Maharashtra Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्यातील कामगारांना आर्थिक मदत व्हावी म्हणून भारत सरकारद्वारे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेकरिता MAHABOCW या नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या बांधकाम कामगार योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील तमाम बांधकाम मजुरांसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील कामगारांना mahabocw.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कामगार आहात आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीचा तुम्हाला फायदा ग्यायचा असेल तर, तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचा ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजून जाईल.
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024
महाराष्ट्र सरकारकडून दि. १८ एप्रिल २०२० या तारखेला महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत Maharashtra Bandhkam Kamgar Yojana MAHABOCW हे सरकारचे अधिकृत पोर्टल सुरु करण्यात आले होते. या अधिकृत पोर्टलच्या मार्फत महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ होणार आहे. सरकारने हे अधिकृत पोर्टल खास कामगारांसाठी केलेले आहे.
बांधकाम कागमार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कष्ट करणाऱ्या लोकांना २०००/- रु. ते ५०००/- रु. पर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना इतर योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
बांधकाम कामगार योजना ही राज्यात विविध नावानुसार ओळखली जाते. उदा. महाराष्ट्र कोरोना साहाय्य योजना, कामगार साहाय्य योजना आणि महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना इ. साल २०१९ पासून सुरु झालेल्या कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या कामगारांना सरकारतर्फे या योजनेतून आर्थिक मदत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील जवळपास १२ लाख बांधकाम कामगारांना आर्थिकदृष्टया मदत पुरवण्यात आली. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या कामगारांना mahabocw.in या अधिकृत पोर्टलला जाऊन तिथे नोंदणी करायची आहे.
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 Details :
योजनेचे नाव : | Bandhkam Kamgar Yojana 2024 |
कोणी सुरु केली : | ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचे उद्दिष्ट : | महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे |
विभाग : | महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ |
फायदा : | ५,०००/- रु. आणि भांड्याचा संच |
लाभार्थी : | महाराष्ट्र बांधकाम कामगार |
राज्य : | महाराष्ट्र |
अर्जाची प्रक्रिया : | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट : | https://mahabocw.in |
बांधकाम कागमार योजनेचे उद्दिष्ट :
महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडल अंतर्गत mahabocw.in हे बांधकाम कामगार योजनेचे पोर्टल चालू करण्याचा मुख्य हेतू या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कामगारांना आर्थिक मदत करणे हा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना इतर विविध योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना त्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच कष्टकरी कामगारांना सरकारकडून सुमारे २०००/- रु. ते ५०००/- रु. इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे. या आर्थिक मदतीची रक्कम लाभार्त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर पाठवली जाणार आहे.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांच्या कामाची संपूर्ण यादी :
- रस्ते
- इमारती
- रेल्वे
- एअरफिल्ड
- ट्रामवे
- सिंचन
- जलाशय
- पाण्याचे तलाव
- पाणी बाहेर काढणे
- ब्रिज
- बोगदे
- कल्व्हर्ट
- दूरदर्शन
- रेडिओ
- टेलिफोन
- धारण कालवे
- तटबंधी व नेव्हिगेशनची कामे
- पूर नियंत्रणाची कामे
- वीज पुरवठा केंद्र
- पाण्याची कामे
- जलवाहिनी
- तेल आणि वायू प्रतिष्ठापन
- वायरलेस
- पाईप लाईन
- टॉवर्स
- वॉटर कुलिंग टॉवर
- वायरिंग, डिस्ट्रिब्युशन यांसारखी इलेकट्रीकलची कामे
- सोलर पॅनल इ. ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना
- ट्रान्समिशन टॉवर व याप्रकारची इतर कामे
- अग्निशामक यंत्रांची स्थापना व दुरुस्ती
- दगड कापणे, तोडणे आणि दळणे
- वातानुकूल उपकरणांची स्थापना व दुरुस्ती
- लिफ्टची कामे
- सुरक्षा दरवाजे व उपकरणांची कामे
- फरशा कापून पोलिश करणे
- गटार आणि प्लंम्बिंगची कामे
- पेंट, वार्निश सोबतच सुतारकाम
- लोखंडी किंवा धातूच्या ग्रील्स, दरवाजे, खिडक्या तयार करणे आणि बसवणे
- सुतारकाम, प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) यांसारखे काम
- काच कापणे, काच प्लास्टर करणे आणि काचेचे पॅनल बनवणे
- विटा, छप्पर इ. तयार करणे
- माहितीचा फलक, प्रवासी निवारा, बस स्थानक आणि सिग्नलिंग सिस्टिम यांसारखी कामे
- जलतरण तलाव, गोल्फ कोर्स यासोबतच क्रीडा व मनोरंजन सुविधांचे काम
बांधकाम कामगार योजना पात्रता :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय हे १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- तसेच कामगाराने कमीत कमी ९० दिवस काम केले असणे गरजेचे आहे.
Bandhkam Kamgar Yojana लाभ :
- बांधकाम कामगार योजनेसाठी राज्यातील कामगारांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
- या योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना २००० रु. ते ५००० रु. पर्यंत आर्थिकरित्या मदत पुरवली जाते.
- राज्यातील बांधकाम कामगारांना विविध साधनांची पेटी त्यासोबत भांडी देखील देण्यात येतील.
- आर्थिक मदतीचे पूर्ण पैसे पात्र असणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
- यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे आहे.
- या योजनेच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत होईल.
- बांधकाम कामगार योजनेमुळे कामगारांना व त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील इतर सरकारी योजना :
- “आनंदाचा शिधा” रेशन कार्ड धारकांना मिळणार या ४ वस्तू : Anandacha Shida Gudi Padwa 2024
- ‘लाडली बहना’ योजना, महिलांना मिळणार १२०००/- रुपये वर्षाला: Ladli Behna Yojana in Maharashtra 2024
बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वयाचे प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्र
- ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
How to Apply Online Bandhkam Kamgar Yojana 2024 :
- सगळ्यात पहिला तुम्हाला महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या Maharashtra Bandhkam Kamgar Yojana अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचे होम पेज ओपन झालेले दिसेल.
- नंतर होम पेज वर म्हणजेच वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर आल्यावर कामगार या ऑपशन वर क्लिक करून कामगार नोंदणी या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- या पेज वर तुम्हाला तुमची पात्रते संबंधित सर्व माहिती भरायची आहे.
- ही माहिती भरल्यानंतर, तुमची पात्रता चेक करण्यासाठी पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही दिलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानतंर तुमच्या समोर एक नोंदणी फॉर्म दिसेल.
- या फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
- त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट ऑपशन वर क्लिक करायचे आहे. या पद्धतीने ऑनलाईन नोंदणी पूर्ण होते.
वेबसाईटवर Login करण्याची प्रक्रिया :
- सगळ्यात पहिला तुम्हाला Maharashtra Bandhkam Kamgar Yojana च्या https://mahabocw.in या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज दिसेल.
- त्या पेज वर लॉगिन पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यावर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल.
- या पेज वर आल्यानंतर तिथे तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
- त्यानंतर लॉगिन ऑप्शनवर क्लिक कराचे आहे.
- या पद्धतीने तुम्ही कामगार योजनेच्या पोर्टलवर लॉगिन करू शकता.
2 thoughts on “महाराष्ट्र बांधकाम कामगार ५,०००/- रु. योजना । Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024”