Ladli Behna Yojana in Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, तर या पोस्ट मध्ये आपण ‘लाडली बेहना’ योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या देशातील सर्व महिला आर्थिकरित्या सक्षम किंवा त्यांना फायनान्शियल फ्रीडम मिळावे या हेतूने लाडली बेहना योजना सुरु करण्यात येत आहे. ही योजना सर्वात पहिला मध्य प्रदेश सरकार अंतर्गत सुरु करण्यात आली होती. या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे. मध्य प्रदेश मधील मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या अंतर्गत “लाडली बेहना योजना” हे सुरु करण्यात आली आहे.
या योजनेचा हेतू महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम बनवणे हा आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमध्ये, पात्र असलेल्या सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला १५००/- रु. मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना प्रत्येक वर्षी १८,०००/- रु. या प्रमाणे आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी नोंदणी कशी करायची, पात्रता, फायदे याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
लाडली बेहना योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेली माहिती नीट वाचा आणि खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा. आम्ही Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 संबंधित महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, तुमचा अर्ज मंजूर (accept) झाला की नाही हे माहित करून घेण्यासाठी Maharashtra Ladli Behna Yojana Status बघा. जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि तुमचे नाव मंजूर झाले असेल तर ते लाडली बेहना योजनेच्या यादीमध्ये दिसेल. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या बँक खात्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला १५०० रु. जमा केले जातील.
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 in Marathi :
योजनेचे नाव: | लाडकी बहीण योजना महाराष्ट्र |
लाभ: | १,५००/- रु. दरमहा |
लाभार्थी: | विवाहित महिला व ज्यांना नोकरी नसेल |
वयोमर्यादा: | २३ ते ६० वर्षे |
अर्जाची शेवटची तारीख : | ३१ ऑगस्ट २०२४ |
Official Website: | https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in |
Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 : कोणाला मिळेल लाभ?
- या योजनेमध्ये विवाहित असलेल्या महिलांना दर महिन्याला १,५००/- रु. मिळणार आहेत.
- शाळा शिकत असलेल्या किंवा कॉलेज मध्ये शिकत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही.
- ही योजना फक्त मागास वर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महिलांनसाठी असेल.
- ही योजना सध्या फक्त मध्य प्रदेश मधील महिलांसाठीच आहे. पण महाराष्ट्रात लवकरच ही योजना येणार आहे.
Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 Documents (अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे):
- पासपोर्ट साईझ फोटो
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- बँक खाते पासबुक डिटेल्स
- विवाह प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
लाडली बेहना योजना पात्रता (Ladli Behna Yojana Eligibility Criteria):
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला त्या राज्यातील असेल तरच या ती या योजनेसाठी पात्र राहील.
- फक्त विवाहित असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- महाराष्ट्रामध्ये या योजनेसाठी वयाची मर्यादा ही २३ वर्षे ते ६० वर्षे आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी आहे, त्याच महिला या योजनेसाठी पात्र राहातील.
- सरकारी नोकरी किंवा कर भरत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. Ladki Bahin Yojana Maharashtra 2024
सरकारच्या इतर योजना
- Free Silai Machine Yojana Maharashtra 2024 : शिलाई मशीन योजना महाराष्ट्र २०२४ साठी असा करा अर्ज..
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 : Soil Health Card Scheme in Marathi
- MSRTC मोफत प्रवास योजना 2024 संपूर्ण माहिती : MSRTC Free Travel Scheme
लाडली बेहना योजनेचा मुख्य हेतू काय आहे?
लाडली बेहना योजनेचा मुख्य हेतू किंवा उद्देश हा महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मजबूत करणे हा आहे. Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 या योजने मार्फत महिलांना आर्थिक रित्या मदत करून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच या योजनेमुळे मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत होईल. आणि शिक्षण घेतल्यामुळे मुली त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या प्रकारे तयार होतील.
या योजनेमार्फत महिलांच्या आरोग्यसाठी सुद्धा मदत मिळणार आहे. तसेच लहान मुलांच्या आहारासाठी आणि गर्भवती महिलांना देखील आर्थिक मदत मिळणार आहे. अनाथ, विधवा आणि अपंग असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेमुळे आर्थिक मदत मिळणार आहे.
महिलांना आर्थिकरित्या मजबूत बनवून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेच्या मार्फत गरिबीतून बाहेर पडण्यास मदत होईल. राज्याचा विकास करण्यासाठी महिला शिक्षण, आरोग्य व आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होईल असं म्हणता येईल.
How to Apply Ladli Behna Yojana in Maharashtra 2024 :
लाडली बेहना योजना ही सध्या मध्य प्रदेश राज्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये ही योजना अजून आलेली नाही. तुमच्या आसपास भागात सरकारने आयोजन केलेल्या शिबिराची माहिती घ्या आणि तिथे भेट द्या. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन तिथून माहिती घेऊ शकता.
- e-KYC प्रक्रिया पूर्ण करा – ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा आधार नंबर तुमच्या आयडीशी लिंक कार्यासाठी e-KYC प्रक्रिया करून घ्या. त्यामुळे या योजनेसाठी तुमची ओळख व्हेरिफाय होण्यासाठी मदत होईल.
- आवश्यक असणारी कागदपत्रं जोड: अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडा जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, बँक खाते झेरॉक्स कॉपी.
- त्यानंतर आता अर्ज व कागदपत्र शिबिरातील अधिकाऱ्याकडे जमा करा आणि त्यांच्याकडून पोच पावती किंवा तुमचा अर्ज केलेला रजिस्ट्रेशन नंबर घ्या.
- ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल याची वाट बघा. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर, योजनेच्या ठरलेल्या कालावधीत किंवा त्या तारखेला तुम्हाला या योजनेचा हप्ता जमा होईल.
लाडली बहना योजनेसाठी कोण पात्र आहेत?
लाडली बेहना योजनेसाठी महिला ही विवाहित असावी, तसेच ती महिला मध्य प्रदेश मधील रहिवासी असावी. आणि त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा कमी असावे.
लाडली बहना फॉर्म ऑनलाईन भरता येईल का?
हो, लाडली बेहना योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन भरू शकता.
3 thoughts on “‘लाडली बहना’ योजना, महिलांना मिळणार १८०००/- रुपये वर्षाला: Ladli Behna Yojana in Maharashtra 2024”