Flour Mill Yojana Maharashtra 2024 : तर मित्रांनो, आज आपण महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पिठाची चक्की योजना या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. पिठाची चक्की योजना नक्की काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? आणि या योजनेसाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे? याबद्दल संपूर्ण माहिती आपण या पोस्टच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहेत. या योजना अंतर्गत महिलांना पिठाची चक्की पुरवणे तसेच महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे यासंदर्भात या योजना आहेत. या योजना अंतर्गत आता अटी आणि शर्ती काय आहेत? योजनेसाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी आपण या पोस्टद्वारे जाणून घेऊयात.
पिठाची गिरणी योजना २०२४ :
योजनेचे नाव | पिठाची चक्की योजना २०२४ |
विभाग | महिला बालकल्याण विभाग |
योजनेचा उद्देश | राज्यातील महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे |
लाभ | १०० टक्के अनुदान |
लाभार्थी | आर्थिक रित्या गरीब कुटुंबातील महिला |
जिल्हा | बुलढाणा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. |
Flour Mill Yojana Maharashtra 2024 उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टीने गरीब असणाऱ्या महिलेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या एक छोटाच उद्योग सुरु करता यावा आणि यामधून मिळालेल्या पैशातून ते आपले घर चालवू शकतील आणि कुटुंबातील आर्थिक गरजा सुद्धा भागवू शकतील यामुळे ही योजना सुरु करण्यात आली आहे.
- महिलांना आत्मनिर्भर बनवणे तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेमागील उद्देश आहे.
- महिलांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करणे.
Flour Mill Yojana Maharashtra 2024 वैशिष्ट्य :
- ही योजना महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत सुरु करण्यात आलेली आहे.
- तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे, यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांना कोणतीही समस्या होणार नाही.
- या योजने अंतर्गत १०० टक्के अनुदान मिळणार आहे, त्यामुळे लाभार्थी महिलेला स्वतःहा जवळची रक्कम भरायची गरज नाही.
- पिठाची गिरणी योजना ही खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
Flour Mill Yojana Maharashtra 2024 नियम व अटी :
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलाच घेऊ शकतात.
- तसेच शहरी भागामधील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबातील महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल.
- तसेच अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरदार असता काम नये.
- एका कुटुंबातील एकाच मुलीला किंवा महिलेला या योजनेचा लाभ येत येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीची/ महिलेची वयोमर्यादा ही १८ वर्षे ते ६० वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या मुलीचे किंवा महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० हजार या पेक्षा जास्त नसले पाहिजे.
Pithachi Girani Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रतिज्ञा पत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक खात्याचा तपशील
- व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यासबाबत नमुना नं ८ अ चा घराचा उतारा जोडता.
- वीज बिल
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
सरकारच्या इतर योजना :
- PM सूर्य घर मोफत वीज योजना : pm surya ghar muft bijli yojana in marathi
- उज्वला गॅस योजना (गॅस फ्री मिळणार) : Ujjwala Gas Yojana Marathi 2024
- आंतरजातीय विवाह केल्यास २.५० लाख रु. मिळणार : Antarjatiya Vivah Yojana
पिठाची गिरणी योजना २०२४ साठी अर्ज रद्द होण्याची कारणे :
- अर्जदाराने एकाच वेळेस २ वेळा अर्ज केला असेल तर अशा वेळेस त्यातील एक अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी नसेल तर त्यावेळी अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार महिलेने जर केंद्र किंवा राज्य शासन या अंतर्गत असणाऱ्या इतर मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ घेतलास असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
Pithachi Girani Yojana 2024 अर्ज प्रक्रिया :
- या योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या महिला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- त्यासाठी सर्वात पहिला त्यांना आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामधून किंवा जिल्ह्यामधील महिला व बालकल्याण विभाग येथे भेट द्यावी लागेल.
- कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथून पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि हा अर्ज त्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- या पद्धतीने तुम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत पिठाची गिरणी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
मोफत पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहणार आहे.
पिठाची गिरणी योजना 2024 साठी किती अनुदान दिले जाते?
या योजनेसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेला कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.
Pithachi Girani Yojana 2024 साठी अर्ज कुठे करायचा?
या योजनेसाठी अर्ज हा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा जिल्ह्यामधील महिला व बालकल्याण विभागामध्ये करायचा आहे.
मोफत पिठाची गिरणी योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामधील महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणें व त्यांना आत्मनिर्भर बनवणे. तसेच महिलांना त्यांचा स्वतःचा उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहन देणे.
1 thought on “पिठाची चक्की योजना, ९०% अनुदान मिळणार : Flour Mill Yojana Maharashtra 2024”