किसान विकास पत्र योजना : Kisan Vikas Patra Yojana 2024

Kisan Vikas Patra Yojana 2024 : केंद्र सरकारने देशातील शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावे यासाठी किसान पत्र विकास योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना इंडिया पोस्ट ऑफिस मार्फत राबवली जात आहे. किसान विकास पत्र योजने विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Kisan Vikas Patra Yojana 2024

Kisan Vikas Patra Yojana Information in Marathi :

योजनेचे नावकिसान विकास पत्र योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?केंद्र सरकार
योजनेचा उद्देश काय आहे?देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने मजबूत करणे.
लाभार्थीदेशातील नागरिक
लाभगुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Kisan Vikas Patra Yojana अंतर्गत ठराविक काळानंतर मिळणार मोठी रक्कम :

  • किसान विकास पत्र योजना ही भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. या योजने मध्ये एक वेळेस गुंतवणूक करावी लागते, आणि एका निश्चित कालावधीमध्ये आपले पैसे दुप्पट होतात. ही योजना देशातील सर्व टपाल कार्यालयामध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये तसेच मोठ्या बँकांमध्ये उपस्थित आहे. तिथून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा कालावधी कमीतकमी 124 महिने आहे. आणि या योजनेमध्ये गुंतवणूक ही कमीत कमी 1000 रुपये करता येते.

Kisan Vikas Patra Yojana अंतर्गत कोण गुंतवणूक करू शकतो?

  • किसान विकास पत्र योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या व्यक्तीचे वय हे कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ही योजना अल्पवयीन मुलांसाठी सुद्धा उपलब्ध आहे, ते खाते त्यांचे पालक पाहू शकतात. एका सिंगल खात्या व्यतिरिक्त, जॉईंट खात्याची सुविधा पण उपलब्ध देण्यात आलेली आहे. किसान विकास पत्र योजने अंतर्गत गुंतवणुकीसाठी १०००, ५०००, १०,००० आणि ५०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणपत्र आहेत, ती खरेदी करता येतात.

Kisan Vikas Patra Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शेतकऱ्यांना गुंतवणुकीची संधी देऊन त्यांन आर्थिक दृष्टीने मजबूत करणे.

सरकारच्या इतर योजना :

Kisan Vikas Patra Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

किसान विकास पत्र योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली कागदपत्रे लागतील :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • जन्माचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा (वीज बिल/ रेशनकार्ड)
  • किसान विकास पत्र अर्ज

Kisan Vikas Patra Yojana Interest Rate :

  • किसान विकास पत्र योजनेचा व्याज दर हा २०२१ मध्ये ६.९ टक्के एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये तुमची गुंतवणूक १२४ महिन्यामध्ये दुप्पट होणार आहे. समजा, तुम्ही १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर, तुम्हाला १२४ महिन्या नंतर २ लाख रुपये मिळतील.
  • ही योजना आयकर कायदा 80 सी अंतर्गत येत नाही. त्यामुळे परत आलेल्या परताव्यावरती कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यासोबतच या योजने अंतर्गत TDS कपात केली जात नाही.
  • किसान विकास पत्र योजना ही एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा हस्तांतरित/ट्रान्सफर केली जाऊ शकते Kisan Vikas Patr Yojana Transer. किसान विकास पत्र पासबुकच्या स्वरूपामध्ये जरी केला जाऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्हाला या योजने विषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसला भेट देऊन घेऊ शकता. किंवा काही शंका असल्यास तुम्ही इथे कंमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता.

2 thoughts on “किसान विकास पत्र योजना : Kisan Vikas Patra Yojana 2024”

Leave a comment