Falbag Lagwad Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना घेऊन येत असते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य सरकारने २०१८-१९ मध्ये सुरु केली आहे. ही योजना सरकारच्या कृषी विभाग अंतर्गत राबवण्यात येत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आम्ही देणार आहोत, तरी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा. जेणेकरून तुम्हाला या योजने विषयी कोणतीही शंका येणार नाही.
Falbag Lagwad Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदान देणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | योजने अंतर्गत एकूण १०० टक्के अनुदान मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
फळझाड लागवड करण्याची मुदत | ३१ मे ते ३०नोव्हेंबर |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 काय आहे?
- महाराष्ट्र राज्य सरकारने Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते. किती आणि कसे अनुदान मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान :
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पाहिल्या वर्षी ५०% अनुदान तर दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अशा पद्धतीने देण्यात येणार आहे.
- परंतु लाभार्थी शेतकऱ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी ८०% आणि बागायती झाडांसाठी ९०% असणे गरजेचे आहे.
- जर हे सरकारद्वारे निश्चित केलेले प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने झाडे आणून पुन्हा एकदा जिवंत झाडांचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक आहे.
- वर दिलेल्या नियमांचे पालक केल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाची रक्कम मिळेल.
Falbag Lagwad Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी शेतकऱ्यांना फळबागेची लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन बसवणे बंधनकारक राहील.
- ज्या अर्जदार शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल. आणि नंतर इतर शेतकऱ्यांना विचारात घेतले जाईल.
- या योजने अंतर्गत लाभ हा वयक्तिक शेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. व इतर संस्थांच्या मार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाचा ७/१२ असणे गरजेचे आहे.
- शेतीमध्ये हिस्सेदार असेल तर हिस्सेदारांच्या संमतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या शिष्याच्या शेतजमिनीमध्ये या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार शेतकऱ्याने जर सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर योजने अंतर्गत फळबाग लागवड केली असेल, तर अशा वेळेस ज्या क्षेत्रात फळबाग लागवड केली आहे ते क्षेत्र सोडून वरील नियमांनुसार इतर क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला लाभ दिला जाईल.
अनुदान मिळण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या :
- Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ५०%, ३०% आणि २०% या प्रमाणे तीन वर्षांमध्ये अनुदान दिले जाईल. उदा. तुम्ही पेरू या फळासाठी कलमे १०×१० मीटर वर लागवड केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे अनुदान मिळणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलेली फळझाडे ही पहिल्या वर्षी किमान ८०% आणि दुसऱ्या वर्षात किमान ९०% जगवणे आवश्यक राहील.
- तसेच लाभार्थी शेतकऱ्याने ७/१२ वरती फळबाग लागवड केल्याची नोंद करून घेणे आवश्यक राहील.
- या योजने अंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
Falbag Lagwad Yojana 2024 अंतर्गत पुढील पिकांचे उत्पादन घेऊ शकता :
या योजने अंतर्गत सरकारने विविध फळ पिकांचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रामधील कृषी विद्यापीठाने दिलेल्या पिकांची यादी आम्ही खाली दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता.
- पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे :
- मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे :
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला :
Falbag Lagwad Yojana 2024 फायदे काय आहेत?
- या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात फळबाग लागवडीसाठी ५०% अनुदान दिले जाणार आहे.
- तसेच ठिबक सिंचन बसवण्यासाठी सरकार १००% अनुदान देखील देणार आहे.
सरकारच्या इतर योजना :
- Mahabhulekh Online Satbara Maharashtra : भूमी अभिलेख ऑनलाईन 7/12
- खरीप पीक विमा योजना : Kharip Pik Vima Yojana 2024
Falbag Lagwad Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- ७/१२ आणि ८ अ उतारा
- जातीचा दाखला
- हमीपत्र
- शेतीमध्ये हिस्सेदार असल्यास सर्व हिस्सेदारांचे संमतीपत्र
Falbag Lagwad Yojana 2024 साठी अर्ज कसा करायचा?
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
- सर्व प्रथम अर्जदार व्यक्तीला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईटच्या अधिकृत पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला होम पेज वर ऑनलाईन एप्लिकेशन हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानतंर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज दिसेल.
- या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे त्यानतंर Submit बटनावरती क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुम्ही Falbag Lagwad Yojana या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
1 thought on “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 : Falbag Lagwad Yojana 2024”