Diesel Pump Subsidy Yojana 2024 : तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या डिझेल पंप सबसिडी योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि शेती या क्षेत्राला चालना मिळावी या हेतूने ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना शेत पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाची गरज भासते. तर डिझेल पंप सबसिडी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदीसाठी 50 % अनुदान देण्यात येत आहे.
Diesel Pump Subsidy Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | डिझेल पंप सबसिडी योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे |
लाभार्थी | आर्थिक दृष्टीने गरीब कुटुंबातील शेतकरी |
लाभ | डिझेल पंप बसवण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Diesel Pump Subsidy Yojana 2024 काय आहे?
राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्टीने गरीब असल्यामुळे शेती करण्यासाठी ते व्याजाने कर्ज घेतात व ऊन, वारा, पाऊस याची परवा न करता शेती करतात. पण त्यांना शेती पिकासाठी पाणी उपलब्ध न झाल्यामुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच शेतकऱ्यांना शेती करते वेळी अशा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता व कुटुंबाला सांभाळण्याची चिंता सतावत असते, कारण शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.
या सर्व समस्यांच्या विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाच्या खरेदीवर पन्नास टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात डिझेल पंप बसवून त्याच्या मदतीने शेतातील पिकांना पाणी देऊ शकतील. यामुळे पाण्याअभावी त्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
Diesel Pump Subsidy Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
डिझेल पंप अनुदान योजनेच्या अटी व शर्ती :
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अगोदरच वीज जोडणी केली गेली आहे व ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत, तरीसुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- एका शेतकऱ्याला फक्त एकदाच व एकाच डिझेल पंपाच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात येईल.
- या योजनेची अंमलबजावणी करताना अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर, नदी, कालवा, बोरवेल, शेततळे याप्रकारे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे याची राज्य सरकारकडून खात्री केली जाईल, व त्यानंतरच लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
- जर अर्जदार शेतकऱ्याने केंद्र किंवा राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत डिझेल पंपाचा लाभ घेतला असल्यास, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत डिझेल पंप खरेदीसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते व राहिलेले 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरणे आवश्यक असते.
- तर अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसेल, तर अशा शेतकऱ्यांना डिझेल अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Diesel Pump Subsidy Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचे मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे सिंचन करता यावे व त्यासाठी डिझेल पंप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे हा आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान टाळणे
- डिझेल पंपाची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना तो खरेदी करणे काही वेळेस शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी जे पैसे लागणार आहेत त्यासाठी कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- विद्युत पंपासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते, त्यामुळे यापासून मुक्तता मिळवणे व वीज बिलापासून मुक्तता मिळवणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप व विद्युत पंपापासून मुक्तता देणे.
सरकारच्या इतर योजना :
- मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना 2024 : Masemari Sadhan Kharedi Anudan Yojana
- वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना : Vanya Prani Halla Arthsahay Yojana 2024
- आवडेल तेथे प्रवास योजना 2024 : Aavdel tithe kothehi pravas Yojana
Diesel Pump Subsidy Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रहिवासी दाखला
- बँक खात्याची माहिती
- जमिनीचा 7/12 आणि 8अ उतारा
- जमिनीत सह हिस्सेदार असल्यास (हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र)
- शपथ पत्र
Diesel Pump Subsidy Yojana 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- डिझेल पंप अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम शासनाचा अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर आधार कार्ड किंवा Username च्या सहाय्याने लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर आता एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ‘कृषी यांत्रिकीकरण’ मध्ये बाबी निवडा या बटणावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एक योजनेचा अर्ज दिसेल, कर्जामध्ये विचारले गेलेले सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत व त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला (Net Banking/ Debit Card/ Wallet/ UPI) च्या माध्यमातून 23/- रुपये भरायचे आहेत.
- या प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Diesel Pump Subsidy Yojana 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयामध्ये कृषी विभागात जायचे आहे.
- कृषी विभागामध्ये गेल्यानंतर तिथून डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- अशा प्रकारे तुम्ही डिझेल पंप अनुदान योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
2 thoughts on “डिझेल पंप सबसिडी योजना महाराष्ट्र : Diesel Pump Subsidy Yojana 2024”