Maha Sharad Portal Registration 2024 : देशातील अपंग नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारद्वारे सतत प्रयत्न सुरु असतात. सरकारने अपंग नागरिकांच्या मदतीसाठी अनेक पोर्टल सुरू केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका Maha Sharad Portal नावाच्या पोर्टलशी संबंधित माहिती देणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला या पोर्टल विषयी सर्व महत्वाची माहिती मिळेल. महा शरद पोर्टल म्हणजे काय? त्याचे फायदे, उद्दीष्ट, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ. तर मित्रांनो, जर तुम्हाला Maha Sharad Portal Maharashtra संबंधित सर्व महत्वाची माहिती घ्यायची असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
Maha Sharad Portal Registration 2024 Information in Marathi :
पोर्टलचे नाव | महा शरद पोर्टल |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | सर्व अपंग नागरिकांची पोर्टल वर नोंदणी करणे. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अपंग नागरिक |
लाभ | अपंग नागरिकांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती या पोर्टलद्वारे मिळणार आहे |
नोंदणी करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://mahasharad.in/home |
Maha Sharad Portal Registration 2024 काय आहे?
- महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील अपंग नागरिकांसाठी Maha Sharad Portal सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांची माहिती इथे मिळणार आहे. जेणेकरून राज्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. अपंग नागरिकांची नोंदणी करणे हे Sharad Portal चे मुख्य उद्दीष्ट आहे जेणेकरुन सर्व देणगीदार महा शरद पोर्टलच्या माध्यमातून विविध अपंग व्यक्तींना त्यांची मदत आणि पाठबळ देऊ शकतील.
Maha Sharad Portal Registration 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
- अर्जदार अपंग असावा.
Maha Sharad Portal Online Registration 2024:
या पोर्टलच्या माध्यमातून अपंग लोकांची स्थिती व गरजा समजून घेण्याचेही प्रयत्न केले जातात. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, देणगीदार इत्यादी दिव्यांगची स्थिती समजून घेण्यास आणि त्यांना मदत करण्यास सोपे होणार आहे. Maha Sharad Portal च्या माध्यमातून राज्यातील अपंग नागरिकांना आर्थिक मदत केली जाईल, जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. या पोर्टलवर नोंदणी करणे खूप सोपे आहे. सर्व दिव्यांग नागरिकांनी लवकरात लवकर महा शरद पोर्टलवर नोंदणी करावी व या विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. देणगीदार देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. दिव्यांग नागरिकांशी संबंधित सर्व माहिती Maha Sharad Portal वर उपलब्ध आहे.
Maha Sharad Portal Registration 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- पोर्टलवर सर्व दिव्यांग नागरिकांची नोंदणी करणे हे Maha Sharad Portal चे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरुन सर्व सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल.
- या पोर्टलच्या माध्यमातून देणगीदार हे वेगवेगळ्या दिव्यांग नागरिकांना मदत देऊ शकतात.
- Maha Sharad Portal च्या माध्यमातून राज्य सरकार अपंग नागरिकांना आर्थिक मदत करेल. जेणेकरुन अपंग नागरिक स्वावलंबी होतील. या पोर्टलच्या अंतर्गत स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या सक्षम नागरिकांना त्यांची मदत देखील देतील. यामुळे, आता राज्यातील कोणताही अपंग नागरिक इतरांवर अवलंबून राहणार नाही.
Maha Sharad Portal Registration 2024 फायदे काय आहेत?
- हे पोर्टल महाराष्ट्रातील अपंग नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.
- या पोर्टलवर सर्व दिव्यांग/अपंग नागरिक नोंदणी करू शकतात.
- Maha Sharad Portal च्या माध्यमातून सर्व नोंदणीकृत अपंग नागरिकांना शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जाईल.
- या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही.
- देणगीदार या पोर्टलद्वारे स्वत: ची नोंदणी देखील करू शकतात. ज्याद्वारे ते अपंग नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील.
- महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहितीही महा शरद पोर्टलमार्फत देण्यात येईल.
- Maha Sharad Portal च्या माध्यमातून सरकार अपंगांना आर्थिक सहाय्य करेल जेणेकरून ते स्वावलंबी होतील.
- वेगळ्या अपंग लोकांची स्थिती आणि जागरूकता देखील या पोर्टलद्वारे समजू शकते.
- महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांनी लवकरात लवकर या पोर्टलवर अर्ज करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
सरकारच्या इतर योजना :
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 : Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana 2024
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 : Soil Health Card Scheme in Marathi
Maha Sharad Portal Registration 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पत्ता पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाइल नंबर
Maha Sharad Portal Registration 2024 साठी अर्ज कसा करायचा?
- महा शरद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Maha Sharad Portal च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर पोर्टलचे होम पेज ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला दिव्यांग च्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला दिव्यांग नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर दिसेल.
- या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती जसे की, आपल्याला आपले नाव, लिंग, राज्य, पिन कोड, आधार क्रमांक इ. प्रविष्ट कराव्या लागतील.
- त्यानंतर आता तुम्हाला रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुम्ही Maha Sharad Portal वर नोंदणी करू शकता.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणे करून दिव्यांग व्यक्तींपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहचेल आणि त्यांना या पोर्टलद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येईल. अश्याच नवनवीन योजनांची माहिती दररोज मिळवण्यासाठी आमच्या What’s App ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. पोस्ट शेवट पर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद !
4 thoughts on “दिव्यांग योजना महाराष्ट्र, अपंग पेंशन योजना 2024 : Maha Sharad Portal Registration 2024”