Kishori Shakti Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे वेळोवेळी राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या पोस्ट मध्ये आम्ही किशोरी शक्ती योजना विषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला या योजने विषयी कोणतीच शंका राहणार नाही.
![Kishori Shakti Yojana 2024](https://mahakrushiyojana.com/wp-content/uploads/2024/07/Kishori-Shakti-Yojana-2024-1024x576.webp)
Kishori Shakti Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | किशोरी शक्ती योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकार |
विभाग | महिला व बाल विकास |
योजनेचा उद्देश काय आहे? | किशोर वयीन मुलींना शारीरिक व मानसिक दृष्टीने मोफत प्रशिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे |
लाभार्थी | राज्यातील ११ ते १८ वयोगटामधील मुली |
लाभ | मुलींना मोफत प्रशिक्षण |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Kishori Shakti Yojana 2024 काय आहे?
- महाराष्ट्र राज्य सरकारने किशोर वयीन मुलींना मानसिक, शारीरिक तसेच भावनिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केलेली आहे. कारण स्त्रीचा मानसिक, शारीरिक व भावनिक विकास हा किशोर वयामध्येच होत असतो.
- किशोर शक्ती योजने अंतर्गत ११ ते १८ वर्षे वय असलेल्या किशोर वयीन मुलींना त्याचा शारीरिक व मानसिक दृष्टीने विकास होण्यासाठी तसेच त्यांना बळकट बनवण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.
Kishori Shakti Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- किशोर शक्ती योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यामधील ११ ते १८ वर्षे वय असणाऱ्या किशोर वयीन मुलींना शाळा तसेच महाविद्यालय मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना आरोग्य, चांगले अन्न खाणे, घराचे व्यवस्थापन कसे करायचे तसेच महत्वाचे म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये वैयक्तिक स्वचतेची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती देऊन त्यांना जागरूक करणे हा आहे.
- त्यासोबतच मुलींना औपचारिक व अनौपचारिक रित्या शिक्षण पुरवले जाणार आहे. तसेच मुलींना नोकरी आणि व्यवसाय यासाठीचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
- Maharashtra Kishori Shakti Yojana 2024 च्या माध्यमातून मुलींचा शारीरिक, मानसिक विकास होणार आहे, त्यामुळे मुलींना त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना सहजतेने सामोरे जाता येईल.
- या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींची निर्णय क्षमता सुद्धा वाढणार आहे. यामुळे त्यांना कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापासून आळा बसेल.
Kishori Shakti Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्जदार मुलगी ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी ११ ते १८ वर्षे वय असणाऱ्या किशोर वयीन मुली अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
- तसेच दारिद्र्य रेषेखालील BPL कार्ड असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
किशोरी शक्ती योजना 2024 अंतर्गत महत्वाची माहिती :
- Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 ही योजना महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्राद्वारे राबवण्यात येत आहे.
- या योजनेसाठी पात्र असेलेल्या किशोर वयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी 3 महिन्यातून एकदा अंगणवाडी केंद्रामध्ये केली जाईल. मुलींची आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल. तसेच त्यांची उंची, वजन या गोष्टींची नोंद या कार्डमध्ये केली जाणार आहे.
- किशोरी शक्ती योजनेसाठी राज्य सरकार कडून प्रत्येक वर्षी 3.8 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा निधी आरोग्य शिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण, माहिती शिक्षण, आरोग्य कार्ड, संदर्भ तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक दिवशी 5 रु. या दराने पोषण आहार यासारख्या सुविधांसाठी खर्च करण्यात येईल.
किशोरी शक्ती योजना 2024 वैशिष्ट्ये :
- या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील ११ ते १८ वर्षे वयोगटातील शाळा किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना आरोग्य, स्वछता, शैक्षणिक आणि रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक किशोर वयीन मुलीसाठी राज्य सरकार दरवर्षी १ लाख रुपये खर्च करणार आहे.
- मुलींचा शारीरिक विकास होण्यासाठी त्यांना पोषक आहार देखील दिला जाणार आहे.
- मुलीला प्रौढावस्थेमध्ये घराचे व्यवस्थापन कसे करायचे, चांगल्या प्रतीचा स्वयंपाक बनवायचा, खानाच्या सवयी, वयक्तिक स्वच्छता व मासिक पाळीच्या काळामध्ये कोणती आणि कशी काळजी घ्यायची याबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- १६ ते १८ वर्षांमधील शिक्षण सोडलेल्या मुलींना नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
Kishori Shakti Yojana 2024 फायदे काय आहेत?
- किशोरी शक्ती योजने अंतर्गत किशोर वयीन मुलींना मानसिक व शारीरिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- तसेच या योजनेचा लाभ घेऊन मुलींची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल.
- मुलींचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने विकास होईल.
सरकारच्या इतर योजना :
- छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद योजना : Chhatrapati Sambhaji Nagar ZP Yojana 2024
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 : Falbag Lagwad Yojana 2024
- Mahabhulekh Online Satbara Maharashtra : भूमी अभिलेख ऑनलाईन 7/12
Kishori Shakti Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जन्माचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- BPL रेशन कार्ड
Kishori Shakti Yojana 2024 साठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा?
किशोर शक्ती योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही. कारण, या योजनेसाठी पात्र असलेल्या मुलींचे अर्ज फक्त अंगणवाडी मधील सेविका करतील. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी किशोरी शक्ती योजना अंतर्गत पात्र असलेल्या किशोर वयीन मुलींची निवड करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
- त्यानंतर सर्वेक्षणामध्ये निवड झालेल्या मुलींची यादी ही महिला व बालविकास विभागाकडे देण्यात येणार आहे.
- नंतर विभागाद्वारे निवड झालेल्या किशोर वयीन मुलींनीही तपासणी करण्यात येईल. विभागाद्वारे मुलगी पात्र झाल्यास त्या मुलीची या योजने अंतर्गत नोंदणी केली जाईल.
- नोंदणी केल्यानंतर किशोर वयीन मुलींना किशोरी कार्ड देण्यात येईल. या कार्डचा वापर करून तिला या योजने अंतर्गत सर्व लाभ घेता येईल.
सारांश :
- मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला जर पोस्ट मधील माहिती आवडली असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका. तसेच, या योजने संबंधित काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा किंवा आम्हाला ई-मेल द्वारे कळवा. आम्ही तुमच्या शंका लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करू. पोस्ट शेवट पर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
1 thought on “किशोरी शक्ती योजना : Kishori Shakti Yojana 2024”