Bal Sangopan Yojana Maharashtra । मुलांना मिळणार २५५०/- रु. प्रति महिना

Bal Sangopan Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाद्वारे सध्या विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणाला चालना देण्याकरिता सरकारतर्फे एक योजना राबवण्यात येत आहे, ती म्हणजे बाल संगोपन योजना. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला बाल संगोपन योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसे की बाल संगोपन योजना म्हणजे काय?, या योजनेचे फायदे काय आहेत, पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? या बद्दल सविस्तर माहिती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला दिलेली आहे तरी ही पोस्ट संपूर्ण वाचा.

Bal Sangopan Yojana Maharashtra

Bal Sangopan Yojana Maharashtra 2024 :

बाल संगोपन योजना सुरु करण्याच्या मागील मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्र राज्यातील, अनाथ, बेघर, ज्यांना कशाचाही आधार नाही, आणि संरक्षण व निवाऱ्याची गरज असणाऱ्या ० ते १८ वर्षांच्या दरम्यान असणाऱ्या मुलांना व मुलींना एखाद्या संस्थेत पाठवण्यापेक्षा कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन आणि विकास व्हावा हा हेतू आहे.

बाल संगोपन योजना ही महाराष्ट्रातील महिला व बाल विकासाच्या विभाग अंतर्गत २००८ पासून सुरु असणारी योजना आहे. या योजनेमधून मुलांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला ११२५/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी की आता २५००/- रु. पर्यंत वाढवता येते. ही योजना फक्त एकल पालकांच्या मुलांसाठीच नसून इतर मुलांसाठी सुद्धा योजना फायदेशीर ठरते. म्हणजेच एखाद्या कुटुंबामध्ये आर्थिक संकट आले असल्यास किंवा मुलाच्या पालकाचे निधन झाले असल्यास, पालक दवाखान्यात भरती असल्यास किंवा पालकांचा घटस्फोट झाला असल्यास, अशा मुलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

Bal Sangopan Yojana Information in Marathi : 

कोरोना काळात कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या मुलांनी आई वडील गमावलेले आहेत अशा मुलांच्या संगोपनासाठी मदत व्हावी, हे सूचना राज्यातील मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये अनाथ मुलांच्या चर्चा करण्यात आली होती. कोरोना काळात कोरोना विषाणूमुळे अनाथ झालेल्या सर्व मुलांना त्यांच्या खात्यात ५० हजार रुपयांची रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

Brief Information of Bal Sangopan Yojana Maharashtra :

योजनेचे नावBal Sangopan Yojana Maharashtra
कोणाद्वारे सुरु करण्यात आलीही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे.
उद्देशया योजनेचा उद्देश मुलांना आर्थिक मदत करणे हा आहे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ किती मिळणार२,२५०/- रु. प्रति महिना
वर्ष२०२४
अधिकृत वेबसाईटwomenchild.maharashtra.gov.in

Bal Sangopan Yojana Maharashtra मुख्य उद्देश काय आहे?

  • जे पालक काही कारणांमुळे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत, अशा सगळ्या पालकांच्या मुलांना आर्थिक दृष्टीने मदत करण्यासाठी महाराष्ट्र बाल संगोपन योजना सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी कमी होणार आहेत.

Bal Sangopan Yojana Maharashtra लाभ आणि वैशिष्ट्ये

  • या योजनेमधून गरीब घरातील पालकांना काही कारणांमुळे त्यांच्या मुलांना शिक्षण देणे कठीण होते, अशा सर्व पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली जाते.
  • तसेच या योजनेमधून २२५०/- रु. प्रति महिना एवढी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
  • बाल संगोपन योजनेची सुरुवात २००८-२०१३ मध्ये झाली.
  • ही योजना महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभाग यांच्या तर्फे राबवण्यात येत आहे.
  • या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलाचे वय हे १ वर्ष ते १८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

Eligibility Criteria For Bal Sangopan Yojana

  • या योजनेसाठी अर्जदाराचे वय हे १ वर्ष ते १८ वर्षांपर्यंत असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • ज्या मुलांना घर नाही, जी मुले अनाथ तसेच असुरक्षित आहेत अशी मुले या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ही कागदपत्रे लागतील :

  • लाभार्त्यांच्या पालकांचे पासपोर्ट साईझ फोटो
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • पालकाचे निधन झाले असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र
  • आय प्रमाण पत्र
  • बँक पासबुक तपशील

सरकारच्या इतर योजना

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज कसा करायचा :

  • सगळ्यात पहिला तुम्हाला Bal Sangopan Yojana Maharashtra च्या बाल व महिला विकास विभाग यांच्या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक Home Page ओपन होईल.
  • Home Page वर तुम्हाला Apply Online या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल.
  • आता अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे.
  • नंतर तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आणि नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • या पद्धतीने तुम्ही बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करू शकता.
काही अडचण आल्यास संपर्क माहिती बघण्याची प्रक्रिया :
  1. सगळ्यात पहिला तुम्ही बाळ व महिला विकास विभाग यांच्या Bal Sangopan Yojana Maharashtra या अधिकृत पोर्टल वर जा.
  2. त्यानंतर तुमच्या समोर एक Contact Us हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  3. नंतर तुमच्या समोर एक यादी ओपन होईल.
  4. या यादीमधून तुम्ही तुमच्या अडचणीनुसार संबंधित विभागाशी संपर्क साधण्यासाठी त्यांची माहिती इथे पाहू शकता.
बाल संगोपन योजनेसाठी अर्ज डाउनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
बाल संगोपन योजना GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

 

1 thought on “Bal Sangopan Yojana Maharashtra । मुलांना मिळणार २५५०/- रु. प्रति महिना”

Leave a comment