Aavdel tithe kothehi pravas Yojana 2024 : तर मित्रांनो राज्य सरकार राज्यातील नागरिकांसाठी दरवेळी नव नवीन योजना घेऊन येत असते. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पास योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना एसटी महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कोणताही व्यक्ती फक्त 1,100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकतो.
Aavdel tithe kothehi pravas Yojana Information in Marathi :
योजनेचे नाव | आवडेल तिथे प्रवास योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना खूप कमी खर्चामध्ये प्रवासाचा लाभ घेता यावा. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | कमी खर्चामध्ये प्रवास पास उपलब्ध करून देणे. |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Aavdel tithe kothehi pravas Yojana काय आहे?
या योजने अंतर्गत 4 दिवसांचा आणि 7 दिवसांचा पास देण्यात येतो. तसेच या पासची वैधता (Validity) ही पहिल्या दिवशी रात्री 12 ते शेवटच्या दिवशी (4 किंवा 7) रात्री बारा वाजेपर्यंत असते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमी खर्चामध्ये विविध ठिकाणची पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे फिरता येतील.
MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana पास शुल्क :
Aavdel tithe kothehi pravas Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमी खर्चामध्ये त्यांना आवडेल तिथे प्रवास उपलब्ध करून देणे हा आहे.
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एसटी ने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एसटीने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.
Aavdel tithe kothehi pravas Yojana फायदे काय आहेत?
- या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या पैशाची बचत होणार आहे.
- आवडेल तिथे प्रवास पास काढल्यानंतर प्रवाशांना आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथे जाईल तिथपर्यंत प्रवास करता येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एसटी च्या सर्व बसेस जसे की, साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती (मिडी), शिवशाही (आसनी) या बसेस ने प्रवास करू शकता तेही अगदी कमी खर्चामध्ये.
Aavdel tithe kothehi pravas Yojana च्या अटी व शर्ती :
- या योजनेसाठीची सर्वात महत्वाची अट म्हणजे, ज्या व्यक्तीच्या नावाने पास काढला आहे फक्त तीच व्यक्ती प्रवास करण्यासाठी या पासचा वापर करू शकते.
- समजा आवडेल तेथे प्रवास या योजनेतर्फे दिलेल्या पास ची वैधता (Validity) संपली असेल, तरीही तो प्रवासी प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून तिकिटाचे पैसे घेतले जातील.
- या योजनेद्वारे पासधारक हा आवडेल त्या सीट साठी हक्कघेऊ शकत नाही. पण या योजनेतील पास धारक या पासावर आरक्षण भरून सीट बुक करू शकतो.
- समजा जर एखाद्या प्रवाशाचा पास हरवला असल्यास त्या प्रवाशाला दुसरा पास दिला जाणार नाही. तसेच हरवलेल्या पासची रक्कम सुद्धा परत केली जाणार नाही.
- समजा एखादा प्रवाशी दिलेल्या पासचा गैरवापर करत असल्याचे दिसून आल्यास त्याचा पास जप्त केला जाईल.
- प्रवासामध्ये प्रवाशांची वैयक्तिक किंवा मौल्यवान वस्तू गहाळ झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास महामंडळ त्या वस्तूंची जबाबदारी घेणार नाही.
- समजा जर एखाद्यावेळेस एसटी चा संप असल्यास किंवा आंदोलन असल्यास या कारणांमुळे राज्यातील परिवहन वाहतूक बंद झाल्यास व प्रवासी दिलेल्या पासवर प्रवास करू न शकल्यास, तर अशा वेळेस प्रवाशाने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा किंवा मुदतवाढ दिली जाईल. ही मुदतवाढ किंवा परतावा हा वाहतूक सुरु झाल्यापासून ते ३ महिन्यापर्यंत एवढ्या कालावधीमध्ये देण्यात येईल.
- या योजनेमध्ये मुलांच्या पासचे दर हे 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी आहेत.
- या योजनेच्या माध्यमातून फक्त 4 आणि 7 दिवसाचे पास उपलब्ध आहेत.
- या योजने अंतर्गत साध्या सेवेचा पास काढल्यानंतर सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी (साधी, रातराणी, जलद, शहरी, यशवंती (मिडी) फक्त महाराष्ट्र राज्यापर्यंत ग्राह्य धरले जातील.
- या पासचा वापर करून फक्त एसटी मधून प्रवास करता येणार आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या वाहनांमध्ये या पासचा उपयोग करता येत नाही.
- शिवशाही बस सेवेसाठी दिला जाणारा पास हा शिवशाही बस सोबतच इतर बसेस जसे की, साधी, निम-आराम, विनावातानुकूलित शयन आसनी या सर्व बसेस साठी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रवासासाठी पास ग्राह्य धरला जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून 12 वर्षांच्या आतील मुलाला 15 किलो आणि प्रौढ पासधारकास 30 किलो प्रवासी सामान विना आकार नेता येणार आहे.
- या योजने अंतर्गत स्मार्ट कार्ड दिले जाणाऱ्या आवडेल तिथे कोठेही प्रवास पासांसाठी वर दिलेल्या अटी व शर्ती लागू राहतील.
सरकारच्या इतर योजना :
- दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना : Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024
- मोफत कडबा कुट्टी मशीन योजना : Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra 2024
- राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार ५० लाख रुपयांची मदत । Berojgari Bhatta Yojana Maharashtra 2024
- ई-श्रम कार्ड काढल्यास 2 लाख रुपये मिळणार : E Shram Yojana in Marathi 2024
Aavdel tithe kothehi pravas Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
Aavdel tithe kothehi pravas Yojana साठी अर्ज कसा करायचा?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या क्षेत्रातील राज्य परिवहन बस स्टॅन्ड मध्ये जायचे आहे आणि तिथून या योजनेसाठीचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व योग्य ती माहिती भरायची आहे आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून पैसे भरायचे आहेत.
- ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लगेच बसचा पास दिला जाईल.
3 thoughts on “आवडेल तेथे प्रवास योजना 2024 : Aavdel tithe kothehi pravas Yojana”