“आनंदाचा शिधा” रेशन कार्ड धारकांना मिळणार या ४ वस्तू : Anandacha Shida Gudi Padwa 2024

Anandacha Shida Gudi Padwa : राज्य सरकारने दिवाळीसारखेच गुडीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना “आनंदाचा शिधा” देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचा आणि आपल्या मित्रांसोबत ही महत्वपूर्ण माहिती शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल.

Anandacha Shida Gudi Padwa

Anandacha Shida Gudi Padwa :

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब रेशनकार्ड धारक, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागामधील सगळे जिल्हे. व नागपूर विभागामधील वर्धा जिल्ह्यामधील दारिद्रय रेषेवरील (Anandacha Shidha Gudi Padwa) केशरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना सणासुदीच्या काळामध्ये सवलतीच्या दरात खायच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी साल २०२२ मधील दिवाळी, २०२३ मधील गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सव आणि दिवाळीच्या सणांनिमित्त प्रत्येक खाद्यपदार्थ १ किलो या अंदाजाने साखर, रवा, चणाडाळ व खाद्यतेल हे सर्व मिळून १ संच (आनंदाचा शिधा) अशा प्रकारे १००/- रु. प्रत्येकी संच या सवलतीमध्ये देण्यात आलेला आहे.

नुकताच राज्यात श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती पार पडली असून त्यानिमित्ताने “आनंदाचा शिधा” चे वाटप सुरु झाले आहे. त्याच आधारावर दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळातील बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना २०२४ मध्ये गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांनिमित्त खाद्यपदार्थ हे प्रत्येकी १ किलो या मापाने साखर, रवा, चणाडाळ आणि १ लिटर या मापाने सोयाबीन तेल हे एकत्रित पॅकेज म्हणजेच “आनंदाचा शिधा” च्या माध्यमातून १००/- रु. प्रतिसंच अशा सवलतीमध्ये वाटप करण्याचे शासनाने योजले आहे.

Anandacha Shida Gudi Padwa शासनाचा निर्णय :

  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब रेशनकार्ड धारक, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागामधील सगळे जिल्हे व नागपूर विभागामधील वर्धा जिल्ह्यामधील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,६९,२४,६३७ रेशन कार्ड धारकांना येत्या गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सनानिमित्त प्रत्येकी १ किलो या मापाने साखर, चणाडाळ, रवा आणि १ लिटर या मापाने सोयाबीनचे तेल हे समाविष्ट असलेल्या “आनंदाचा शिधा” खरेदी करण्यासाठी Mahatenders ह्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेसाठी मान्यता देण्यात आली आहे.
  • आनंदाचा शिधा याचा लाभ घेण्यासाठी शिधाजिन्नस हा संच खरेदी करावा लागतो, त्यासाठी गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून मिळालेल्या नवीन दराने उपरोक्त शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी त्याच्याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. Anandacha Shida Gudi Padwa
  • त्याचप्रमाणे, मार्च 2024 मध्ये लागू असणारी आचार संहितचा विचार घेऊन त्या कालावधीमध्ये 4 शिधा जिन्नस यांचा समावेश असलेला शिधा जिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रत्येकी १ रेशन कार्ड यानुसार ई-पॉसच्या मार्फत पात्र असलेल्या नागरिकांना १००/- रू. प्रति संच या सवलती मध्ये देण्याचा विचार सामान्य प्रशासन विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार तसेच गठीत छाननी समिती शिफारस आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मान्यता दिली गेलेली आहे.
  • या “आनंदाचा शिधा” शिधा जिन्नस संच खरेदी करण्यासाठी या योजनेच्या प्राप्त झालेल्या सवलतीच्या दरानुसार (३१४/- रू. प्रति संच) खरेदीचा खर्च हा १५३१.४३ कोटी रुपये आणि इतर अंदाजे खर्च ११९.१४ कोटी रुपये. त्यानुसार एकूण खरेदीचा खर्च १५५०.५७ कोटी रुपये एवढा आला असून त्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
  • यासाठी येणारा खर्च हा वर्ष 2024 पंचवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
शासनाच्या इतर योजना

Conclusion for Anandacha Shidha Gudi Padwa :

  1. महाराष्ट्र राज्यात गुढीपाडवा सणानिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” Anandacha Shida Gudi Padwa देण्याचा निर्णय.
  2. या निर्णयाच्या अनुषंगानुसार ही अन्न योजना, छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागामधील सर्व आणि नागपूर विभागामधील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यामधील दारिद्र्य रेषेवरील ज्या शेतकऱ्यांकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना प्रत्येकी एक किलो या मापाने चणाडाळ, रवा, साखर आणि एक लिटर या मापाने सोयाबीनचे तेल या ४ गोष्टींचा समावेश असलेला “आनंदाचा सुद्धा” देण्यात येणार आहे.
  3. या योजनेसाठी अंदाजे १५५० कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च आला असून त्यासाठी मिळाली आहे.

तर मित्रांनो, आज या आर्टिकल मध्ये आम्ही राज्य शासनातर्फे गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केसरी रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना “आनंदाचा शिधा” देण्याचा निर्णय केला आहे. या अन्न योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि या पोस्टमध्ये दिली आहे. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर नक्की तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

3 thoughts on ““आनंदाचा शिधा” रेशन कार्ड धारकांना मिळणार या ४ वस्तू : Anandacha Shida Gudi Padwa 2024”

Leave a comment