बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 | Beti Bachao Beti Padhao Yojana In Marathi | बेटी बचाओ बेटी पढाओ ऑनलाइन अर्ज 2024 | Beti bachao beti padhao online apply | मुलींसाठी सरकारी योजना | एका मुलीसाठी सरकारी योजना | दोन मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र.
Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra 2024 : मुलींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना १२ जानेवारी २०१५ रोजी केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व मुलींसाठी सुरू केली आहे. या लेखामधून आम्ही तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजने बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. जसे की, या योजनेसाठी पात्रता, लाभ, कागदपत्रे, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. तरी तुम्हाला विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
Beti Bachao Beti Padhao Yojana Information in Marathi :
योजनेचे नाव | बेटी बचओ बेटी पढाओ |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | मुलींचे जीवनस्तर उंचावणे |
लाभार्थी | देशातील सर्व मुली |
लाभ | आर्थिक मदत दिली जाणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://wcd.nic.in/ |
Beti Bachao Beti Padhao Yojana काय आहे?
- Beti Bachao Beti Padhao योजनेअंतर्गत मुलीचे बँक खाते कोणत्याही सरकारी बँकेत उघडता येते. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा मुलीचे बँक खाते उघडू शकता. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत तुम्हाला मुलीच्या जन्मापासून मुलगी १४ वर्षाची होईपर्यंत पैसे जमा करावे लागतील आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत, मुलीच्या शिक्षणासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण 50% रक्कम काढू शकता तसेच, उर्वरित सर्व रक्कम मुलीच्या लग्नाच्या वेळी बँकेतून काढू शकता.
Beti Bachao Beti Padhao Yojana पात्रता (Eligibility) :
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- फक्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
Beti Bachao Beti Padhao Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
आपणा सर्वांना माहीतच आहे की स्त्री भ्रूणहत्या प्रमाण खूप वाढत आहे कारण या समाजात मुलींना ओझे समजले जाते. त्यांना पुढे जाणे आणि आपल्या योग्यतेनुसार शिक्षण घेणे समाजाला मान्य नाही, आणि त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत आहे. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली आहे जेणेकरुन मुलींचे भविष्य उज्ज्वल होईल आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेले जाईल, हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
- मुली देखील स्वतंत्रपणे जगू शकतात आणि मुले करू शकतील अशा सर्व गोष्टी करू शकतात.
- या योजनेनुसार स्त्रिभृण हत्या थांबवण्यास मदत होईल.
- मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रगति करण्यास मदत होईल.
Beti Bachao Beti Padhao Yojana लाभ :
खाली आम्ही माहिती दिलेली आहे की, किती पैसे जमा केले म्हणजे किती रक्कम मिळेल.
1000 रुपये प्रत्येक महिना जमा केल्यानंतर :
- तुम्ही जर बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत मुलीच्या बँक खात्यात प्रती महिना 1000 रुपये आणि वर्षाला 12000 रुपये जमा केले तर मुलगी 14 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर एकूण 1,68,000 रक्कम जमा होईल आणि मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीच्या बँक अकाऊंट मधून 6,07,128 रुपये काढू शकता. परंतु तुम्हाला या रकमेचा उपयोग मुलीच्या फायद्यासाठीच करावा लागेल.
1.5 लाख रुपये प्रत्येक वर्ष जमा केल्यानंतर :
तुम्ही जर Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 अंतर्गत प्रती वर्षाला 1.5 लाख रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा करत असाल तर मुलगी 14 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर एकूण 21,00,000 लाख रुपये रक्कम बँक खात्यात जमा होईल आणि मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीच्या बँक खात्यातून 72,00,000 रुपये काढू शकता.
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वर्षाची होई पर्यंत तुम्ही मुलीचे बँक खाते उघडू शकता.
- शिक्षण आणि मुलींची सुरक्षा सुधारण्यासाठी या योजनेचा शुभारंभ केल्या गेला.
- भ्रूण हत्या थांबवण्यासाठी Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra सुरू केल्या गेली.
- मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी मिळालेल्या रकमेचा उपयोग होईल. त्यामुळे पालकांना मुलींची जास्त काळजी राहणार नाही.
- मुले आणि मुलींमधील भेदभाव कमी होईल.
सरकारच्या इतर योजना :
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana 2024
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 : Soil Health Card Scheme in Marathi
- MSRTC मोफत प्रवास योजना 2024 संपूर्ण माहिती : MSRTC Free Travel Scheme
Beti Bachao Beti Padhao Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड.
- मुलीचे जन्मप्रमाणपत्र.
- रहिवासी दाखला.
- मोबाइल क्रमांक.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आई वडलांचे ओळखपत्र.
- मुलीचे बँक खाते.
Beti Bachao Beti Padhao Yojana Online Registration :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
- मुख्य पृष्ठावर तुम्हाला “Women Empowerment Scheme” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल.
- त्यानतंर, तुम्हाला beti bachao beti padhao yojana या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमच्या समोर beti bachao beti padhao yojana बद्दल काही सूचना दिल्या जातील.
- सर्व सूचनांचे पालन करा आणि संगीलत्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
Beti Bachao Beti Padhao Yojana Offline Registration :
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जायचे आहे.
- तुम्हाला आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे दाखवावे लागतील.
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि त्या अर्जाला सर्व कागदपत्रे जोडावे लागतील.
- आणि तो अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल.
- अश्या पद्धतीने तुमची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
2 thoughts on “बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 : Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra”