MSRTC Free Travel Scheme 2024 : महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे 75 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC अंतर्गत मोफत प्रवास योजना सुरु करण्यात आलेली आहे. 25 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मोफत प्रवास योजने अंतर्गत कार्यक्रमाचे उदघाटन केले. या पोस्ट मध्ये तुम्हाला मोफत प्रवास योजने विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. उदा, योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया, योजनेसाठी पात्रता इ. विषयी माहिती देणार आहोत.
MSRTC Free Travel Scheme 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | महाराष्ट्र मोफत प्रवास योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास पास उपलब्ध करून देणे हा आहे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक |
लाभ | मोफत प्रवास पास |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
MSRTC Free Travel Scheme 2024 काय आहे?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “महाराष्ट्र मोफत प्रवास योजना” या योजनेची ट्विटर द्वारे घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्यातील 1.5 लाख असे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय कमीत कमी 75 वर्षे आहे त्यांना प्रवास करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. स्वतंत्र दिनाच्या नंतर, 26 ऑगस्ट 2022 पर्यंत MSRTC बसमधून प्रवास करणाऱ्या 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत.
MSRTC च्या बसेस स्वच्छ तसेच सुसज्ज आहेत. या बसेस महाराष्ट्र राज्यातील सर्वात स्वच्छ बसेस म्हणून ओळखल्या जातात. तसेच मुंबई ते पुणे या मार्गावरती 200 नवीन इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. MSRTC कडे 16,000 पेक्षा जास्त बसेस आहेत. तसेच मार्च 2020 या वर्षात या बसेस मार्फत 65 लाख लोकांची वाहतूक केली जात होती.
MSRTC Free Travel Scheme 2024 पात्रता (Eligibility) :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा ही 65 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या योजने अंतर्गत फक्त MSRTC बसनेच प्रवास करता येईल.
- MSRTC बसने महाराष्ट्र राज्यामध्येच प्रवास करता येईल.
MSRTC Free Travel Scheme 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- महाराष्ट्र मोफत प्रवास योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश राज्यातील वृद्ध व्यक्तींना एसटी ने मोफत प्रवास करता यावा हा आहे.
- आज कालच्या महागाईमुळे आणि साथींच्या रोगामुळे वृद्ध लोकांना पैसे कमवण्यासाठी अडचणी येतात, त्यांना राज्य सरकारने मोफत प्रवास करण्यासाठी ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
MSRTC Free Travel Scheme 2024 फायदे काय आहेत?
- महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे व त्यांच्या पैशाची बचत सुद्धा होणार आहे.
- MSRTC बस मध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.
- तसेच 65 ते 75 वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या नागरिकांसाठी MSRTC मार्फत विशिष्ट मार्गांसाठी व सेवांसाठी त्यांच्या बस तिकिटाच्या किमतीवर 50% सूट देण्यात येईल.
सरकारच्या इतर योजना :
- किसान विकास पत्र योजना : Kisan Vikas Patra Yojana 2024
- पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांची संपूर्ण माहिती : Post Office Saving Scheme 2024
- किशोरी शक्ती योजना : Kishori Shakti Yojana 2024
- खरीप पीक विमा योजना : Kharip Pik Vima Yojana 2024
- Mahabhulekh Online Satbara Maharashtra : भूमी अभिलेख ऑनलाईन 7/12
MSRTC Free Travel Scheme 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र. ओळखपत्रावरती जन्म तारखेचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
आमचा ऑफिशियल What’s App Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
MSRTC Free Travel Scheme 2024 साठी अर्ज कसा करायचा?
- महाराष्ट्र मोफत प्रवास योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही. ज्या नागरिकांचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी फक्त त्यांना आपले ओळखपत्र एस. टी. कंडक्टर ला दाखवायचे आहे.
मित्रांनो, महाराष्ट्र मोफत प्रवास योजने विषयी ही माहिती कशी वाटली ते कंमेंट मध्ये सांगा. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्वपूर्ण माहिती मिळेल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तुम्हाला जर, या योजने संबंधित काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही इथे कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा आम्हाला थेट ई-मेल द्वारे कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करू.
2 thoughts on “MSRTC मोफत प्रवास योजना 2024 संपूर्ण माहिती : MSRTC Free Travel Scheme”