महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात बऱ्याच लोकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. काही शेतकरी शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय सुद्धा करतात. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे ते शेतकरी पशुपालन हा व्यवसाय सुरू करतात. पशुपालन व्यवसाय करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. जसे की गाय, म्हैस, शेळी यांना जास्त प्रमाणात हिरवा चारा द्यायला लागतो.
या पशूंना दिला जाणारा हिरवा चारा हा कापावा लागतो आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हा चारा कापण्यासाठी शेतकऱ्यांजवळ योग्य ते साधन नसल्यामुळे त्यांना खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करण्याचा विचार केला आहे.
तर मित्रांनो कडबा कुट्टी मशीन योजनेविषयी संपूर्ण माहिती आम्ही या पोस्टमध्ये दिलेली आहे. जसे की ही योजना काय आहे, फायदा काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा. याविषयी सविस्तर माहिती आम्ही या खाली दिलेली आहे, तरी ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra Information in Marathi :
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकारद्वारे |
योजनेचा उद्देश काय आहे? | शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशु पालक |
लाभ | ५० टक्के अनुदान दिले जाणार म्हणजेच १० हजार रुपये. |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन किंवा ऑफलाईन |
शासनाचा निर्णय (GR) | PDF डाउनलोड करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra नक्की काय आहे?
- गाई, म्हशींना हिरवा चारा देण्या अगोदर तो कापावा लागतो, शेतकऱ्यांजवळ चारा कापण्यासाठी कोणत्याही प्रकारचे योग्य ते साधन नसल्यामुळे त्यांना हाताने चारा कापावा लागतो. हाताने चारा कापताना खूप जास्त मेहनत करावी लागते त्यादरम्यान शेतकऱ्यांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. शेतकरी हा आर्थिक दृष्टीने गरीब असल्यामुळे शेतकऱ्याला चारा कापण्याची मशीन खरेदी करता येत नाही.
- त्यामुळेच शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी लागणारी 2 HP इलेक्ट्रिक कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 50% अनुदान दिले जात आहे. या मशीन चा वापर करून शेतकरी अगदी वेगाने चारा टाकू शकेल आणि वेळेतही बचत होईल, त्यासोबतच शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करत आहेत त्यांना कळवा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. साधारणता कडबा कुट्टी मशीन ची किंमत 20 हजार रुपये इतकी असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते, पण उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरणे गरजेचे आहे.
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra पात्रता, अटी व शर्ती :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा ग्रामीण भागातील व्यक्ती असणे आवश्यक आहे, तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराकडे स्वतःचे पशु (गाय, म्हस, शेळी) असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे कमीत कमी 2 पशु/ जनावरे असणे बंधनकारक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी कडबा कुट्टी मशीन लाभार्थ्याला विकता येणार नाही.
- तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- मुंबई व मुंबई उपनगर मधील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. कारण ते या योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत.
- या अगोदर ज्या नागरिकांना इतर कोणत्याही योजनेमधून कडबा कुट्टी मशीन मिळाली असेल तर, त्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra या योजनेचा उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मोफत कडबा कुट्टी मशीन देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रयत्न करणे.
- शेतकऱ्यांना शेतीमध्ये आणि पशुपालन व्यवसायामध्ये तेज निर्माण करणे आणि वेळेची बचत करणे.
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra या योजनेचे फायदे काय आहेत?
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर पशुपालन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना कडबा कुट्टी मशीन दिली जाणार आहे.
- या मशीनचा वापर करून पशुंना दिला जाणारा चारा हा जलद गतीने त्याचप्रमाणे चाऱ्याची नासाडी न होता कापता येणार आहे.
- या मशीनच्या सहाय्याने चारा हा बारीक कापता येतो, चारा बारीक केल्यामुळे हा जनावरांना चारा खाण्यास सोपे जाते व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
- योजनेच्या माध्यमातून कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच 10 हजार रुपये दिले जातील.
- राज्यातील शेतकरी तसेच इतर नागरिक पशुपालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित आणि आकर्षित होतील.
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल. त्याप्रमाणे देशाचा सुद्धा आर्थिक विकास होईल.
- चारा कापण्यासाठी मशीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःहा हाताने चारा कापण्याची आवश्यकता वाचणार नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि वेळेची बचत सुद्धा होईल.
सरकारच्या इतर योजना :
- ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना : Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024
- ई-श्रम कार्ड काढल्यास 2 लाख रुपये मिळणार : E Shram Yojana in Marathi 2024
- मुलींना मिळणार फ्री स्कुटी : Free Scooty Yojana 2024 Maharashtra
- कुक्कुट पालन योजना, 75 टक्के अनुदान मिळणार: Kukut Palan Yojana Maharashtra 2024
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याची माहिती
- कडबा कुट्टी मशीन खरेदी केलेल्याची पावती/ बिल
- पशुंचा/ जनावरांचा विमा काढल्याचे प्रमाणपत्र
Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल वरती जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईटच्या होम पेज वरती गेल्यानंतर अर्जदार व्यक्तीला आपल्या User Name आणि Password चा वापर करून लॉगिन करायचे आहे. जर तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिथे स्वतःची नोंदणी करायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शेती योजना यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला आता शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले सर्व योजनांची लिस्ट दिसेल, ती लिस्ट पाहायचे आहे त्यामधून तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना यावरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल, अर्जामध्ये विचारले गेलेले सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड करून Submit या बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत किंवा जिल्हा कार्यालयात जायचे आहे.
- तिथे गेल्यानंतर पशुसंवर्धन विभागात जाऊन या योजनेसाठी अर्ज घ्यायचा आहे.
- अर्धा मध्ये विचारले गेलेली सर्व माहिती नीट वाचून भरायची आहे आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायचे आहेत.
- त्यानंतर हा अर्ज तुम्ही कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
सारांश :
तर मित्रांनो, कडबा कुट्टी मशीन योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्टद्वारे दिलेले आहे. तरी तुम्हाला या योजनेच्या संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कमेंट करू शकता किंवा आम्हाला ई-मेल द्वारे सुद्धा कळवू शकता. आम्ही तुम्हाला लवकरच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
1 thought on “मोफत कडबा कुट्टी मशीन योजना : Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra 2024”