E Shram Yojana in Marathi 2024 : केंद्र आणि राज्य सरकार द्वारे ई-श्रम योजना सुरु करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्र म्हणजेच, बांधकाम कामगार, टमटम, शेती कामगार, फेरीवाले, घरगुती कामगार, आणि इतर स्थलांतरित कामगार हे श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
तसेच या कार्डचे फायदे काय आहेत, पात्रता काय असणार आहे आणि हे कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या पोस्टमध्ये दिली आहे. तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या योजनेबद्दल अचूक माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा सहजपणे लाभ घ्याल.
E Shram Yojana in Marathi Information in Marathi :
योजनेचे नाव | E Shram Yojana in Marathi |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | असंघटित क्षेत्रातील कामगार |
लाभ | प्रत्येक महिन्याला ३,०००/- रु. |
विम्याचे फायदे | 2 लाख रुपयांचा मृत्यू विमा आणि अंशतः अपंगत्वाची १ लाख रुपये मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://eshram.gov.in/ |
ई-श्रम कार्ड नक्की काय आहे?
- असंघटित क्षेत्रात म्हणजेच बांधकाम कामगार, शेती कामगार, फेरीवाले, घरगुती कामगार या प्रकारचे कामगार व्यक्ती ई-श्रम कार्ड काढू शकतात. हे कार्ड काढल्यामुळे अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ६० वर्षानंतर पेन्शन, मृत्यू विमा आणि वृद्धपकाळात अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाते.
E Shram Yojana in Marathi पात्रता (Eligibility) :
- चालू असलेला मोबाईल नंबर
- उमेदवाराचे वय १६ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
E Shram Yojana in Marathi या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
- या योजनेमुळे असंघटित कामगार हे आर्थिक रित्या सक्षम आणि स्वावलंबी होतील.
- देशातील कामगार आर्थिक दृष्टीने सुरक्षित राहतील.
- या योजने अंतर्गत कामगारांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन दिली जाणार आहे, त्यामुळे त्यांना वृद्धपकाळात काम करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- भविष्यात कोरोना सारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे.
- तसेच या योनेमुळे देश आर्थिक रित्या मजबूत होईल.
E Shram Yojana in Marathi फायदे काय आहेत?
- या योजनेतर्फे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ३,०००/- रुपये इतकी पेन्शन देण्यात येणार आहे.
- त्यासोबतच या योजनेअंतर्गत २,००,०००/- रुपयांचा मृत्यूचा विमा आणि जर समजा कामगाराचे अंशतः अपंगत्व असल्यास त्यांना १,००,०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
- जर समजा ई-श्रम कार्ड असलेल्या कोणत्याही असंघटित कामगाराचा अपघातामध्ये मृत्यू झाला असल्यास, त्या व्यक्तीच्या जोडीदाराला या योजनेचे सर्व फायदे घेता येतील.
सरकारच्या इतर योजना :
- मुलींना मिळणार फ्री स्कुटी : Free Scooty Yojana 2024 Maharashtra
- कुक्कुट पालन योजना, 75 टक्के अनुदान मिळणार: Kukut Palan Yojana Maharashtra 2024
- रमाई घरकुल योजना 2024 अर्ज सुरु । Ramai Awas Yojana 2024 Online Registration
E Shram Yojana in Marathi योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक खात्याची माहिती
- आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर
E Shram Yojana in Marathi साठी अर्ज कसा करायचा?
- या योजनेसाठी तुम्ही २ प्रकारे नोंदणी करू शकता, एक म्हणजे तुम्ही स्वतः करू शकता किंवा सहाय्यक मोड द्वारे सुद्धा नोंदणी करू शकता.
- स्वतःहा नोंदणी करण्यासाठी तुम्हाला eShram पोर्टल किंवा युनिफाईड मोबाईल अप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (UMANG) या मोबाईल एप्लिकेशनचा वापर करू शकता.
- आणि सहाय्यक मोडद्वारे नोंदणी करायची असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रास भेट देऊ शकता.
E Shram Card Yojana in Marathi साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत :
- ई-श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई-श्रम पोर्टलला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर आधार कार्ड सोबत लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा भरा आणि “ओटीपी पाठवा” या बटनावर क्लिक करा.
- त्यानतंर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. तो OTP इथे टाका आणि Verify या बटनावरती क्लिक करा.
- त्यानंतर शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर आवश्यक ती माहिती भरा आणि त्यानंतर कौशल्याचे नाव, व्यवसायाचे स्वरूप काय आहे आणि कामाचा प्रकार कोणता आहे ते निवडा.
- त्यानंतर तुमच्या बँकेनं खात्याची माहिती भरा. माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो ओटीपी इथे टाका.
- या सर्व स्टेप्स झाल्यानंतर तुम्हाला ई-श्रम कार्डची सर्व माहिती दिसेल. याठिकाणी तुम्ही तुमचे ई-श्रम कार्ड इथून डाउनलोड करू शकता.
ई-श्रम कार्ड कसे डाउनलोड करायचे?
- सर्व प्रथम ई-श्रम पोर्टल वर जा.
- त्यानतंर तुमच्या समोर एक पर्याय दिसेल “आधीपासून नोंदणीकृत” यावरती क्लिक करायचे आहे. आणि “UAN कार्ड डाउनलोड करा” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, इथे तुम्हाला तुमचा UAN नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा भरायची आहे. आणि “ओटीपी तयार करा” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि “Validate” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती इथे भरायची आहे.
- भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का चेक करण्यासाठी “पूर्वलोकन” हा ऑप्शन निवडायचा आहे आणि “Submit” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आणखी एकदा तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि “Verify” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचे ई-श्रम कार्ड दिसेल. डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ई-श्रम कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकता.
ई-श्रम कार्ड मधील पेमेंट स्टेटस/ ई-श्रम कार्ड मधील शिल्लक रक्कम कशी तपासायची?
- सर्व प्रथम E-Shram पोर्टलवर जा.
- त्यानंतर “ई-आधार कार्ड लाभार्थी स्टेटस चेक” या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानतंर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला ई-श्रम कार्ड नंबर, UAN नंबर किंवा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि “सबमिट” या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- या पद्धतीने तुम्ही तुमचा ई-श्रम पेमेंट स्टेटस बघू शकता.
1 thought on “ई-श्रम कार्ड काढल्यास 2 लाख रुपये मिळणार : E Shram Yojana in Marathi 2024”