मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024

Free Tablet Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्य सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासाठी वेळोवेळी विविध योजना घेऊन येत आहे. आज आपण महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या फ्री टॅबलेट योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील इयत्ता 10 वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येत आहे आणि त्यासोबतच 6 GB इंटरनेट प्रति दिवस ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2024

Free Tablet Yojana Maharashtra 2024 Information in Marathi :

योजनेचे नावमहाज्योती फ्री टॅबलेट योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाची पूर्व तयारी करण्यासाठी सरकारने टॅबलेट देण्याचे ठरवले आहे.
लाभार्थीइयत्ता ११ वी मध्ये सायन्स या क्षेत्रात प्रवेश घेतलेले विद्यार्थी
लाभमोफत टॅबलेट आणि 6 GB इंटरनेट प्रति दिवस
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
विभागशिक्षण विभाग
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Free Tablet Yojana Maharashtra 2024 काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोक हे दारिद्र्य रेषेखालील यांचे जीवन जगत आहेत. असे कुटुंबे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो व त्यांना कुटुंबाच्या काही गरजा पूर्ण नाही करता येत नाहीत. अशा परिस्थितीत ते आपल्या मुलांना कसेबसे 10 वी पर्यंत शिकवतात.
  • कारण 10 वी नंतरचे शिक्षण जसे की इंजीनियरिंग, मेडिकल, MHTCET/NEET हे खूप खर्चिक असते. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसची सुद्धा गरज भासते आणि अशा शिक्षणासाठी खूप पैशांची गरज असते. त्यामुळे शिक्षण घ्यायचे इच्छा असून देखील राज्यातील बरेच विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
  • राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सर्व अडचणींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने मोफत टॅबलेट योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 पात्रता (Eligibility) :

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी १० वी उत्तीर्ण असावा तसेच १० वी नंतर त्याने ११ वी मध्ये सायन्स या फिल्ड मध्ये प्रवेश घेतला असणे आवश्यक आहे.

मोफत टॅबलेट योजनेच्या काही अटी व शर्ती :

  • फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच घेऊ शकतील.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १० वी मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १० वी मध्ये ७० टक्क्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबातील असावा.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील जर सरकारी नोकरदार असतील तर त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • समजा विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण मधूनच सोडले तर त्या विद्यार्थ्यांकडून टॅबलेट परत घेतला जाईल.
  • विद्यार्थ्याला जो टॅबलेट मिळणार आहे त्याची १ वर्षाची वॉरंटी देण्यात येईल. पण १ वर्षानंतर टॅबलेट मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यास त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असणार आहे.
  • तसेच लाभार्थी विद्यार्थ्याला टॅबलेट सोबतच 6 GB प्रति दिवस इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?

  • फ्री टॅबलेट योजना ही महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबातील इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जसे की, इंजिनीरिंग व मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लासचा लाभ घेता यावा यासाठी फ्री टॅबलेट उपलब्ध करून देण्याच्या हेतून फ्री टॅबलेट योजना सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य उज्ज्वल होईल.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्सहीत करणे व पाठिंबा देणे.
  • गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावे हा या योजने मागील उद्देश आहे.
  • तसेच विद्यार्थ्यांना NEET/ MHCET/ IEL/ JEE अशा विविध परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी मदत करणे.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 फायदे काय आहेत?

  • या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येत आहे.
  • या योजने अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट मध्ये शिक्षण उपयोगी पुस्तके अपलोड करून दिली जात आहेत.
  • या टॅबलेटचा उपयोग करून विद्यार्थी ऑनलाईन पुस्तके तसेच शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून ते स्वतःचा शैक्षणिक विकास करू शकणार आहेत.
  • या योजने अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना CET, JEE व NEET या परीक्षांसाठी ऑनलाईन कोचिंगची मोफत सुविधा देण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टीने विकास होण्यास मदत होईल.
  • तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल क्षेत्राची माहिती मिळेल.

सरकारच्या इतर योजना :

Free Tablet Yojana Maharashtra 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याची माहिती
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी पुरावा (वीजबिल, घरपट्टी, भाड्याची पावती)
  • १० वी पास मार्कशीट
  • ११ वी सायन्स मध्ये प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट

Free Tablet Yojana Maharashtra 2024 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर Upcoming Event खाली MH-CET/ JEE/ NEET नोंदणीच्या खाली Read More या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल, त्यावर Click Here for Registration यावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आता तुमच्यासमोर नवीन अर्ज दिसेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि काही कागदपत्र अपलोड करायची आहेत. उदा. (Photo, Signature, Cast Certificate, Leaving Certificate आणि Bonafide Certificate)
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर Upload या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • अपलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमहाला एक नवीन अर्ज दिसेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती भरून झाल्यानतंर Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • या प्रकारे तुम्ही फ्री टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज केल्यानंतर पात्र विद्यार्थ्याला थोड्या दिवसामध्ये महाज्योती संस्थे मार्फत मोबाईलवर आणि ई-मेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल.

1 thought on “मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : Free Tablet Yojana Maharashtra 2024”

Leave a comment