मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024, महिलांना मिळणार ३ सिलिंडर मोफत । Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश देशातील कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सुधारणे आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम सुरू आहे. तथापि, काही लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे पुनर्भरण करणे कठीण जात आहे, ज्यामुळे ते इंधनासाठी पर्यायी स्रोतांचा वापर करत आहेत, जे पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे.

याला लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने 2024-25 च्या बजेटमध्ये मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा केली आहे, ज्याद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले जातील.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

“मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” नक्की काय आहे?

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • ही योजना महिलांच्या स्वास्थ्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर दिले जातात.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 पात्रता (Eligibility) :

  • सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे
  • सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
  • सदर लाभ केवळ 14.2 कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?

महिलांचे सशक्तीकरण : या योजनेच्या माध्यमातून महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्त करून त्यांचे आरोग्य सुधारले जात आहे.
स्वास्थ्य सुधारणा : पारंपरिक ईंधन वापरामुळे होणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या समस्या, डोळ्यांच्या आजारांसारख्या आरोग्य समस्या कमी करणे.
पर्यावरण संरक्षण : पारंपरिक ईंधन वापरामुळे होणारे प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे.
ईंधन उपलब्धता : गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देऊन ईंधन उपलब्धता सुनिश्चित करणे.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 फायदे काय आहेत ?

मोफत गॅस सिलेंडर : पात्र कुटुंबांना दरवर्षी निश्चित संख्यात मोफत गॅस सिलेंडर दिले जातात.
स्वास्थ्य सुधारणा : महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा होते.
वेळेची बचत : ईंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
घरात स्वच्छता : घरात स्वच्छ वातावरण निर्माण होते.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • पैन कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रहिवाशी दाखला
  • आय प्रमाण पत्र
  • जातीचा दाखला

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सध्या सरकारद्वारे कोणतीही अधिकृत वेबसाईट सुरु करण्यात आलेली नाही. पण लवकरच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी राज्य सरकारद्वारे अधिकृत वेबसाईट सुरु करण्यात येणार आहे.
  • जेव्हा सरकारद्वारे अधिकृत वेबसाईट सुरु करण्यात येईल तेव्हा आम्ही इथे अपडेट्स देऊ. त्यामुळे पुढील अपडेट्स साठी आमच्या What’s App ग्रुप ला लवकर जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील अपडेट्स लवकर मिळतील, तसेच तुम्हाला सरकारच्या इतर नवीन योजनांची माहिती सुद्धा त्वरित मिळेल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 साठीचा GR पाहण्यासाठी : इथे क्लिक करा

सरकारच्या इतर योजना :

2 thoughts on “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024, महिलांना मिळणार ३ सिलिंडर मोफत । Mukhyamantri Annapurna Yojana 2024”

Leave a comment