छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद योजना : Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana 2024

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana 2024 : मित्रांनो राज्य सरकार सामान्य नागरिकांसाठी विविध योजना घेऊन येत असते. तसेच या 2024 आर्थिक वर्षामध्ये छत्रपती संभाजी नगर मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 20 टक्के उपकरातून आणि ५ टक्के (दिव्यांग) उपकरातून ग्रामीण भागातील मागासवर्गीय व्यक्तींना तसेच दिव्यांग असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यासाठी खालील काही योजना सुरू करण्यात आले आहेत. पुढे दिलेल्या योजनांच्या माध्यमातून लोकांना राज्य सरकारकडून 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

या विविध योजनांची माहिती आम्ही खाली दिलेले आहे जसे की, योजना नक्की काय आहे, उद्देश काय आहे, योजनेसाठी आवश्यक पात्रता, योजनेचे फायदे आणि सर्वात महत्त्वाचे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे सांगितले आहे. तरी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा, जेणेकरून तुम्हाला या योजना संबंधित कोणतीही शंका येणार नाही.

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana Information in Marathi :

योजनेचे नावछत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु केली गेली आहे
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा मुख्य उद्देश गरीब व गरजू नागरिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभविविध योजनांच्या मार्फत आर्थिक अनुदान दिले जाणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana अंतर्गत २० टक्के उपकरणातील योजना :

२०% उपकरणामधील योजनाप्रत्येक लाभार्थ्याला दिले जाणारे अनुदान
मागास वर्गीय व्यक्तींना संगणक किंवा लॅपटॉप साठी अनुदान देणे४२,०००/- रु.
मागास वर्गीय व्यक्तींना कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध करून देणे२९,०००/- रु.
मागास वर्गीय व्यक्तींना झेरॉक्सची मशीन उपलब्ध करून देणे४३,०००/- रु.
मागास वर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवून देणे४३,०००/- रु.
मागास वर्गीय महिलांना पिको फॉल साठी शिलाई मशीन उपलब्ध करून देणे९,३००/- रु.
मागास वर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गाई किंवा म्हैस विकत घेण्यासाठी आर्थिक अनुदान देणे४०,०००/- रु.
मागास वर्गीय व्यक्तींना मिरची कापड यंत्र उपलब्ध करून देणे२०,०००/- रु.
मागास वर्गीय शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी शेळीचे गट उपलब्ध करून देणे२५,०००/- रु.

२० टक्के उपकरणातील योजनांसाठी अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती (S.C.), अनुसूचित जमाती (S.T.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि नवबौद्ध या जातीमधील असणे आवश्यक आहे.
  • संगणक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा १२ वी आणि एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रत्येक योजनेसाठी उत्पनाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालमधून काढलेले असणे आवश्यक आहे.
  • महिलांसाठी पिको फॉल शिलाई मशीन या योजनेसाठी शिलाई काम/ शिवणकाम करत असल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
  • तसेच ज्या जोजनेसाठी विद्युत पुरवठा गरजेचा आहे, त्यासाठी विद्युत पुरवठा असल्याचे प्रमाणपत्र हे ग्रामसेवकांकडून घेतले असावे.
दिव्यांगांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेचे नावप्रत्येक लाभार्थ्याला दिले जाणारे अनुदान
दिव्यांग व्यक्तींना विना अट घरकुल देण्याची योजना१,२०,०००/- रु.
अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित ३ चाकी सायकल व इतर गोष्टींसाठी अनुदान१,००,०००/- रु.
निराधार दिव्यांगांसाठी विना अट निर्वाह भत्ता१०,०००/- रु.

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अटी :

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड झेरॉक्स
  • तहसीलदार यांच्याकडून मिळालेला रहिवाशी दाखला
  • या अगोदर लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • घरकुल साठी ८अ उतारा
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • स्कुटर विथ अडप्शन चालवण्यासाठी लाभार्थी व्यक्तीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना असणे गरजेचे आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :

या योजने अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या विभागातील पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.

संपर्कासाठी पत्ता : जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, खिवंसरा सिनेमागृहासमोर, औरंगपुरा, छ. संभाजीनगर पिन कोड : ४३१ ००१.

Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana अंतर्गत काही योजना :

कृषी क्षेत्रातील काही योजना :

  • शेतीसाठी पाणीपुरवठा योजना : शेतातील शेत पिकासाठी पाणी पुरवठा पुरवण्यासाठी हे योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना : भागातील शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय अंतर्गत कर्ज पुरवले जाते.
  • शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते.

शिक्षण क्षेत्रातील काही योजना :

  • समृद्धी विद्यालय योजना : ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व चांगले शिक्षण पुरवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सायकल वितरण योजना : या योजने अंतर्गत ८ वी आणि ९ वी मधील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल पुरवली जाते.
  • कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोफत शिक्षण : या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोफत शिक्षण दिले जाते.

आरोग्य क्षेत्रातील काही योजना :

  • मोफत औषध वितरण योजना : या योजने अंतर्गत गरजू रुग्णांसाठी मोफत औषध पुरवले जाते.
  • आरोग्य विमा योजना : या योजनेच्या माध्यमातून जिल्यामधील गरीब नागरिकांना आरोग्य विमा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

जलसंधारण अंतर्गत योजना :

  • पाणीपुरवठा योजना
  • विहीर व तलावांची निर्मिती व दुरुस्तीसाठी योजना
  • जलसंधारण तंत्रज्ञान प्रशिक्षण

सामाजिक कल्याण अंतर्गत योजना :

  • वृद्ध व अपंग नागरिकांसाठी पेंशन योजना
  • घरकुल योजना
  • मागास वर्गीय लोकांसाठी कल्याणकारी योजना

सरकारच्या इतर योजना :

सारांश :

तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या पोस्ट मध्ये Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana अंतर्गत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तसेच या योजने अंतर्गत काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

1 thought on “छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद योजना : Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana 2024”

Leave a comment