Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana 2024 : तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे सुरु करण्यात आलेल्या मासेमार संकट निवारण निधी योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकार वेळोवेळी नव नवीन योजना घेऊन येत असते. महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांच्या आर्थिक विकास व्हावा या हेतून राज्य सरकाने मासेमार संकट निवारण निधी योजना सुरु केली आहे.
मासेमारी करतेवेळी मच्छिमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा मासेमार बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसदारांना मासेमार संकट निवारण निधी योजने अंतर्गत १ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana Information in Marathi :
योजनेचे नाव | मासेमार संकट निवारण निधी योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश मच्छिमार लोकांना आर्थिक साहाय्य करणे. |
लाभार्थी | राज्यातील मच्छिमार |
लाभ | १ लाख रुपयांची आर्थिक मदत |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाईन |
विभाग | मत्स्यव्यवसाय विभाग |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana काय आहे?
- मच्छिमार करणारे लोक वादळ वाऱ्याची पर्वा न करता समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातात. पण काही वेळेस त्यांच्या बोटीचा अपघात होतो व त्यांचा मृत्यू होतो. किंवा मग ते समुद्रामध्ये बेपत्ता होतात.
- कुटुंबातील कर्ता पुरुष असं अचानक गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. आणि त्यांना रोजच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- या सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने मासेमार संकट निवारण निधी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana पात्रता व अटी :
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांनाच घेता येईल.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील मच्छिमारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त मच्छिमार करणाऱ्या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- मच्छिमारांची संस्थेमध्ये नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे.
- मच्छिमारांच्या मृत्यू झाल्यानंतर किंवा मच्छिमार बेपत्ता झाल्यानंतरच या योजनेचा लाभ दिला जाईल.
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश मासेमारी करतेवेळी मच्छिमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा मच्छिमार बेपत्ता झाल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये या हेतून मासेमार संकट निवारण निधी योजना सुरु करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांना या योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana फायदे काय आहेत?
- मासेमारी करतेवेळी मच्छिमारांच्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर किंवा मच्छिमार बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे.
- मच्छिमारांच्या मुलांना शैक्षणिक व प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत.
- तसेच वरिष्ठ मच्छिमारांना पेंशन योजना
- मच्छिमार विधवांसाठी पुनर्विवाह प्रोत्साहन योजना
- मच्छिमारांसाठी विमा योजना
- या योजनेमुळे राज्यातील मच्छिमारांना पाठिंबा मिळेल.
सरकारच्या इतर योजना :
- व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता : Maintenance Allowance Scheme in Maharashtra
- मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024
- शैक्षणिक कर्ज योजना : Education Loan Scheme by Government 2024
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- वारासदारांचे आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- मच्छिमार असल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- पोलीस FIR
- शव विच्छेदन अहवाल
- ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांचे वारस प्रमाणपत्र
- संस्थेचे शिफारस पत्र
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana साठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा?
- मासेमार संकट निवारण निधी योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्यातील जिल्हा कार्यालयामध्ये मत्स्यव्यवसाय विभागामध्ये जायचे आहे.
- त्यानंतर तिथून मासेमार संकट निवारण निधी योजनेसाठीचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत.
- नंतर तो अर्ज संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- या प्रकारे तुम्ही मासेमार संकट निवारण निधी योजने साठी अर्ज करू शकता.
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- मासेमार संकट निवारण निधी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्व प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्जासाठी नोंदणी करावी लागेल.
- नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर Username आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानतंर तुमच्यासमोर आता मासेमार संकट निवारण निधी योजनेसाठीचा अर्ज दिसेल. त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे त्यानतंर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- या प्रकारे मासेमार संकट निवारण निधी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सारांश :
तर मित्रांनो मासेमार संकट निवारण निधी योजने संबंधित सर्व माहिती इथे तुम्हाला देण्यात आली आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट सोशल मीडिया वरती शेअर करा जेणेकरून मच्छिमार बांधवांना या योजनेचा लाभ घेता येईल. तुम्हाला जर या योजने विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कंमेंट मध्ये विचारू शकता किंवा आम्हाला ई-मेल द्वारे कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
1 thought on “मासेमार संकट निवारण निधी योजना : Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana 2024”