Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 | कलाकार मानधन योजना 2024, असा करा अर्ज…

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्यातील साहित्य व कला या क्षेत्रात असलेल्या कलावंतांना आर्थिक अडचणीमुळे त्यांचे हाल होऊ नये, या मुख्य हेतुने ही योजना ७ फेब्रुवारी २०१४ रोजी सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना ३,१५०/- रुपयांची आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024

कोरोना काळामध्ये आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे सांस्कृतिक संचालनालय तर्फे राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यातील जवळपास ५६ हजार कलावंतांना आर्थिक मदत पुरवणार असल्याचे जाहीर केले.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra Information in Marathi :

योजनेचे नावकलाकार मानधन योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत पुरवणे.
लाभार्थीराज्यातील वृद्ध कलाकार
लाभ३,१५०/- रु. प्रति महिना आर्थिक साहाय्य
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 काय आहे?

कलाकार हे त्यांच्या तरुण वयात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत असतात आणि राज्यातील नागरिकांचे मनोरंजन देखील करत असतात. पण जसे जसे त्यांचे वय वाढत जाते त्यांना मनोरंजन करणे शक्य होत नाही. कलाकारांना कोणत्याही प्रकारचा भविष्य निधी नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो. महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकारांच्या या सगळ्या समस्यांचा विचार करून राज्य सरकार द्वारे कलाकार मानधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 पात्रता (Eligibility) :

  • या योजनेसाठी अर्जदार कमीत कमी पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

कलाकार मानधन योजनेच्या काही अटी :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कलाकार हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तसेच बाहेरच्या राज्यातील कलाकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराने कलाकार म्हणून कमीत कमी १५ ते २० काम केलेले असावे.
  • अर्जदार कलाकारांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महत्त्वाचे म्हणजे कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग व अर्धांग वायू या रोगांनी त्रस्त असलेल्या त्याचप्रमाणे 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक रित्या व्यंग किंवा अपघातामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास जे कलाकार स्वतः व्यवसाय करू शकत नसल्यास अशा कलाकारांना वयाची अट राहणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या कलाकाराची वार्षिक उत्पन्न हे 48,000/- रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
  • प्रत्येक वर्षी मानधनाची रक्कम मिळण्यापूर्वी संबंधित कलाकार हयात असल्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक असणार आहे.
  • शासनाच्या इतर कोणत्याही योजनेखाली नियमितपणे मासिक रित्या आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरत नाही.
  • अर्जदाराने अर्जामध्ये ज्या ज्या कलेचा उल्लेख केला आहे त्या कलाक्षेत्राविषयी आवश्यक असणारे पुरावे, जसे की रेडिओ आकाशवाणी कसारा मार्फत कार्यक्रमाची माहिती आणि त्या संबंधित फोटोज, वर्तमानपत्रातील कात्रणे तसेच कला सादरीकरणाचा पुरावा देखील अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकारांचे त्यांच्या वृद्धापकाळत आर्थिक रित्या हाल होऊ नयेत या हेतूने कलाकार मानधन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
  • वृद्ध कलाकारांचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच वृद्ध कलाकारांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी भासू नये या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे.
  • तसेच कला क्षेत्रास प्रोत्साहन देणे व वृद्ध कलाकारांचे जीवनमान सुधारणे.
  • वृद्ध कलाकारांना त्यांच्याविरुद्ध काळात सशक्त, निरोगी व आत्मनिर्भर बनवणे.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 योजनेचे फायदे काय आहेत?

  • कलाकार मानधन योजनेचा मुख्य फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकारांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • तसेच वृद्धा काळात वृद्ध कलाकारांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही.
  • वृत्त कलाकारांचा आर्थिक दृष्टीने विकास होईल त्याचप्रमाणे त्यांची जीवनमान सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
  • तसेच वृद्ध कलाकारांना त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेतल्यानंतर वृद्ध कलाकार आत्मनिर्भर होतील आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल व जगण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल.

सरकारच्या इतर योजना :

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • कलाकार मानधन योजनेचा अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल ID
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • कलाकार म्हणून कमीत कमी १५ ते २० वर्षे काम केल्याचे पुरावे.
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)
  • बँक खात्याचा तपशील

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास सर्वात पहिला अधिकृत पोर्टलवर जाऊन या योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर नवीन युजर (New User) या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तुम्हाला दोन पर्याय दिसतील, आता यामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती भरून नोंदणी करायची आहे.
  • या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता.
  • आता पण नाही होम पेज वरती यायचे आहे Search Box मध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना हे टाईप करून Search करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर या योजनेची माहिती दिसेल, त्या माहितीवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, यामध्ये लागू करा या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • ही सर्व प्रोसेस केल्यानंतर आता या योजनेसाठी असलेला अर्ज ओपन होईल, या अर्ज मध्ये विचारलेली आवश्यक असणारी सर्व माहिती काळजीपूर्वक भरून त्यासोबत आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून Submit या बटनवर क्लिक करायचे आहे.
  • या प्रकारे तुम्ही कलाकार मानधन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :

कलाकार मानधन योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या क्षेत्रातील गटविकास अधिकारी किंवा समाज कल्याण अधिकारी किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरायचा आहे आणि त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा आहे.

मचा ऑफिशियल What’s App Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा


9 thoughts on “Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2024 | कलाकार मानधन योजना 2024, असा करा अर्ज…”

  1. चांगली माहिती दिली आहे आभारी आहोत साहेब

    Reply
  2. खूप छान माहिती दिली आहे.
    धन्यवाद
    जय हरी..

    Reply

Leave a comment