Divyang e rickshaw yojana 2024 : दिव्यांगांना म्हणजेच अपंग व्यक्तींना मोफत ई रिक्षा मिळणार आहे. त्या संदर्भात आपण मागच्या वेळी फॉर्म सुद्धा भरले होते. आता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची निवड करण्यात आलेली आहे, ई-रिक्षा म्हणजेच फिरते दुकान हे वाटप करण्यात येणार आहे, याची जी काही लिस्ट आहे, कुणाकुणाचा यामध्ये नंबर लागलेला आहे ती यादी लागलेली आहे, तरी या पोस्टमध्ये ही लिस्ट आपण कशी डाऊनलोड करायची यामध्ये तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं हे पाहणार आहे. अशाच महत्वपूर्ण पोस्ट तुम्हाला भेटत राहतील. पोस्ट शेवटपर्यंत पहा. यादी मित्रांना शेअर करा.
Divyang e rickshaw yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | Divyang e rickshaw yojana 2024 |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना मोफत ई रिक्षा उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | राजयोतील दिव्यांग नागरिक |
लाभ | मोफत ई-रिक्षा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://evehicleform.mshfdc.co.in/ |
Divyang e rickshaw yojana 2024 काय आहे?
- दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकुल फिरत्या वाहनावरील दुकानाचे (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) करीता 3.75 लाख प्रती लाभार्थी कमाल अनुदान उपलब्ध करणे व त्याकरीता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेने वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे, निवड केलेल्या व्यवसायानुरुप दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे, वाहनाची प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कडून नोंदणी करणे, दिव्यांग लाभार्थ्यांस व दिव्यांग लाभार्थ्यांस परवाना देण्यास नाकारल्यास त्याच्या वतीने वाहने चालविणाऱ्या सामान्य व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देणे, तसेच वाहन विमा उतरविणे. Divyang e rickshaw yojana 2024
- तसेच संबंधीत महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषदा / ग्रामपंचायत यांचेकडून फिरता व्यवसाय करण्याचा परवाना मिळवून देणे समन्वय व सनियंत्रण इ. कार्ये पार पाडावी लागतील. संबंधित संस्थेची व्यवसायांवर नियंत्रणाची कार्यप्रणाली सहपत्र-ब मध्ये दर्शविली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येईल.
How to Download Divyang e rickshaw yojana list 2024
मित्रांनो तुम्हाला लिस्ट डाऊनलोड करायची असेल तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगतो.
- ई रिक्षा यादी डाऊनलोड करण्यासाठी evehicleform.mshfdc.co.in या वेबसाईट वरती यायचं आहे.
- इथं आल्यानंतर तुम्हाला खाली पाहू शकता एप्लीकेशन स्टेटस चेक करू शकता आणि इथे नोटीस सुद्धा दिलेली आहे.
- आपल्याला लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी राइट साईडला एक ऑप्शन दिलेला आहे see beneficiary list यावर क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला Select Division सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये येतात कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती, संभाजीनगर, अमरावती, नागपूर
- डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही Select District जिल्हा असेल या जिल्ह्याची तुम्हाला लिस्ट पाहिजे व जिल्हा येथे सिलेक्ट करा
- त्यानंतर व्ह्यू बटनावरती क्लिक करा आणि थोडं थांबायचं आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली पाहू शकता खाली जी काही लिस्ट आहे ती ते दिसेल
ई रिक्षा योजना लिस्ट pdf डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
या लिस्टमध्ये ज्यांना ज्यांना आता इलेक्ट्रिक रिक्षा मिळणार आहे म्हणजेच वाहन दुकान मिळणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा ज्यांना मिळणाऱ्या त्यांची नावे इथे दाखवली जाते 100% जे जे अपंग आहेत त्यांचीच नाव आलेली दिसत आहेत. त्यामुळे बाकीच्यांची निवड झालेली नाहीत 100% अपंग आहे त्यांची लिस्ट इथे लागलेली आहे, त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे. Divyang e rickshaw yojana 2024
Divyang e rickshaw yojana 2024 Beneficiary Status Check :
- एप्लीकेशन स्टेटस सुद्धा तुम्ही इथे डाव्या साईडला evehicleform.mshfdc.co.in/track क्लिक करून ऑप्शन आहे ज्यामध्ये आपलिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून चेक करा.
- ट्रॅक अप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचे अप्लिकेशन पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालेला आहे का हे दाखवेल
- आता इथं माझं एप्लीकेशन पेंडिंग असेल तर पुढच्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागू शकतो.
- माझी टक्केवारी कमी आहे त्यामुळे अजूनही माझी निवड झाली नाही
फक्त 100% त्यांची होते त्यांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडे एप्लीकेशन अपलोड झालेले पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर इथे तुम्ही पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करू शकता आता ज्या ज्या अपंग व्यक्तींना नवीन फॉर्म भरायचे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सूचना लागलेली आहे की एक तारखेपासून म्हणजे एप्रिल पासून तुम्ही फॉर्म भरू शकता पण ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे त्यांचं काय तर
How to Apply Divyang e rickshaw E-vehicle form 2024 :
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरल्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
- प्रस्तुत योजनेकरिता एकूण ४५,३८९ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावर करण्यात आले असून
- दिनांक १०.०६.२०१९ व दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणारे म्हणजेच १००% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ६६७ दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक ०१.०४.२०२४ रोजीपासून पुढील आर्थिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापुर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींनी दिनांक ०१.०४.२०२४ रोजीपासून ऑनलाईन अर्ज https://evehicleform.mshfdc.co.in या लिंकवरुन सादर करावे
सरकारच्या इतर योजना :
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024, महिलांना मिळणार ३ सिलिंडर मोफत । Mukhyamantri Annapurna Yojana 2024
- Maha Yojana Doot Registration 2024 : महा योजना दूत नोंदणी २०२४
- दिव्यांग योजना महाराष्ट्र, अपंग पेंशन योजना 2024 : Maha Sharad Portal Registration 2024
- प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) 2024, दर महा मिळणार 5000 रूपये, ऑनलाईन अर्ज | PM Internship Scheme 2024
आमचा ऑफिशियल What’s App Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा