Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2024 : सध्या महाराष्ट्र राज्यात तसेच इतर राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही तरुण बेरोजगारीमुळे नैराशामध्ये जाऊन व्यसनाधीन होत आहेत, तर काही तरुण त्यांचे आयुष्य संपवत आहेत. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्र राज्य सरकारने बेरोजगारी भत्ता सुरु केला आहे.
बेरोजगार भत्ता योजनेची संपूर्ण माहिती आम्ही या पोस्टमध्ये दिलेली आहे. जसे की बेरोजगार भत्ता योजना नक्की काय आहे? या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? आणि मुख्य म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल. याची सर्व माहिती या पोस्टद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल.
“Focus Keyword” Information in Marathi :
योजनेचे नाव | महाराष्ट्र बेरोजगार भत्ता |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा आहे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यामधील बेरोजगार तरुण |
लाभ | २,००० ते २,५०० रुपये प्रति महिना |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://rojgar.mahaswayam.in/#/home/index |
Berojgari Bhatta Yojana Maharashtra नक्की काय आहे?
- बेरोजगार भत्ता योजनेचा मुख्य उद्देश आहे बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेमधून बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला २,००० ते २,५०० रुपये एवढा भत्ता दिला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलींना प्रत्येक महिन्याला ३,००० ते ३,५०० रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील तरुण युवकांना सुशिक्षित करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
Berojgari Bhatta Yojana Maharashtra पात्रता (Eligibility) :
- अर्जदार हा उत्तर प्रदेश मधील कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने कमीत कमी १० वी ची परीक्षा पास केलेली असणे आवश्यक आहे.
- तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा सध्या बेरोजगार असणे आवश्यक आहे. तसेच तो कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीमध्ये काम करत नसला पाहिजे.
- अर्जदाराचे वय हे २१ ते ३५ या वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
Berojgari Bhatta Yojana Maharashtra या योजनेचा उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश असे तरुण आहेत ज्यांचे उच्च शिक्षण झाले असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही. यामुळे बेरोजगार तरुणांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने बेरोजगार भत्ता योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित असलेल्या बेरोजगार तरुणांना राज्य सरकारद्वारे बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे.
- जोपर्यंत तरुणांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे.
- या योजनेमुळे बेरोजगार तरुणांच्या राहणीमानामध्ये बदल होईल व ते आर्थिक रित्या मजबूत होतील.
- त्यामुळे त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
Berojgari Bhatta Yojana Maharashtra फायदे काय आहेत?
- या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे.
- तसेच या योजनेमधून येणाऱ्या रकमेतून बेरोजगार तरुणांना शहरामध्ये नोकरी शोधण्यासाठी मदत होणार आहे.
- या योजनेचा फायदा अशा तरुणांना होणार आहे, ज्यांचे चांगले शिक्षण झाले आहे आणि जे तरुण विद्यार्थी हुशार आहेत, पण त्यांना आर्थिक अडचणींमुळे सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी किंवा खाजगी नोकरी शोधण्यासाठी पैसे नाहीत.
- या योनेद्वारे राज्य सरकार हे ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असून, २,००० ते २,५०० रुपयांची आर्थिक मदत तरुण युवकांना नोकरी मिळेपर्यंत केली जाणार आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळणार.
- तसेच ठिकाण, श्रेणी, विभाग आणि पगार या नुसार नोकरी शोधण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
सरकारच्या इतर योजना :
- ई-श्रम कार्ड काढल्यास 2 लाख रुपये मिळणार : E Shram Yojana in Marathi 2024
- कुक्कुट पालन योजना, 75 टक्के अनुदान मिळणार: Kukut Palan Yojana Maharashtra 2024
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 2024 : Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024
- ठिबक, तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार : Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra 2024
Berojgari Bhatta Yojana Maharashtra योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (मार्कशीट, प्रमाणपत्र इ.)
- नोटरी प्रमाणित प्रतिज्ञापत्र
- एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे नोंदणी प्रमाणपत्र
Berojgari Bhatta Yojana Maharashtra साठी अर्ज कसा करायचा?
- बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :
- सगळ्यात पहिला तुम्हाला Berojgari Bhatta Yojana Maharashtra च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर “नोकरी शोधणारा” हा पर्याय तुम्हाला दिसेल. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लॉगिन चा फॉर्म उघडेल. या लॉगिन फॉर्मच्या खाली एक नोंदणी हा पर्याय दिसेल. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणीचा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विचारली गेलेली सर्व माहिती, उदा. नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर, Next बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक OTP येईल. हा OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि “सबमिट” या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर, तुम्हाला लॉगिन करण्यासाठी मागील पेज वरती जायचे आहे. इथे लॉगिन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. तसेच कॅप्च्या कोड सुद्धा टाकायचा आहे. नंतर लॉगिन बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
1 thought on “राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार ५० लाख रुपयांची मदत । Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2024”