मागेल त्याला विहीर योजना : Magel Tyala Vihir Yojana 2024

Magel Tyala Vihir Yojana 2024 : मित्रांनो आज आपण मागेल त्याला विहीर योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे.

Magel Tyala Vihir Yojana 2024

Magel Tyala Vihir Yojana Information in Marathi :

योजनेचे नावविहीर योजना 2024
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान
विभागकृषी विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन/ ऑफलाईन
योजनेचा अर्जयेथे क्लिक करा

Magel Tyala Vihir Yojana काय आहे?

राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पर्याय म्हणून शेतकऱ्यांना शेत पिकाच्या सिंचनासाठी विहिरींमधील पाण्याचा वापर करू शकतात. पण विहीर खोदण्यासाठी खर्च जास्त येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीमुळे असमर्थ ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्या विचारात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत समिती विहीर योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Magel Tyala Vihir Yojana पात्रता (Eligibility) :

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मागेल त्याला विहीर योजनेच्या काही अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ शेती करण्यासाठी योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • सरकारी विहीर योजनेसाठी अर्ज करताना शेतामध्ये विहीर नसली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.४० हेक्टर इतकी जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतामध्ये ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून ५०० मीटर पर्यंत विहीर नसली पाहिजे.
  • अर्जदार शेतकऱ्याची जमीन ही विहीर खोदण्यासाठी तांत्रिक दृष्टीने पात्र असणे आवश्यक असणार आहे. ( यासाठी शाखा अभियंता किंवा उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्याचा अहवाल घेण्यात येईल.
  • अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वरती यापूर्वी विहिरींची नोंद नसली पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • समजा अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सह हिस्सेदार असतील तर अशा वेळी अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Magel Tyala Vihir Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मागेल त्याला विहीर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे व पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळणे.
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यता भासू नये, या हेतून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Magel Tyala Vihir Yojana फायदे काय आहेत?

  • विहीर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती पिकासाठी तसेच पिण्यासाठी सुद्धा पाण्याची उपलब्धता करून देण्यात येते.
  • या योनेमुळे पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा पाणी नसल्यामुळे शेत पिकांचे नुकसान टाळता येणार.
  • तसेच या योजनेमुळे राज्यातील शेतकरी व इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  • शेतकऱ्यांचा व इतर नागरिकांचा शेती या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल व त्यामुळे शेतकरी शेती या क्षेत्राकडे पाठ फिरवणार नाहीत.

सरकारच्या इतर योजना :

Magel Tyala Vihir Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • रहिवाशी दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा व सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

Magel Tyala Vihir Yojana साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जायचे आहे. त्यानंतर ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • किंवा जिल्हा कार्यालयामध्ये कृषी विभागामध्ये जाऊन विहीर अनुदान योजनेसाठीचा अर्ज घ्यायचा आहे.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
  • या प्रकारे तुम्ही मागेल त्याला विहीर योजना साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Magel Tyala Vihir Yojana साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
  • वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • या प्रकारे तुम्ही मागेल त्याला विहीर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

1 thought on “मागेल त्याला विहीर योजना : Magel Tyala Vihir Yojana 2024”

Leave a comment