Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 : तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिव्यांग शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करण्यात आली आहे ती म्हणजे कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना. आजकाल बऱ्याच अशा अपंग असलेल्या व्यक्तींना जीवनामध्ये विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. अपंगत्व असल्यामुळे त्यांना नोकरी करताना खूप कष्ट सहन करावे लागते, तसेच इतर दैनंदिन कामांमध्ये सुद्धा खूप कष्ट सोसावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने ही योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 Information in Marathi :
योजनेचे नाव | कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर होजना 2024 |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे. |
विभाग | वित्त व विकास महामंडळ |
योजनेचा उद्देश काय आहे? | दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत पुरवणे |
लाभार्थी | दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग शेतकरी |
लाभ | कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 काय आहे?
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांना शरीराने अपंगत्व आले आहे, त्यांना फलोत्पादनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि सुरु असलेल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी खूप कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- फलोत्पादन हा शेती उद्योगाचा एक भाग आहे, त्यामध्ये विविध प्रकराची फळे, फुले आणि भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे यामध्ये शेतीमधील अथवा बागेतील असणाऱ्या फळझाडांची काळजी घेतली जाते.
- फलोत्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला भांडवलाची आवश्यकता असते. पण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि दिव्यांग शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगात असतो. यामुळे शेतकऱ्यांना खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे.
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 पात्रता (Eligibility) :
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ घेता येणार नाही.
- तसेच अर्जदार शेतकऱ्याकडे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प मर्यादा ही 10 लाखांपेक्षा जास्त नसावी.
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचे मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने मजबूत करणे हा आहे.
- तसेच या योजनेमुळे दिव्यांग शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- दिव्यांग शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा या योजने मागील उद्देश आहे.
- दिव्यांग शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे याची जाणीव त्यांना करून देणे.
- दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेमागील उद्देश आहे.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग शेतकरी आत्मनिर्भर बनतील व त्यांना कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 फायदे काय आहेत?
- या योजनेमुळे शेती या क्षेत्राचा विकास होण्यासाठी मदत होईल.
- दिव्यांग शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
- तसेच दिव्यांग शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- या योजने अंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे.
- तसेच या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे दिव्यांग शेतकरी शेती करण्यास प्रोत्साहित होतील.
सरकारच्या इतर योजना :
- कडबा कुट्टी योजनेसाठी सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान त्यासाठी पहा ही योजना : मोफत कडबा कुट्टी मशीन योजना : Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra 2024
- ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रु. पहा काय आहे नक्की योजना : मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३,०००/- रु. | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला/ वयाचा पुराव्या संबंधित कागदपत्र
- दिव्यांग असल्याचा दाखला सिविल सर्जन प्रमाणित
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- 7/12 किंवा 8 अ उतारा
- व्यवसाय करण्याबाबतचा स्थानिक स्वराज्य संस्थानाचा ना हरकत दाखला (उदा. महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद) सचिव किंवा मुख्याधिकारी यांच्याद्वारे प्रमाणित
- भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (पाण्याची पातळी उपलब्ध असले बाबत) पाईपलाईन, बोअरवेल, विहीर, मोटार यासाठी
- व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report) आणि कोटेशन
- कर्जबाजारी किंवा वित्त संस्थेचा थकबाकी नसल्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र (100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (Affidavit)
इतर महत्वाची कागदपत्रे :
- जमीनदाराची वैयक्तिक माहिती
- स्थळ पाहणी
- पैसे दिल्याची पावती
- लाभार्थ्यांच्या नावाने 100 रू. च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- जमिनीचा करारनामा (100 रू. च्या स्टॅम्प पेपरवर)
- तारण करारनामा (100 रू. च्या स्टॅम्प पेपरवर)
- डी. पी. नोट
Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024 साठी अर्ज कसा करायचा?
- या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता, खाली काही स्टेप्स दिलेले आहेत त्या फॉलो करून तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील या योजनेच्या अधिकृत कार्यालयामध्ये भेट द्यायचे आहे.
- कार्यालयात भेट दिल्यानंतर तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत.
- त्यानंतर भरलेला अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- या प्रकारे तुम्ही कृषी संजीवनी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
सारांश :
तर मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच तुम्हाला या योजने संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कमेंट करू शकता किंवा आम्हाला ईमेल द्वारे विचारू शकता. आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ही पोस्ट जर आवडली असेल, तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत व सोशल मीडिया वरती शेअर करा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
1 thought on “दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना : Krushi Sanjivani Horticulture Yojana 2024”