ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना : Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 : तर मित्रांनो, आर्थिक रित्या कमजोर असलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी केंद्र राज्य सरकारने आतापर्यंत विविध योजना सुरू केले आहेत. त्याप्रमाणे यावेळी उत्तर प्रदेश मधील सरकारद्वारे जोतिबा फुले कन्यादान योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील जे कुटुंब आर्थिक रित्या गरीब आहेत त्या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या पोस्टमध्ये आपण Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana विषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. उदा. या योजनेचा उद्देश काय आहे, फायदे काय आहेत, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Information in Marathi :

योजनेचे नावJyotiba Phule Shramik Kanyadan Yojana
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे
संबंधित विभागकामगार कल्याण परिषद
योजनेचा उद्देश काय आहे?मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत पुरवणे
लाभार्थीराज्यामधील कामगार वर्गातील नागरिक
लाभ५१,०००/- रुपये
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.skpuplabour.in/

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana काय आहे?

राज्यातील असे बहुतांश कामगार नागरिक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांच्या मुलीचा विवाह करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उत्तर प्रदेश मधील सरकारने ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा उत्तर प्रदेश मधील कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी फक्त राज्यामधील कामगार किंवा मजदुरी करणारा नागरिकच पात्र राहील.
  • उत्तर प्रदेश राज्य सोडून इतर राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेसाठी फक्त दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे नागरिकच लाभ घेऊ शकतील.
  • त्याचबरोबर अर्ज करणारा कामगार किंवा मजदूर याने कारखाना अधिनियम १९४८ नुसार नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
  • तसेच राज्य सरकारच्या या योजनेतर्फे ज्या मुलीचा विवाह होणार आहे, तिचे कमीत कमी वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा कामगार हा मुलीच्या लग्नाची तारीख आहे त्या तारखेच्या ३ महिने अगोदर आणि १ वर्षानंतरच अर्ज करू शकतात.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कामगाराचे प्रति महिना वेतन हे १५,०००/- आणि त्याचे वार्षिक वेतन हे २ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीच्या बँक खात्यामध्ये ५१,०००/- रुपये जमा करण्यात येतील.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

  • ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कामगारांच्या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
  • या योजनेमुळे गरीब घरातील कामगार कुटुंबांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागणार नाही.
  • तसेच या योजनेमुळे कामगारांशिवाय आर्थिक अडचणींमध्ये असलेले इतर व्यक्ती त्यांच्या मुलींचे लग्न अगदी थाटामाटात करू शकणार आहेत.
  • राज्यातील कामगार या योजनेचा आर्थिक लाभ घेऊन कोणावरही अवलंबून राहायची गरज भासणार नाही. आणि ते त्यांच्या मुलीचे लग्न हे आनंदाने करू शकतील.
  • तसेच सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा देखील त्यामागचा उद्देश आहे.
  • राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देणे.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana चे फायदे काय आहेत?

  • या योजनेमुळे कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेण्यापासून मुक्तता मिळेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलीचा जन्म गरीब कुटुंबामध्ये झाला असेल तर त्या मुलीला ओझे मानले जाणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१,०००/- रुपये इतकी मदत केली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक रक्कम ही थेट मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

सरकारच्या इतर योजना :

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • मुलीचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखल
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • रेशन कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • लग्न कार्डाची झेरॉक्स
  • ऑनलाईन फॉर्म भरल्याची सत्यापित छायाप्रत

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana साठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम कामगार कल्याण परिषद, कामगार विभाग, उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर वर यायचे आहे.
  • त्यानंतर इथे तुम्हाला Labour Login नावाचा पर्याय दिसेल, तर इथे तुम्हाला Register New User या ऑप्शन वर क्लिक कार्याचे आहे.
  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कामगार वापरकर्ता नोंदणीचा फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती उदा. तुमचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासवर्ड ही सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • New User Registration केल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
  • आता तुम्हाला हा अर्ज संपूर्ण भरायचा आहे, विचारलेली सर्व माहिती ही काळजीपूर्वक वाचून नीट टाकायची आहे.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक संस्था किंवा कारखान्याकडून पडताळणी केलेली अर्जाची प्रत मिळवायची आहे.
  • नंतर तुम्हाला तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून वेबसाईट वर लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर स्कीम अप्लिकेशन डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • नंतर व्हेरीफाईड कॉपी स्कॅन करून अपलोड करायची आहे.
  • या पद्धतीने तुम्ही ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

1 thought on “ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना : Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024”

Leave a comment