Maha Yojana Doot Registration 2024 : महा योजना दूत नोंदणी २०२४

Maha Yojana Doot Registration 2024 : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण महा योजना दूत योजना काय आहे? कुणासाठी आहे? त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री महा योजना दूत योजना माहिती | महा योजना दूत नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती येथे तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील तरुण मुला-मुलींसाठी एक सुवर्णसंधि घेवून आले आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक “योजना दूत” हा नेमण्यात येणार आहे. या साठी नवीन नोंदणी ही सुरू करण्यात आली आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

Maha Yojana Doot Registration 2024

Maha Yojana Doot Registration 2024 Information in Marathi :

योजनेचे नावमहा योजना दूत
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देश काय आहे?राज्यातील तरुण मुला-मुलींसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील तरुण मुले व मुली
लाभ१०,०००/ रु. महिना
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Maha Yojana Doot Registration 2024 काय आहे?

  • महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील प्रतेक गावामध्ये एक योजना दूत नेमणार आहे. जे लोक निवडले जातील त्यांना महिन्याला १० हजार रुपयाचे मानधन देण्यात येणार आहे. यामध्ये योजना दूत यांना सर्व सरकारी योजणाची माहिती ही प्रत्येक माणसांपर्यंत पोहचवण्याचे काम हे करायचे आहे.
  • जर तुम्ही इच्छुक असाल तर नवीन योजना दूत नोंदणी करू शकता. नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुमचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. व तुमच्याकडे पदवी असावी. सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

Maha Yojana Doot Registration 2024 पात्रता (Eligibility) :

महायोजना दूत म्हणून काम करायचे असल्यास तुम्हाला खालील पात्रता या पूर्ण कराव्या लागणार आहेत. तरच तुम्ही महायोजना दूत या पोर्टल वरती नोंदणी करू शकता.

  • उमेदवार यांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  • अर्जदार यांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते व ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे.

Maha Yojana Doot Registration 2024 फायदे काय आहेत?

  • महायोजना दूत या पोर्टल वरती नोंदणी करून तुम्ही सिलेक्ट झाल्यास तुम्हाला खालील फायदे मिळणार आहेत.
  • प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये पर्यंत मानधन.
  • समाजासाठी काम करण्याची संधी
  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
  • सरकारी कामकाजाचा अनुभव.
  • नवीन काम शिकून कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार.
  • वरील फायदे हे तुम्हाला महायोजना दूत म्हणून काम केल्यास होणार आहेत.

सरकारच्या इतर योजना :

Maha Yojana Doot Registration 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पदवी प्रमाणपत्र
  • जीमेल खाते
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक

Maha Yojana Doot Registration 2024 । योजना दूत नोंदणी अशी करा :

  • नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सर्वात आधी ऑफिसिअल वेबसाईट वरती यायचे आहे त्याची लिंक तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खालील प्रमाणे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिसणार आहे.
  • ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : येथे क्लिक करा
Maha Yojana Doot Registration 2024
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला नवीन योजना दूत रजिस्ट्रेशन करायचे आहे. नोंदणी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसणार आहे. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक करून तुमचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे.
Maha Yojana Doot Registration 2024
  • Verify ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल. येथे तुम्हाला रोबोट नसल्याची टिक करायचे आहे व व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Get OTP या ऑप्शन वर क्लिक करून ओटीपी मिळवायचा आहे.
Maha Yojana Doot Registration 2024
  • त्यानंतर तुम्हाला खालील चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे ओटीपी टाकण्याचा ऑप्शन हा उपलब्ध झालेला असेल. येथे तुम्ही ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे.
Maha Yojana Doot Registration 2024
  • OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल खालील प्रमाणे भरायचे आहे.
Maha Yojana Doot Registration 2024
  • तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्ण करायची आहे. त्यानंतर लॉगिन करून तुम्हाला अर्ज करायला सुरुवात करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे पदवीचे प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही पीडीएफ स्वरूपात स्कॅन करून ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या गावांमध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ते गाव निवडायचे आहे व तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे.
  • या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयामध्ये भेट देऊ शकता. खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता. 

आमचा ऑफिशियल What’s App Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा

महा योजना दूत योजना काय आहे?

महा योजना दूत हे पद प्रतेक ग्रामपंचायत मध्ये ६ महिन्यासाठी निर्माण करण्यात आले आहे . यामध्ये अर्जदार यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मानधन होऊ देण्यात येणार आहे. योजना सर्व सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची काम करायचे आहे.

योजना दूत किती मानधन दिले जाणार?

योजना दूत म्हणून सिलेक्ट होतील त्यांना प्रत्येक महिन्याला १०  हजार रुपये मानधन हे देण्यात येणार आहे.

महा योजना दूत नोंदणी कुठे करायची?

महायोजना दूत नोंदणी mahayojanadoot.org  या पोर्टल वरती तुम्हाला नोंदणी करायची आहे.

महा दूत योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे?

योजना दूत या पदासाठी शैक्षणिक पात्रता  कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

1 thought on “Maha Yojana Doot Registration 2024 : महा योजना दूत नोंदणी २०२४”

Leave a comment