कुक्कुट पालन योजना, 75 टक्के अनुदान मिळणार: Kukut Palan Yojana Maharashtra 2024

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 : शासनाच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने ही कुक्कुट पालन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

कुक्कुट पालन योजना विषयी संपूर्ण माहिती या पोस्टवर आपण जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना काय आहे आणि कोणासाठी आहे? योजनेचे फायदे काय आहेत? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? याविषयी सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये दिलेली आहे, तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

Kukut Palan Yojana Maharashtra

Kukut Palan Yojana Maharashtra 2024 Information in Marathi :

योजनेचे नावकुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?राज्यातील नागरिकांना कुक्कुट पालन हा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक अनुदान देणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ१ लाख ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कुक्कुट पालन योजना नक्की काय आहे?

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे. आज काल राज्यातील बरेच तरुण युवक स्वतःचा एक उद्योग सुरू करण्यासाठी विचार करत असतात. त्यांच्यासाठी कुक्कुट पालन हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो.

त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना एक रोजगार मिळेल, तसेच पशु पालनाला चालना सुद्धा मिळेल आणि देशाचा औद्योगिक विकास होण्यास मदत होईल. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेसाठी आवश्यक पात्रता :

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

कुक्कुट पालन योजनेअंतर्गत दिला जाणारा प्राधान्यक्रम :

  • मागासवर्गीय व्यक्ती
  • दारिद्र रेषेखाली असणारे नागरिक
  • भूमिहीन शेतमजूर
  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेसाठी काही अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत :

  • या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच लाभ देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेसाठी मुदत ही योजना सुरू झाल्यापासून 30 ते 45 दिवसांच्या आत असेल. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त किंमत झाल्यास पुढील जास्तीचा खर्च तो लाभार्थी व्यक्तीने स्वतः करणे गरजेचे आहे.
  • एक दिवसाचे पिले वाटप करतेवेळी विशिष्ट रोगांवरील लसीकरण जसे की राणीखेत, मरेक्स, देवी आणि आर.डी. या रोगांवर लसीकरण जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अंतर्गत करून घेणे आवश्यक आहे.
  • समजा या योजनेसाठी एखाद्या लाभार्थ्याची निवड झाली असेल, तर त्या लाभार्थ्याला या योजनेसाठी पुढची 5 वर्षे दुसऱ्यांदा लाभ घेता येणार नाही.
  • तसेच या योजनेअंतर्गत पिल्लांसाठी लागणारा निवारा, औषधे, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी आणि वाहतुकीचा खर्च इत्यादी लागणारा सर्व खर्च हा लाभार्थ्यांनी करणे गरजेचे आहे.

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू इच्छुक आहेत, अशा तरुणांना 75% आर्थिक अनुदान देणे हा आहे.
  • पशु पालन या व्यवसायाला चालना देणे.
  • महाराष्ट्रातील राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांना शेती सोबतच एक जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन व्यवसाय सुरू होत आहे.
  • महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास करणे आणि तरुणांना व्यवसायाकडे आकर्षित करणे.

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेचे फायदे :

  • या योजनेमुळे तरुण युवकांना त्यांचा स्वतःचा कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेमुळे बेरोजगारी कमी होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेमुळे राज्याचा आर्थिक विकास होईल.

सरकारच्या इतर योजना :

कुकुट पालन योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध पक्षांच्या जाती :

  • वनराज
  • गिरीराज
  • ब्लॅक
  • अस्ट्रोलॉप
  • कडकनाथ
  • आय आय आर
  • आणि इतर सरकारमान्य जातीचे पक्षी

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक खात्याची माहिती
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा

Kukut Palan Yojana Maharashtra योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत :

  • कुक्कुट पालन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्हाला तुमच्या जवळच्या भागातील जिल्हा कार्यामध्ये भेट द्यायची आहे.
  • जिल्हा कार्यालयामध्ये पशुसंवर्धन विभागात जाऊन कुक्कुट पालन योजना अर्ज घ्यायचा आहे.
  • तिथून अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरायचे आहे, आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्र सोडून तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अशाप्रकारे, आपल्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.

1 thought on “कुक्कुट पालन योजना, 75 टक्के अनुदान मिळणार: Kukut Palan Yojana Maharashtra 2024”

Leave a comment