ठिबक, तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार : Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra 2024

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार द्वारे नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन ही सुविधा बसवण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येणार आहे.

आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये तुषार ठिबक सिंचन योजना या योजने विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. जसे की, ही योजना काय आहे? योजनेचा फायदा काय आहे? पात्रता आणि योजनेचा लाभ कसा घ्यायचा? या सर्व बाबींविषयी आम्ही पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या आसपास परिसरातील शेतकरी असतील त्यांनाही माहिती द्या किंवा आर्टिकल त्यांना व्हाट्सअप द्वारे शेअर करा.

या योजने मार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन बसवण्यासाठी एकूण 80% अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान + 25% पूरक अनुदान असे 80% अनुदान व इतर शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान+30 टक्के पूरक अनुदान म्हणजे एकूण 75% या पद्धतीने अनुदान देण्यात येणार आहे.

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra 2024 Information in Marathi :

योजनेचे नावठिबक सिंचन अनुदान योजना 2024
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?या योजनेचा मुख्य उद्देश कमी पाण्यात पिकांचे सिंचन करणे हा आहे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभसिंचन बसवण्यासाठी एकूण 80% अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra काय आहे?

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुषार ठिबक सिंचन योजना ही सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचा शेती हा वर्षानुवर्ष चालत आलेला एक पारंपरिक व्यवसाय आहे. जेव्हा आपण शेती करत असतो तेव्हा शेताच्या पिकासाठी सतत पाण्याची आवश्यकता भासत असते. काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पिकांना पाणी दिल्या कारणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. आणि त्यामुळे काही काळानंतर पाण्याची टंचाई निर्माण होते.

राज्य सरकारने या सर्व समस्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या पिकांना चांगल्या प्रकारे पाणी मिळावे आणि पाण्याची बचत देखील व्हावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहित व्हावे या उद्देशाने तुषार ठिबक सिंचन योजना ही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra पात्रता (Eligibility) :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

तुषार ठिबक सिंचन योजना अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 आणि 8 अ हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी हा एससी, एसटी या प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • समजा अर्जदार शेतकऱ्याने 2017 या सालाच्या अगोदर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुढचे 10 वर्षे त्या सर्वे नंबर वरती लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचप्रमाणे जर समजा अर्जदार शेतकऱ्याने 2018 च्या नंतर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुढची 7 वर्षे लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याच्या इलेक्ट्रिक पंपासाठी कायमस्वरूपीचे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. पुराव्यासाठी शेतकऱ्यांना विज बिलाची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्यांना 5 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्येच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • लाभार्थी शेतकऱ्याला जर पूर्व मंजुरी मिळाली असेल, तर त्याने अधिकृत विक्रेत्याकडून सिंचनाचा संच विकत घ्यायचा आहे आणि शेतामध्ये स्थापित करायचा आहे. तसेच पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीमध्ये खरेदी केलेली पावती अर्जासोबत पोर्टलवर अपलोड करायची आहे.
  • तर समजा लाभार्थी शेतकऱ्याने पूर्व मान्यता मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये सूक्ष्म संच बसवलं नाही तर त्या शेतकऱ्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर शेतकऱ्याने पूर्व मान्यता न घेताच सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी अर्ज केला असल्यास अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो.

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra या योजनेचा उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्रातील राज्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन सुविधा बसवण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतातील काम जलद गतीने व्हावे तसेच सिंचना अभावी शेतातील पिकांचे होणारे नुकसान कमी करणे.
  • शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी माहित व्हावे.
  • पाण्याचा योग्य वापर करून आणि पाण्याची क्षमता वाढवून जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन करणे. म्हणजेच कमी पाण्यामध्ये जास्त पिकाचे उत्पादन करणे.
  • शेती या क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे.

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra फायदे काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन प्रणाली साठी आर्थिक अनुदान पुरवले जात आहे.
  • शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये सुद्धा शेती करणे शक्य व सुलभ होणार आहे.
  • पाण्याचा अतिवापर टाळता येणार आहे. म्हणजेच या ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाण्याचा वापर कमी होईल आणि पाण्याची बचत खूप जास्त होईल.
  • शेती या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्राचा विकास होणार आहे.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

सरकारच्या इतर योजना :

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याची माहिती
  • 3 महिन्या अगोदरचे वीज बिल
  • जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • शेतकऱ्याचे पूर्वसंमती पत्र

Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra साठी अर्ज कसा करायचा?

  • तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जायचे आहे.
  • अधिकृत पोर्टलवर आल्यानंतर होम पेज वरती शेतकरी योजना यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, यामध्ये तुम्हाला इथे Username विचारला आहे तो टाकायचा आहे आणि Captcha टाकून Login करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, याठिकाणी तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या समोर बाबी निवड या ऑप्शन वरती क्लीक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये सिंचन स्रोत बद्दल विचारलेली योग्य ती माहिती निवडायची आहे आणि जोडा या बटनावरती क्लीक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर एक सिंचन साधने व सुविधा हा अर्ज ओपन होईल त्यात तुम्हाला विचारलेली सर्व योग्य ती माहिती भरायची आहे आणि जतन या बटनावरती क्लीक करायचे आहे.
  • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल इथे तुम्हाला फक्त 23/- रुपये भरायचे आहेत.
  • या पद्धतीने तुम्ही तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

1 thought on “ठिबक, तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार : Tushar Thibak Sinchan Yojana Maharashtra 2024”

Leave a comment