाहू शकता त्यामध्ये राज्यातील 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 6 फेब्रुवारी चा जो जीआर आहे तो आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही हा GR सुद्धा पाहू शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे किंवा ही पोस्ट वाचा या पोस्ट मध्ये आम्ही सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Information in Marathi :

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक
लाभ३,०००/- रु. एकरकमी
योजनेसाठी वयाची मर्यादाअर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रियाया योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
शासनाचा निर्णय (GR)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटया योजनेसाठी लवकरच अधिकृत पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana GR

सदर योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जीवनात सक्रियता आणि गतिशीलता आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोकळेपणाने जीवन जगता यावे, त्यांचे मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्य चांगले बनवून वयानुसार चांगले जीवन जगता यावे यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा किंवा इतर आजार यावरती उपाय करण्यासाठी जी उपकरणे किंवा साधने लागणार आहेत ती त्यांना खरेदी करता यावीत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र या माध्यमातून त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” ही योजना शासनाद्वारे राबवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता (Eligibility) :

मुख्यमंत्री वयोश्रीयोजनेच्या पात्रतेसाठी शासनातर्फे काही मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्यासंबंधित महत्वाच्या गोष्टी व अटी खाली दिलेल्या आहेत. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय हे ६५ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड किंवा आधार कार्ड साठी केलेला अर्ज किंवा नोंदणीची पावती असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या असावे, यासंबंधी अर्जदाराने स्वघोषणापत्र देणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मागच्या 3 वर्षांमध्ये सरकारच्या इतर स्त्रोत आणि विनामूल्य उपकरणाचा लाभ घेतला नसावा.
  • पात्र असणाऱ्या व्यक्तींना 3000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. त्या रकमेतून उपकरण खरेदी केल्या संबंधित आणि प्रशिक्षण घेतल्या संदर्भात त्याचे प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत समाज कल्याण येथे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
  • निवडलेल्या जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी संख्या आहेत त्यापैकी 30 टक्के महिला असतील.

Mukhyamantri Vayoshri Yojana धैय व उद्देश :

या योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहेत हे समजून घेऊयात राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्यामध्ये जे काही अपंगत्व आहे ते असतं अशक्तपणा येत असेल तर त्याच्यावरती उपाय असतील आणि त्यांना जे काही उपकरणे लागत असतील ते त्यांना दिले जाणार आहेत. तसेच मन स्वास्थ्य केंद्र असतील योग उपचारासाठी केंद्र असतील त्यांची काही शरीराची पाहणी असेल ती सुद्धा फ्री मध्ये केली जाणार आहे.

आणि अशातच यामध्ये अजून एक आहे ज्यामध्ये एक वेळ एक रकमी एक रकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेमध्ये खात्यात जमा करण्यात येणार आहे. डीबीटीच्या प्रणाली द्वारे रक्कम महिन्याला मिळणार आहे का वर्षाला मिळणार आहे तर जीआर मध्ये सांगितलेलं आहे एक रक्कम याचा अर्थ होतो वर्षातून एकदा तर हे ३ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप :

Mukhymantri Vayoshri Yojana 2024 या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेसाठी आवश्यक असणारे उपकरण किंवा साधने खरेदी करता येणार आहेत.

जसे की,

  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • स्टिक व्हील चेअर
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर

मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो २
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक झेरॉक्स (राष्ट्रीय बँकेत खाते असणे आवश्यक आहे)
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • स्व-घोषणापत्र
  • शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी दिलेली इतर अवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Apply Online)

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. यावरचा महत्वपूर्ण असा निर्णय मंत्रिमंडळातर्फे 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आणि या योजनेसाठी शासनाचा निर्णय 6 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. पण तरी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

लवकरच या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून बनवण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याची संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईवर अपडेट करण्यात येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना किती रुपये मिळणार?

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 साठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना रु. ३,०००/- एकरकमी रक्कम ही एकवेळेस मिळणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पात्र अर्जदारांना ३,०००/- रु. एकरकमी एकावेळेस दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा अपंग / अशक्तपणामुळे त्रस्त आहेत असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

Mukhyamantri Vayoshri Yojana फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा कोणतीही अधिकृत वेबसाईट सध्या सुरु नाही. लवकरच अधिकृत पोर्टल बनवण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु होईल.

2 thoughts on “मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३,०००/- रु. | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024”

Leave a comment