मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना 2024 : Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana : तर मित्रांनो आज आपण राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना नक्की काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेचा उद्देश काय आहे, योजनेचे फायदे आणि सर्वात महत्वाचे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा. या बद्दल संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे तरी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana Information in Marathi :

योजनेचे नावमासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?मच्छिमारी करणाऱ्या बांधवांना मत्स्यव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मच्छिमार
लाभ15 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीजवळ राहत असलेल्या बऱ्याच लोकांचा मासेमारी हा प्रामुख्याने व्यवसाय असल्यामुळे त्यांना मासेमारी करण्यासाठी मासेमार साधनांची आवश्यकता असते. परंतु मच्छिमार करणारे लोक आर्थिक दृष्टीने गरीब असतात. त्यामुळे त्यांना काही वेळेस मासेमारी करण्यासाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करणे शक्य होत नाही. आणि त्यांना त्यामुळे बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
  • या सर्व अडचणींचा विचार करून राज्य सरकारने मच्छिमार करणाऱ्या बांधवांना त्यांच्या मच्छिमार व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनांच्या खरेदीसाठी अनुदान देण्याच्या उद्देशाने मासेमारी साधनांच्या खरेदीवर आर्थिक साहाय्य योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेच्या काही अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिक घेऊ शकतात.
  • तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा मत्स्य व्यवसाय असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा १८ ते ५० वयोगटातील मच्छिमार असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार व्यक्ती हा मच्छिमार सहकारी संस्थेचा सभासद असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा मच्छिमार संस्थेकडून पुरस्कृत केलेला असावा.
  • अनुदान अंतर्गत मच्छिमारांनी बांधलेल्या किंवा विकत घेतलेला नौकेचे यांत्रिकरण करायचे त्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
  • अर्जदार व्यक्तीने बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेमधून कर्ज घेतले नसावे.
  • मच्छिमार करणाऱ्या व्यक्तींनी नौकेसाठी आवश्यक मासेमारी परवाना नौका नोंदणी प्रमाणपत्र आणि विमापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदी क्रमांक स्वतः नौकेवर लिहिल्यानंतर अनुदान अनुदेय राहील.
  • नौकेचा आयुर्मान कालावधी पूर्ण झाल्यावर लाभार्थी हा नवीन नौकेसाठी अर्ज करू शकतो.
Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana या योजनेचा उद्देश :

  • महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार करणाऱ्या लोकांना मत्स्यव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना आर्थिक विकास करणे.
  • मच्छिमार करणाऱ्या व्यक्तींना मासेमारी व्यवसायासंबंधित साधन सामग्री विकत घेण्यासाठी सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे.
  • मच्छिमार बांधवांना त्यांच्या व्यवसायाच्या संबंधित विविध सामग्री विकत घेण्यासाठी पैशासाठी इतर कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणत्याही बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेसाठी मिळणारे अनुदान :

१) सूत व जाळी खरेदीवर अर्थसहाय्य :

  • मासेमारीसाठी लागणारी जाळी आणि सूट मच्छिमारांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मच्छिमार सहकारी संस्थांच्या मार्फत संस्थेच्या सभासदांना सूत व जाळी खरेदीवर अनुदान देण्यात येणार आहे.

२) रामपानकारांना रापणीच्या सुटावर अर्थसहाय्य :

३) बिगर यांत्रिकी नौका बांधण्यासाठी लहान मच्छिमारांना आर्थिक साहाय्य :

  1. सागरी मच्छिमार : लहान आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या मच्छिमारांना १० टनांपर्यंत नौका बांधण्यासाठी ५०% किंवा ६०,०००/- रु. या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. दिलेल्या मुदतीमध्ये कर्ज फेडल्यास वित्तीय संस्थेचा व्याज दार व ४% या मधील फरकाची रक्कम व्याज अनुदान म्हणून मिळते.
  2. भूजल मच्छिमार : आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या मच्छिमारांना लहान नौका बांधण्यासाठी किंमतीच्या ५०% किंवा रु. ३,०००/- या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.

सरकारच्या इतर योजना :

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवाशी दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • संबंधित नौका व जाळीचे दरपत्रक
  • क्रियाशील मच्छिमार असल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र

Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana साठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात पहिला आपल्या क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय विभामध्ये जाऊन मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जामध्ये नौका आणि इतर साधनांचा किती रुपये खर्च लागणार आहे आणि कर्ज कोणत्या बँकेकडून घेणार, याची माहिती भरायची आहे. तसेच,
    1. संस्थेचा सभासद व मच्छिमार असल्याचा संस्थेचा दाखला
    2. नौका बांधणीचा कारनामा
    3. नांगर, शीड, वल्ही, दोर यांच्या जी. एस. टी. नमूद असलेल्या पावत्या
  • अर्जासोबत वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभागामध्ये जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसाह्य योनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2 thoughts on “मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना 2024 : Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana”

Leave a comment