Maintenance Allowance Scheme in Maharashtra 2024 : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता मिळणार आहे. ही योजना नक्की काय आहे, योजनेचे फायदे काय आहेत, योजनेचा उद्देश काय आहे आणि या योजने संबंधित इतर गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तरी तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजने संबंधित कोणतीही शंका येणार नाही.
ही योजना सुरु करण्यामागील मुख्य उद्देश हा अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे तसेच, विद्यार्थ्यांना या योजनेच्या मदतीने त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल व विद्यार्थी स्वतःचा विकास करू शकतील.
Maintenance Allowance Scheme in Maharashtra Information in Marathi :
योजनेचे नाव | व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे. |
लाभार्थी | व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी |
लाभ | विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता देण्यात येणार आहे. |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Maintenance Allowance Scheme in Maharashtra योजना नक्की काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना घेऊन येत असते. राज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व व्यावसायिक महाविद्यालयामध्ये असलेल्या वसतिगृहामध्ये राहत असलेल्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून देखभाल भत्ता देण्यात येत आहे.
Maintenance Allowance Scheme in Maharashtra या योजनेचा उद्देश :
- या योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे.
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्सहन देणे.
- गरीब घरातील कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये आणि कोणाकडून पैसे उधार किंवा व्याजाने घेण्याची गरज भासू नये.
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करणे.
- आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज भासू नये.
Maintenance Allowance Scheme in Maharashtra पात्रता (Eligibility) :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असला पाहिजे.
योजने संबंधित काही महत्वाच्या अटी व शर्ती :
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच लागू होईल.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थी हा अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी व वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्यांचे स्वतःच्या नावाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे इतर कोणाचेही बँक खाते मान्य केले जाणार नाही.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने राज्य किंवा केंद्रा सरकारद्वारे इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला नसावा.
- अर्जदार विद्यार्थ्याने अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- या योजनेसाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या Maha DBT पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
Maintenance Allowance Scheme in Maharashtra योजनेचे फायदे :
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्याला देखभाल भत्ता, स्टेशनरी, व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, निवास व अन्न याचा निधी मिळतो.
- विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर आणि सशक्त होतील.
- तसेच महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- विद्यार्थी आर्थिक अडचणीतून बाहेर येतील आणि त्यांचा आर्थिक विकास होईल.
- विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी त्यांना एक चांगली नोकरी शोधता येईल किंवा त्यांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करता येईल आणि त्यांना कुटुंबाला सांभाळता येईल.
- शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी प्रोत्साहित होतील आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांना आवड निर्माण होईल.
- गरीब घरातील कुटुंबांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आणि इतर कोणाकडून पैसे उधार किंवा व्याजाने पैसे घेण्याची गरज भासू नये.
सरकारच्या इतर योजना :
- मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024
- ‘लाडली बहना’ योजना, महिलांना मिळणार १२०००/- रुपये वर्षाला: Ladli Behna Yojana in Maharashtra 2024
- मागेल त्याला विहीर योजना : Magel Tyala Vihir Yojana 2024
Maintenance Allowance Scheme in Maharashtra योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचा दाखला
- महाविद्यालयाचे प्रवेश पत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवाशी दाखला
- वॉर्डन पत्र (विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नसल्यास)
- भारत सरकार पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेतील नोंदणी/ अर्ज आयडी
Maintenance Allowance Scheme in Maharashtra योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :
अर्जाचा पहिला टप्पा :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमची नवीन रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली.
अर्जाचा दुसरा टप्पा :
- अर्जदार विद्यार्थ्याला Username आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे.
अर्जाचा तिसरा टप्पा :
- त्यानंतर आता अर्जदार विद्यार्थ्याला होम पेज वर मॅट्रिक शिष्यवृत्ती या वरती क्लिक करायचे आहे. व त्यानंतर Social Justice and Special Assistance Department या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता या वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला या शिष्यवृत्तीची जी काही माहिती असेल ती उघडेल, ती माहिती वाचून झाल्यानंतर खाली Apply For this Scheme या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- या प्रकारे तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
1 thought on “व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता : Maintenance Allowance Scheme in Maharashtra 2024”