Garodar Mata Yojana Marathi 2024 : तर मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीमध्ये असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यासाठी व त्यांना पोषक असा आहार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Garodar Mata Yojana Marathi 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | महिला गर्भवती असताना त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील गरोदर महिला |
लाभ | महिलांना आर्थिक मदत मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
शासनाचा निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Garodar Mata Yojana Marathi 2024 काय आहे?
- या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून गर्भवती महिलेला नोंदणी केल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये एकूण 6,000/- रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच प्रथम प्रसूतीच्या वेळेस 3,000/- रुपये आणि बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर 3,000/- रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
Garodar Mata Yojana Marathi 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील मूळची रहिवाशी असली पाहिजे.
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी काही अटी व शर्ती :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही गर्भवती असणे आवश्यक आहे.
- इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजने अंतर्गत रक्कम मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. कारण कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या बँक खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार नाही.
- तसेच सर्व शासकीय आणि सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी (राज्य/ केंद्र) यांना सह वेतन मातृत्व राजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Garodar Mata Yojana Marathi 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा उद्देश गरोदर महिलांचा आर्थिक विकास व्हावा ही आहे.
- तसेच गरोदर महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर कालावधीमध्ये बुडीत मजुरीची नुकसान भरपाई म्हणून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. या उद्देशाने इंदिरा गांधी सहयोग योजना महाराष्ट्र सुरु करण्यात आलेली आहे.
- तसेच गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर कालावधीमध्ये कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये व कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.
इंदिरा गांधी मातृत्व योजने अंतर्गत दिले जाणारे आर्थिक साहाय्य :
- या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये २,०००/- रु. इतकी रक्कम गरोदरपणामध्ये नोंदणी करण्याच्या अटीवर, गरोदरपणाचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये (पोस्ट बँक खाते असणे आवश्यक आहे) जमा करण्यात येतील.
- तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये २,०००/- रु. रक्कम मुलाच्या/ मुलीच्या जन्माच्या ३ महिन्यानंतर, बाळाचे लसीकरण झाल्याच्या अटी वरती व नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर, बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
- आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये १,०००/- रु. इतकी रक्कम बाळाच्या जन्माच्या ६ महिन्या नंतर नियमितपणे स्तनपान व लसीकरण करण्याच्या अटीवरती, बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील.
Garodar Mata Yojana Marathi 2024 फायदे काय आहेत?
- या योजने अंतर्गत आर्थिक लाभ मिळाल्याने महिलांना गर्भावस्तेत काम करण्याची गरज भासणार नाही.
- राज्यातील गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य सुधारेल व जीवनमान देखील सुधारेल.
- राज्यातील महिलांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- महिलांना गर्भावस्तेत पोषक असा आहार घेणे शक्य होणार आहे.
- तसेच गर्भवती महिलांना गर्भावस्तेत सकस आहार घेण्यासाठी आवश्यक पैशासाठी इतर कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणाकडून पैसे घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
सरकारच्या इतर योजना :
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : Chhatrapati Shivaji Maharaj Karj Mukti Yojana 2024
- आवडेल तेथे प्रवास योजना 2024 : Aavdel tithe kothehi pravas Yojana
- दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना : Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024
- मोफत कडबा कुट्टी मशीन योजना : Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra 2024
Garodar Mata Yojana Marathi 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक खात्याची माहिती
- रेशन कार्ड
- प्रतिज्ञा पत्र
Garodar Mata Yojana Marathi 2024 साठी अर्ज कसा करायचा?
पद्धत १ :
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा.
- अर्जदार महिला गर्भावस्तेत ज्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करणार असेल तिथल्या आरोग्य सेविकेमार्फत गर्भवती महिलांचा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी अर्ज भरला जाईल.
- तसेच गर्भवती महिलांकडे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
पद्धत २ :
- गर्भवती महिलेला आपल्या जवळच्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानतंर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे व सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
- त्यानंतर हा अर्ज महिला व बाळ विकास विभागामध्ये जमा करायचा आहे.
- या प्रकारे तुम्ही इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
1 thought on “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र : Garodar Mata Yojana Marathi 2024”