शैक्षणिक कर्ज योजना : Education Loan Scheme by Government 2024

Education Loan Scheme by Government 2024 : मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक कर्ज योजने संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा कुटुंबामध्ये पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बँक किंवा इतर संस्थेमध्ये शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करतात. पण बँक किंवा इतर संस्था यांच्या अटी व शर्ती खूप कठोर असल्यामुळे व कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचा फिक्स इन्कम नसल्यामुळे त्यांना कर्ज दिले जात नाही. या कारणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो व या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती विपरीत परिणाम होतो.

Education Loan Scheme by Government

Education Loan Scheme by Government Information in Marathi :

योजनेचे नावशैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थीराज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थी
लाभ20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Education Loan Scheme by Government काय आहे?

त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारद्वारे शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील व त्याचप्रमाणे ते स्वतःचा सामाजिक व आर्थिक विकास करू शकतील.

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

Education Loan Scheme by Government पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्ज योजनेच्या नियम व काही अटी :

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ज्या योजनेचा लाभ घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे.
  • तसेच अर्जदार हा अनुसूचित जातीमधील चर्मकार समाजातील असावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान व अनुभव त्याला असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी हे 98,000/- रुपये व शहरी भागासाठी 1,20,000/- रुपयांपर्यंत असावे.
  • उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला हा तहसीलदार किंवा त्सम सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदाराने या अगोदर महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांमधून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाकडून वेळोवेळी घातलेल्या अटी व शर्ती अर्ज दारावर बंधनकारक राहतील याची अर्जदाराने नोंद घ्यावी.

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप काय आहे :

  • शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपये कर्ज दिले जाते. तसेच परदेशामध्ये शिक्षणासाठी 20 लाख रुपये कर्ज दिले जाते.

योजनेअंतर्गत आकारला जाणारा व्याजदर किती आहे :

  • शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावरती 4% व्याजदर आकारण्यात येतो.

Education Loan Scheme by Government या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
  • समाजामध्ये विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणे.
  • तसेच अनुसूचित जातीमधील चर्मकार समाजातील उदा. (चर्मकार, होलार, ढोर, मोची इत्यादी) व्यक्तींचे जीवनमान उंचावणे.

Education Loan Scheme by Government चे फायदे काय आहेत?

  • शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अतिशय कमी दरात व्याज उपलब्ध करून दिले जाते.
  • तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे देशांतर्गत शिक्षण तसेच परदेशातील शिक्षण पूर्ण करता येणार आहे.

सरकारच्या इतर योजना :

Education Loan Scheme by Government साठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यामधील जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन समाज कल्याण व शैक्षणिक विभागांमध्ये जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
  • त्यानंतर अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे हे सर्व कार्यालयामध्ये जमा करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही शैक्षणिक कर्ज योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

सारांश :

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच शैक्षणिक कर्ज योजनेची काही प्रश्न असल्यास तुम्ही ते कमेंट करू शकता किंवा आम्हाला थेट मेल पाठवू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

1 thought on “शैक्षणिक कर्ज योजना : Education Loan Scheme by Government 2024”

Leave a comment